कामथे काका (भाग २७ वा)

                                  काकांची रात्र श्रेयाच्या तापामुळे जागरणात गेली. त्यांना त्याचं काही वाटलं नाही. पण ते साधनाला मात्र फोन करू शकले नाहीत. बुधवार उजाडला. त्यांच्या मनात आलं, दरोड्याला फक्त दोन दिवस (की रात्री? ) बाकी आहेत, जणू लग्न दोन दिवसांवर आलंय. आज काय घडणार काय माहीत?   कामावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. काम दिलेलं होतं. सकाळी श्रेयाचा ताप उतरला. तिने काकांना पुन्हा धरून ठेवले. ती बागेत जाण्याचा हट्ट करू लागली. आता मात्र नीता वैतागली. "काही जायचं नाही बागेबिगेत.

जीवनगाणे - २

डोरोथी क्रोफूट हॉजकिन: DOROTHY CROWFOOT HODGKIN.  प्रोटीन क्रिस्टलोग्राफीची (Protein Crystallography) जननी. जन्म: कैरो, इजिप्त येथे १२ मे, १९१०. मृत्यू शिप्स्टन ऑन स्टूर, इंग्लंड इथे २९ जुलै १९९४ रोजी. सामान्यतः शास्त्रीय चरित्रकारांना उत्तम चारित्र्य आणि सखोल विज्ञान यात फारसा परस्परसंबंध आढळत नाही. अर्थात यालाही काही अपवाद आहेतच.

जीवनगाणे - १

खरे तर जेनिटीक्स या विज्ञानाला मराठीत काय म्हणावे असा मला प्रश्न पडला होता. सूक्ष्मदर्शकाचा वापर वैज्ञानिक करू लागल्यावर सूक्ष्मजीवविज्ञानाचे एक दालनच उघडले. त्याचबरोबर वनस्पतींच्या, प्राण्यांच्या शरीरातील पेशींचा अभ्यासही सुरू झाला. अनुभवाच्या आधारावर जीवांचे गुणदोष, काही रोग अनुवंशिकतेच्या तत्वानुसार पुढील पिढीत उतरतात हे मानवाला ठाऊक झाले होते. संकर करून दोन जातीतील चांगले गुण एकत्र आणून नवीन उत्कृष्ट सजीवांची पैदास केली जात असे.

नाटाचे अभंग... भाग ४३

४२.तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्पमति नारायणा ।
 भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
 काय जाणावें म्यां दीनें । तुझियें भक्तिचीं लक्षणें ।
 धड तें तोंड धुऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥धृ॥
 न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वायां जाय ऐसें ।
 चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥३॥
 तुज समर्पिली काया । जीवेंभावें पंढरीराया ।
 सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥४॥
 चतुर तरी चतुरां राव । जाणता तरी जीवांचा जीव ।
 न्यून तो कोण एक ठाव । आरुष भाव परि माझा ॥५॥