दहशतवाद्यांनी ओलिस धरलेल्यांच्या सुटकेच्याबाबत भारताचे राष्ट्रीय धोरण काय आहे ? किंवा नसल्यास काय असावे?

दहशतवाद्यांनी ओलिस धरलेल्यांच्या सुटकेच्याबाबत भारताचे राष्ट्रीय धोरण काय आहे ?  किंवा नसल्यास काय असावे?
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार काही पकडल्यागेलेल्या दहशतवाद्यांचा इरादा देशाच्या राजकारणाला वळण देऊ शकतील अशा व्यक्तींचे अपहरण करून त्या बदल्यात अनेक बंदिवान सहकार्यांची सुटका करून घेणे व त्या मधून भारत देशाच्या शांततेचा भंग करून अराजक माजवावे असा आहे. सुदैवाने त्यांचा तो डाव फसला व ते पकडले गेले. भविष्य काळात असे प्रयत्न जास्त प्रखर होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. असे घडले तर त्यावेळी ओलितांची सुटका करण्यासाठी भारताचे काही ठाम राष्ट्रीय धोरण असणे गरजेचे आहे. ते ठरवले गेले आहे काय? असल्यास ते का आहे? त्यावर प्रसिद्धी माध्यमांतून चर्चा होणे अत्यंत गरजेचे नाही काय?  आपल्या माध्यमातून यावर प्रकाश टाकावा, ही विनंती.  
विंग कमांडर (निवृत्त)शशिकांत ओक  पत्ता - ए ४-४०४ गंगा हॅम्लेट हौसिंग सोसायटी विमान नगर, पुणे.४११ ०१४ Mo:- 9881901049. Email: shashioak@gmail.c