संस्कृत भाषेमध्ये समस्यापूर्ति हा संस्कृत श्लोकरचनेचा एक आव्हानात्मक प्रतिभाविष्कार, ज्यात श्लोकाचे चौथे चरण दिले जाई आणि आधीची तीन चरणे मग विविध कवी रचत असत.
सर्वश्रुत उदाहरणः
....
....
....
ठंठं ठठंठं ठठठं ठठष्ठः
>
रामाभिषेके जलमाहरन्त्याः
ह्स्ताच्युतो हेमघटो युवत्याः
सोपानमार्गेण करोती शब्दं
ठंठं ठठंठं ठठठं ठठष्ठः
---------
येथे मनोगतवरही मराठीत हा काव्याविष्कार आपण साधू शकलो तर!!!
मग वाट कसली पहायाची...
समस्या (वृत्तः भुजंगप्रयात) -
....
....
....
अनंतात त्याचा असा अंत झाला