मंडळी,
कुठल्याही संस्थेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणजे संस्थेचा अभिमान, तिचा इतिहास आणि कर्तृत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी. पुढच्या पिढीला संदेश आणि दिशा द्यायची संधी.
Dan Brown च्या दा विन्ची कोड पासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती मुद्रेपर्यंत आणि रेड क्रॉस च्या चिन्हापासून हिटलरच्या स्वस्तिकापर्यंत आतापर्यंत आपण अनेक बोधचिन्हे पाहिली.
जय जवान जय किसान, गर्जा जयजयकार क्रांतीचा या घोषवाक्यांनी आपण देशभक्ती साठी प्रेरित झालो आणि सागरा प्राण तळमळला सारख्या काव्यांनी आपण हळवे झालो.