श्रद्धा म्हणजे काय?

गेल्या काही दिवसात अंधश्रद्धेवरून बराच वादविवाद चालला असला तरी जाळ्याच्या एकाच बाजूने दोन्ही कडील खेळाडूंनी टेनीस खेळल्यासारखा प्रकार चालला होता. कारण बरीच उदाहरणे ही "डोळे झाकून" अंधश्रद्धेचीच आहेत याबाबत कुणाला विशेष संशय नव्हता. फक्त मला एकच प्रश्न होता तो म्हणजे स्वतःला जे बरोबर वाटते ते कितीही बरोबर असले तरी इतरांच्या ज्या खाजगी गोष्टींचा आपल्याला त्रास होत नाही त्याबद्दल हेटाळणीच्या स्वरूपात लिहीणे हे काही सभ्यतेचे लक्षण मानता येईल का? पण तुर्त तो विषय बाजूला ठेवून देऊ.


म्हणून मला खालील प्रश्न मनोगतींना विचारावेसे वाटतात:



  1. श्रद्धा म्हणजे काय? 

  2. अंधश्रद्धा ही फक्त देव, धर्म याच्याशीच निगडीत आहे का?

  3. जर आपण कोणीच देव पाहीला नाही, तर सर्वच धर्म हे  अंधश्रद्धेचे प्रतिक समजायचे का आणि तसे कायद्याने मानून सर्व धर्म आणि देवळे, मशिदी, चर्चेस, गुरूद्वारे वगैरे बंद करायची का? की त्याबाबतीत काही सीमारेषा आहेत?

  4. आपण आपल्य व्यक्तिगत आयुष्यात अशा कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवून वागतो की ज्या अंधश्रद्धेत अथवा अंधविश्वासात मोडू शकतील? - उ.दा. आपल्यातले जनात नाही तरी मनात जाती कितीजण मानतात? (लग्नाच्या वेळेस आपण कदाचीत स्वतःम्हणून  नसेल पण घरचे म्हणतात म्हणून अशा किती गोष्टि पाहता/पाहील्या?); राजकारण वाईट आहे, समाजात बदल होणार नाही, आपल्या मतांचा उपयोग नाही वगैरे म्हणत पण आपल्यातले कितीजण काही समाजात तरी करायचा प्रयत्न करता? बाकी काही नाही तरी देणग्या देता? अगदी आपल्याला न भावणाऱ्या अंधश्रद्धेबद्दल किती जण घरापासून सुरवात करून टिका करतात आणि सुधारणा करायचा प्रयत्न करता?

  5. विज्ञानावर (योग्यच) विश्वास ठेवताना, आपल्यातले कितीजण प्रदुषणामुळे आपल्या आरोग्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी काय ठेवत आहोत म्हणून व्यक्तीगत पातळीवर आणि सामाजीक पातळीवर योग्य त्या पर्यावरणप्रिय गोष्टी करता आणि कितीजणांना "विकास" करायचा असेल तर प्रदुषण हे होणारच असे म्हणून गप्प बसता किंवा तसे धोरण योग्य वाटते?

  6. अंधश्रद्धेच्या बाबतीत बोलणारे आपण फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धे बद्दलच का बोलतो? - मला एकदा कारण मिळाले की कारण मी हिंदू आहे म्हणून. पण तीच व्यक्ती जेंव्हा बाहेर बोलायची वेळ येते तेंव्हा मी धर्म मानत नाही फक्त भारतीय आहे असे म्हणते, हा दुटप्पीपणा योग्य वाटतो का? ...

या चर्चेला जर काही प्रतिक्रीया आल्यातर मी अर्थातच माझीही वरील गोष्टींसंदर्भात मते मांडीन. एक गोष्ट नक्की मी १० गोष्टि करूनही मी स्वतःला अंढश्रद्धही समजत नाही, श्रद्धाळू समजत नाही की अश्रद्ध ही समजत नाही.