होय, हा महाराष्ट्र धर्म आहे !

'होय, हा महाराष्ट्र धर्म आहे' या नावाचे एक छोटे पुस्तक पाहायला मिळाले. याचे लेखक आहेत 'संवाद'कार राजू परुळेकर.
यात त्यांनी मराठी राजकारण्यांविषयी व त्यांच्या महाराष्ट्र व देशाविषयींच्या भूमिकांचा ऊहापोह केला आहे.

महाराष्ट्राबदल हिताची व कणखर भूमिका घेणारे गतकाळचे राजकारणी - बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार, अत्रे, इ.
तसेच महाराष्ट्राबदल अनास्थेची व कणाहीन भूमिका घेणारे गतकाळचे राजकारणी - मोरारजी व काँग्रेसचे इतर
याबद्दल त्यांनी उद्बोधक अशी माहिती दिली आहे.....

काही गोष्टी यात मला नवीनच कळल्या व त्या अत्यंत धक्कादायक अशा आहेत !
वर्तमान काळातील चर्चा करताना त्यांचा रोख मुख्यतः मुंबई या ज्वलंत प्रश्नावर आहे.

यात त्यांनी नमूद केलेले संदर्भ चीड आणणारे आहेत !

१. उद्धव ठाकरे यांनीच उत्तर प्रदेशींना जवळ केले स्वतःच्या राजकीय प्रगतीसाठी ! त्यांनी जाणीवपूर्वक आपल्याभोवती त्या लोकांचे कोंडाळे तयार केले.

२. ९०च्या दशकात जेव्हा रंगशारदात ह्या लोकांच्या अवैध आक्रमणाचे सविस्तर प्रेसेंटेशन करण्यात येणार होते ते त्यांनी प्रयत्नांती निष्प्रभ केले.

३. म्हणजेच राज यांच्याशी स्पर्धा असण्याच्या पूर्वीपासूनची ही त्यांची खोड आहे !

४. ३, ४ वर्षांपूर्वी तर म्हणे शिवसेनेत मराठी बद्दल बोलायची सक्ती होती ! आणि सर्व धोरणे उत्तर भारतियांच्या हितानुसार ठरवायचे !

५. मुंबईतील कोळी बांधव भय्यांच्या अवैध घुसखोरी विरोधात उभे ठाकले तेव्हा उद्धवच्या नेतृत्वात असणाऱ्या शिवसेनेने हात झटकले, त्यावेळी हे कोळी बांधव अक्षरशः ढसाढसा रडले होते !

६. लाई चना, उत्तर प्रदेश दिन यासारखे कार्यक्रम उद्ध्व यांच्या नेतृत्वात शिवसेनेने सुरू केले !

७. २०१० चा महाराष्ट्र दिन उद्ध्व मुन्ना त्रिपाठी याच्याबरोबर साजरा करणार आहे - अशी माहिती राजू या पुस्तकात देतात !

८. हे सर्व होत असताना उद्ध्वला बाळासाहेबांचा पाठिंबा / दुजोरा नव्हता असेही परुळेकर नमूद करतात !

९. म्हणजे उद्ध्वच्या नेतृत्वातील शिवसेनेने मुंबईची फक्त अनास्थेनेच (पॅसिव राहून) वाट लावली नाही तर प्रोऍक्टिवली मराठी विरोधी धोरण स्वीकारले - असे राजू पटवून देतात ! (काँग्रेस तर मुंबईत सदैव मराठी विरुद्धच असते हे तर ते बऱ्याच दाखल्यांनी सिद्ध करतात)

ही अशी अत्यंत शॉकिंग माहिती यात वाचायला मिळते ! काय म्हणावं ! हे वाचून माझं डोकं सुन्न झालं !

आतापर्यंत आम्हा मुंबईकरांना वाटायचं की राज यांच्या स्पर्धेमुळे उद्धव हे जरा कडवट व दुबळे वाटतात - पण त्यांच्या या असल्या खोड्या जुन्याच आहेत (फक्त टिकाव धरण्याकरता) हे वाचून तर फार वाईट वाटले ! (बहुतेक हे सर्व शिवसैनिकांनाही माहित असेल) 

हे सर्व नमूद करताना राजू पुढे म्हणतात की सर्व तऱ्हेने मुंबईवरील मराठी ठसा पुसला जात असताना राज यांचे आंदोलन (उद्देश कुठला का असेना) ही खरोखर ऐतिहासिक गरज व संधी होती सर्व मराठी राजकारण्यांनि एकत्र येण्याची ! पण राजना ते क्रेडिट जाईल म्हणून व एकूणच कणाहीन चारित्र्यामुळे हे शक्य झाले नाही !

या आंदोलनाने मुंबई जी ढवळून निघाली, या काळाचे उत्तम समालोचन यात दिसते ! अनेक राजकीय सत्य यात वाचकाला कळतात !
त्या वेळी देशातील इतर राज्यांची, राजकारण्यांची पोटदुखी कशी उफाळून आली तेही ते सोदाहरण सांगतात ! (राष्ट्रवादीच्या पोलीस खात्यासह)

अजून बरेच पटण्यासारखे मुद्दे परुळेकर यात मांडतात व गतकाळच्या काही सुराजकारण्यांची मुत्सद्देगिरी महाराष्ट्राला कशी पोषक होती हेही ते छान प्रकारे वर्णन करतात - उदा - अत्रे, सेनापती बापट, आंबेडकर, इ.

तसेच शरद पवाराबदलही त्यांचा चॅप्टर वाचनीय आहे !

एकूण काय तर हे पुस्तक बरीच चांगली व तितकीच धक्कादायक माहिती पुरवितं ! वर्तमानातील महाराष्ट्राच्या राजकारणाचे बरेच पदर त्यांनी परखडपणे मांडलेत ! भले 'मुंबई' प्राधान्याने यात नमूद केली असली तरी !

निदान मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाने वाचावे असे हे पुस्तक आहे !

आपणापैकी कोणी वाचले असेल तर आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडतील...