पुराणांचा अभ्यास व भाषांतरे

मराठी अध्यात्मीक ग्रंथमालेमधे दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत या ग्रंथांचा प्रामुख्याने अभ्यास झालेला आढळतो. प्राचीन वेदसंहिता, उपनिषदे व पुराण या बाबतचे लिखाण म्हणावे तेवढे मराठीतून ईंटरनेटवर आढळत नाही. शिवाय या ग्रंथांवर अभ्यास करून हे ज्ञान पुढील पिढ्यांना पोचवले पाहीजे. या साठी कोणी मार्गदर्शन करु शकत असल्यास उत्तम होईल. विनायक यानी ज्ञानेश्वरी वर लेखन करुन एक वाड.मयी यज्ञच केला आहे. असेच यज्ञ सामुहीक प्रयत्नातून साकारतील तरच हे वैदीक ज्ञान मराठी माणसाला पुढेही उपलब्ध होईल.या विषयावर आपणांस काय वाटते ? आपण कशा प्रकारे असा उपक्रम राबवू शकतो ?

आपला विनम्र

शशांक