आता पुढे कोण, असा प्रश्न खूपदा तयार होतो. परंपरेहून निराळे कर्तृत्व , हे असा प्रश्न निर्माण होण्यामागचे कारण आहे. कर्तृत्व निराळे असते म्हणून मोठे ठरते. कर्तृत्व इतके निराळे असते की, ते गाजवणारी व्यक्ती तेथून गेली तर डोळ्यांना खुपणारी रिकामी जागा तयार होते. ही जागा भरली जाईल की नाही आणि भरली गेली तर पहिला ठसा पुन्हा पाहायला मिळेल की नाही, असे मूळ प्रश्नात दडलेले दोन प्रश्न सहज उभे राहतात. नव्या माणसामुळे रिकामी जागा कधी ना कधी तरी अवश्य भरली जाते. पहिल्या प्रश्नाचे विलंबाने का होईना, उत्तर मिळतेच.