सह्याद्री वाहिनीवरील जुन्या मालिका

मनोगतवर उपरोक्त विषयावर चर्चा घडवून आणावी असे फारा दिवसांपासून मनात होते. आज मुहूर्त "गावला".
उद्देश एवढाच, की जुन्या आठवणींना थोडातरी उजाळा मिळेल. मालिकांचा काळ साधारण जेंव्हा वाहिन्यांचा
इतका "सुळसुळाट" झालेला नव्हता तेव्हाचा विचारात घेतला जावा.
चर्चेत फक्त, मालिकांची नावे यावीत असे नाही. तदनुषंगिक माहिती, त्या मालिकेचे शीर्षकगीत, शीर्षकसंगीत, त्या मालिकेशी संबंधित तुमच्या आयुष्यातील काही घटना असतील तर त्या, वगैरे हे ही यावं. 
उदाहरणार्थः
चिमणराव-गुंड्याभाऊ
गोट्या-आता या मालिकेचे  शीर्षकगीत तर अत्यंत प्रसिद्धच आहे. साधारण शनिवारी सात वाजता ही मालिका लागायची. आम्ही जर बाहेर खेळत असू तर हे गीत कानावर पडलं की खेळ सोडून आम्ही सगळे घरी पळत असू.

तर मग होऊ द्या चालू.................