मुंबईत नुकत्याच झालेल्या अपघातात अनेक मजूर, कष्टकरी व्यक्ती मद्यधुंद चालकाच्या मोटारीखाली मृत्यू पावल्या. त्याबद्दल दै. सकाळमध्ये हा लेख प्रकाशित झाला आहे. आत्तापर्यंत मनोगतावर याबद्दल फारसे लिहिले गेले नाही. मृत्यू पावलेले लोक (बहुधा) दलित, पीडीत होते परंतु परप्रांतीय होते. हे तर अनुल्लेखाचे कारण नाही ना? माझा इशारा खैरलांजी प्रकरणी न लिहिलेल्यांविरुद्ध आकस धरणाऱ्यांकडे आहे.
असो. लेखकाने मांडलेले मुद्दे अगदी वेगळे आहेत. काही जणांना ते 'चोराच्या उलट्या..'ही वाटण्याची शक्यता आहे. लेखकाचे म्हणणे आहे की प्रसारमाध्यमांनी आरोपींना काही तासातच दोषी ठरवले व त्यांना लक्ष्मीपुत्र, धनिक बाळ, इ. विशेषणे लावून मोकळे झाले. हे बरोबर नाही.
लेख वाचून काय वाटते सांगा.