रोजच्या प्रमाणे हिंजवडीच्या बस मधून उतरल्यावर त्यांनी अजिबात वेळ न दवडता गाडीला किक मारली आणि तडक आपल्या रस्त्याला लागले. आईकडे जायचा दिवस होता तो.
पूर्वी बस मधून उतरल्यावर ते थोडा वेळ कंपनीच्या त्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या मित्रांशी गप्पा मारायचे. त्यांच्याशी गप्प मारून दिवसभराचा शीण कमी व्हायचा. गप्पा झाल्या की गाडीवरून घरी येणार आणि बायकोच्या हातचा गरम गरम चहा पिणार हे त्यांचं गेल्या दोन तीन वर्षातलं रूटीन. तेव्हा आयुष्य तसं ठीकठाक चाललं होतं.