" का रे? काय झालं? काही हवंय का?
"काकू, एक विचारू? ती स्वप्ना....."
" अगं बाई, तेही कळलं की काय तुला?" काकूंच्या चेहर्यावरचा तजेला मावळला आहे हे माझ्या लक्षात आलं.
" काय कळलं मला? काय आहे ते..... पण मला तर ती......." पण काकूंचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. कुठे तरी तंद्रीत हरवल्या सारख्या त्या बोलत होत्या.