आज इंद्रवज्रा हे वृत्त बघू.
उदा.-
दुःखी जगा देखुनिया द्रवे ते
सच्चित्त माते नवनीत वाटे
अन्याय कोठे दिसता परी ते
त्या इंद्रवज्रासहि लाजवीते
टीप-
याची चाल थोडीफार भुजंगप्रयातच्या जवळची आहे...
जगी सर्वसुखी असा कोण आहे...
ल ग क्रमः
गा गा ल । गा गा ल । ल गा ल । गा गा
२ २ १ २ २ १ १ २ १ २ २
त । त । ज । गा गा
यती- ५ व्या अक्षरावर.
गागालगागा, ललगालगागा
अन्याय कोठे, दिसता परी ते
२ २ १।२ २ १।१ २ १।२ २
आता कुणाला कळणार नाही
२ २ १ २ २ १ १ २ १ २ २
------------------------
------------------------
------------------------
आता कुणाला कळणार नाही
शेवटची ओळ आहे-
आता कुणाला कळणार नाही
करताय ना पूर्तता.....
-नीलहंस.