नाटाचे अभंग... ३८

३७. दास्य करी दासाचें । उणें न साहे तयाचें ।
 वाढिलें ठायींचें । भाणें टाकोनियां धांवे ॥१॥
 ऐसा कृपेचा सागर। विटे उभा कटीं कर ।
 सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥धृ॥
 हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचे भूषण ।
 नाहीं तयाचा शीण । सुख धरिलें लातेचें ॥३॥
 सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगिकारी ।
 सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥४॥
 राखे दारवंटा बळीचा । सारथी झाला अर्जुनाचा ।
 दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥५॥
 भिडा न बोले पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं ।

पाच वाजता

    शेवटची पंगत अडीचला संपली. मी या शेवटच्याच पंगतीत होतो. माझे जेवण जास्त झाले. तसे लग्नातले माझे जेवण नेहमीच जास्त होते. दर रविवारी कोणाचे तरी लग्न असायला पाहिजे असे मला नेहमी वाटते. मी वरपक्षाच्या खोलीत आलो आणि लवंडलो. झोप येत होती पण चष्मिस किरणने लागूच दिली नाही.  गावाकडच्या गोष्टी सांगून तो मला रिझवायचा प्रयत्न करत होता. मी हं हं करत होतो. सांगता सांगता तो कधीतरी सटकला. मलाही डोळा लागला. केव्हातरी अर्धवट झोपेत मिहीर, मुक्ता येऊन मला उठवायचा प्रयत्न करून गेले. 
    चारच्या सुमारास डोळे उघडले.

काळ्या किनारीचे सोनेरी पान

इतिहास हा जेत्यांनी, राज्यकर्त्यांनी लिहिलेला असतो. त्यामुळे जेत्यांना नसलेले गुण चिकटवण्यात आणि पराभूतांना नसलेले दुर्गुण चिकटवण्यात इतिहासकारांचे बरेच श्रम खर्ची पडतात. त्यातून जर जेते वा राज्यकर्ते संकुचित, कोत्या, प्रतिगामी विचारांचे असतील तर विचारायलाच नको. राजकारणातील दबाव हे देखील एक कारण असू शकते. आधुनिक इतिहासकारांना मात्र लोकशाहीचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे अकबराच्या तथाकथित नवरत्नांपैकी एक असलेल्या अबुल फझलसारख्या तथाकथित इतिहासकारांची भाष्ये विश्वासार्ह अशा ऐतिहासिक पुराव्यांवर तपासून घेण्याची वेळ आलेली आहे असे काही मान्यवरांचे मत आहे.

भगवद्गीता आणि मनाचे श्लोक

" श्रीमद्भगवद्गीता आणि मनाचे श्लोक,  एक अनोखा, आगवेगळा कार्यक्रम " हा कार्यक्रम गीताजयंतीनिमित्त सादर केला जाणार आहे.  आबा लवृद्ध, बंधुभगिनीनी अवश्य लाभ घ्यावा.
सादरकर्ते---श्रीं.नरिमन जोशी, श्रीकृष्णजोशी.
स्थळ-------श्रीस्वामी समर्थ मठ, नेहरू नगर, कुर्ला ( पूर्व )
वेळ---------रविवार,१३ डिसेंबर २०१३, सायंकाळी ०६ . ०० ते ०७ .३०
संपर्क------०२२ २४३० ०८१७ /  ९६१९८ २८१५७ / ९८६९१ ४२०५५