टाटा उद्योगसमूह एक अनुभव

        आज सर जमशेदजी टाटा यांचा १७५ वा जन्मदिन आहे. त्या निमित्त त्या उद्योगसमूहाचा मला आलेला एक छोटासा अनुभव  सांगण्यासारखा वाटतो.

तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली .....

तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली .....

फाल्गुन महिना सुरु झाला की वेड्या मनाला एक ध्यास लागतो तो तुकोबांचा.
इतरवेळेस त्यांचे भावभरले अभंग मनात रुंजी घालतच असतात पण फाल्गुन जसा जवळ
येतो तसे त्यांचे इतर अभंग जास्त जवळचे वाटू लागतात - ज्यात त्यांची प्रखर
विठ्ठलनिष्ठा अशी काही उफाळलेली दिसते की त्यापुढे त्यांना प्रपंच पार पार
नकोसा वाटतो आहे.... - अशा त्या धुंदीतच ते एकटेच या लौकिकाकडे पाठ फिरवून
त्या भामगिरी टेकडीवर जात असतील ..... आणि तिथे काय विठ्ठलाशी संवाद साधत
असतील का आत्मसंवादात लीन होत असतील ??

नाटाचे अभंग... ४७

४६. आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत ।
 पहातां न कळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां ॥१॥
 विसरोनि आपला देहपणभाव । नामेंचि भुलविला पंढरीराव ।
 न विचारी याति कुळ ठाव । लागावया पाव संतांचे ॥धृ॥
 बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां ।
 होय अविनाश साहाकारी दाता । चतुर्भुज सत्ता* परि धाके ॥३॥
 होय आवडी साना थोर । रूप सुंदर मनोहर ।
 भक्तिप्रिय लोभापर । करी आदर याचकपणें ॥४॥
 तें वर्म आलें आमुच्या हातां । म्हणोनि शरण रिघालों संतां ।

"माय मराठी एक प्रवास..."

जागतिक मराठी दिनानिमित्त बहारदार कार्यक्रम - "माय मराठी – एक प्रवास..." दि. १ मार्च रोजी सायं ६ ते ८, स्थळ – महाराष्ट्र मंडळ, गांधी नगर, सादरकर्ते महाराष्ट्र मंडळ बंगलोर.... आपल्या माय मराठीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सगभागी व्हा आणि मराठी गझल गायन, नाट्यगीते, अभंग मराठी कवितेचा आस्वाद जरुर घ्या.

ठाणे येथील चित्रप्रदर्शनात सहभाग

ठाणे कला भवनाला  पाच  वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  ठाण्यातील चित्रकारांचे  एक प्रदर्शन भरले  आहे.   या प्रदर्शनात माझीही दोन चित्रे  आहेत.   सुधीर पटवर्धन  आणि  काशीनाथ  साळवे अशा प्रतिथयश  चित्रकारांच्या सोबत माझी चित्रे आहेत याचे मला विशेष वाटते.

प्रमोद सहस्रबुद्धे

नाटाचे अभंग... ४६

४५.    हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें ।
    आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥
    बैसतां संतांचे संगती। कळों आलें कमळापती ।
    आपुलीं कोणीच नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला ॥धृ॥
    येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड ।
    कनिष्ठीं रुचि ठेवूनि गोड । देखत नाड कळतसे ॥३॥
    मरती मेलीं नेणों किती । हाचि लाभ तयाचे संगती ।
    म्हणोनि येतों काकुळती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥४॥

नाटाचे अभंग...४५

४४.    तुळसी माळा घालूनि कंठीं । उभा विटेवरी जगजेठी ।
    अवलोकोनि पुंडलिका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीये ॥१॥
    भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धिसिद्धि वोळगती द्वारीं ।
    सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥धृ॥
    जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगी ।
    जैसी विद्युल्लता झळके मेघीं । दर्शनें भंगी महा दोष ॥३॥
    सुखसागर परमानंदु । गोपी गोपाळां गोधनां छंदु ।