देशद्रोही

"अर्चना, डबा तयार झाला की नाही? ", बूट घालून होताक्षणीच अनिलने
स्वयंपाकघराच्या दिशेने आवाज दिला.
"आले हो", आतून आवाज आला आणि पाठोपाठ अर्चना एका हातात डबा आणि एका हातात पाण्याची बाटली घेउन बाहेर आली. नेहमीच्या तत्परतेनं तिने
बॅगमध्ये सगळं भरलं आणि बॅग त्याच्या समोर धरली. इतकावेळ तिच्या मनमोहक
हालचाली पाहण्यात मग्न झालेल्या त्याला भानावर यायला एक-दोन क्षण लागले.
ती जरी फार शिकलेली नसली तरी दिसायला लाखात नाही तरी हजारात एक नक्कीच
होती.

रूट थ्री

'हॅरॉल्ड अँड कुमार एस्केप फ्रॉम ग्वांटानामो बे' नावाचा एक सुमार चित्रपट मागल्या वर्षी येऊन गेला.

सहकुटुंब न पाहण्याइतपत वाईट अशा या चित्रपटाच्या अंती मात्र एक फार आगळी कविता 'कुमार' या पात्राच्या तोंडी आहे.

प्रसंग 'दिल चाहता है' मध्ये आमीर खान प्रीती झिंटाच्या लग्नाच्या (की साखरपुडा? ) वेळी येऊन आपल्या प्रेमाचा 'इजहार' करतो तद्वत आहे.

तर ही कविता कुमार त्या वेळी ऐकवतो.

या प्रसंगाचा यू-ट्यूब विडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे -

दुवा क्र. १

आणि ही कविता -