हजार चुराशीर मा - महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर)

एखादे तत्त्वज्ञानं आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय? ते पटत असल्यास त्याचा आस्वाद जास्त चांगल्या तर्‍हेने घेता येईल काय? हा प्रश्न मला सुरुवातीला "हजार चुराशीर मा" पुस्तक वाचण्याआधी पडला होता. मात्र महाश्वेतादेवींचे हे पुस्तक हाती पडल्यावर हे सारे प्रश्न विरून गेले आणि एक अतिशय सुंदर पुस्तक वाचल्याची अनुभूती मिळाली. मला मिळालेले पुस्तक अनुवादीत होते मात्र त्याने फार काही फरक पडला असे वाटले नाही.

चषक

"वर्तुळाचं टोक झालं आहे माझं आयुष्य. सुरुवात आणि अंत शोधूनही न सापडणारं..." नेहमीसारखाच ’वर्तुळ’ चा प्रयोग रंगला होता. तिच्यातल्या ’राधिकाने’ प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. प्रेक्षागृहात टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती. राधिकाचं दु:ख इतक्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचत होतं की नकळत सगळे राधिकाची व्यथा अनुभवत होते. अमिता मात्र राधिकाला काठावर उभं राहून साकारत होती. भूमिकेत शिरणं म्हणजे प्रेक्षकांचाही विसर पडणं. तसा तो कधीच पडत नाही ह्यावर तिचा ठाम विश्वास होता.

मेकॉलेचे प्रमाणपत्र

    मेकॉले याने २ फेब्रुवारी १८३५ ला किहिलेल्या पत्रात भारताला प्रमाणपत्र दिले आहे ,
I have travel led across length and breadth of this country and I have seen that no person in this country is a beggar or a thief such wealth I have seen in this country such wealth I have seen in this country.people of such caliber that I do not think we would ever conquer the country.
       मेकॉलेच्या या प्रमाणपत्रानुसार मेरा भारत एके काळी खरेच महान होता असे वाटते. 

आपणास माहीत आहे का ?

          इंधन वायू नळकांड्यांचा अपघात झाल्यास नुकसान भरपाईसाठी ४० लाखाचा अपघाती विमा उतरवलेला असतो हे आपणास माहीत आहे का?