पाककलेची ऐशी तैशी !

            अगदी पुराणकालापासून  स्वयंपाकाचे काम स्त्रीवर पडले ते केवळ पुरुषाला शिकारीसाठी किंवा आजच्या परिस्थितीत अर्थार्जनासाठी बराच काळ घराबाहेर रहावे लागते या कारणामुळेच.आता मात्र स्त्रीलाही अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागत असल्यामुळे सध्या काही स्त्रिया अजूनही  स्वयंपाक करतात ते केवळ ती जबाबदारी कधीकाळी अंगावर पडली होती म्हणूनच (आता ही गोष्टही भूतकाळातच जमा होऊ लागली आहे.

आस्तिक आणि नास्तिक... एकाच नाण्याच्या दोन बाजू!

आस्तिक आणि नास्तिक... एकाच नाण्याच्या दोन बाजू!

आस्तिक आणि नास्तिक... दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू. वरवर दिसायला विरोधपूर्ण वाटतात आणि म्हणून तर ह्यांमध्ये एवढे विवाद आणि संघर्ष. आस्तिक आणि नास्तिकामधील भांडण हे असे.... पाहा…
दोन लहान मुली छानपैकी भातुकली खेळत आहेत आणि अचानक दोघींमध्ये भांडण सुरू झाले... 

झोपलेले बर्फ

खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात कोणत्याही संवादाचा पाया असतो समोरच्याचे प्रथम ऐकून घेणे.
काही व्यक्ती समोरच्याची मते आणि विचार दडपण्याचा प्रयत्न करतात.
ते असे लोक असतात ज्यांना स्वतःची मते आणि गृहीतके बदलण्यात स्वारस्य नसते, जी चुकीची  असू शकतात.
असे लोक एका खोट्या गृहीतकाच्या आधारे जगतात की ते नेहमी बरोबरच असतात आणि तेच नेहमी बरोबर असतात.

नाटाचे अभंग... भाग ३५

३४. तरी म्यां आळवावें कोणा । कोण हे पुरवील वासना ।
 तुज वांचून नारायणा । लावीं स्तना कृपावंतें ॥१॥
 आपुला न विचारी शीण । न धरी अंगसंगें भिन्न ।
 अंगिकारिलें राखें दीन । देईं जीवन आवडीचें ॥धृ॥
 माझिया मनासी हे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस ।
 अखंड चरणींचा वास । पुरवावी आस याचकाची ॥३॥
 माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा ।
 एवढ्या आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीचें ॥४॥
 आळवीन करुणावचनीं । आणिक गोड नलगे मनीं ।
 निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रुप ॥५॥

दिवाळीचे दिवस

                "दिन दिन दिवाळी । गाईम्हशी ओवाळी॥ गाईम्हशी कोणाच्या ।लक्ष्मणाच्या ।लक्ष्मण कोणाचा आईबापाचा॥"
आणखी अशीच बरीच गाणी म्हणत संध्याकाळच्या दिवेलागणीच्या वेळेस आपली गुरे घेऊन दारात  गुराखी दिसू लागले की दिवाळी सुरू झाल्याची वर्दी मिळत असे. दिवाळीचा खरा आनंद बालवयातच मिळतो हे तर निश्चीतच ! कारण मोठेपणी, निदान सध्याच्या काळात तरी तो उपभोगायला वेळच नसतो. आमच्या लहानपणी त्यामानाने बरीच स्वस्थता असल्याने मोठ्यांनाही त्यात भाग घेणे शक्य असे. 

चित्रपट समीक्षा: क्रिश ३

चित्रपट समीक्षा - क्रिश ३
दर्जा-   * * * 
चित्रपटाचा प्रकार - वैज्ञानिक कल्पना, फॅण्टसी आणि ऍक्शन 
कलाकार -
निवेदकाचा आवाज - अमिताभ बच्चन
क्रिश आणि रोहित मेहेरा - हृतिक रोशन
प्रिया - प्रियांका चोप्रा
काया -  कंगना राणावत
काल - विवेक ऑबेरॉय
सुरुवातीला थोडक्यात कथा पाहू :