२३-११-२०११.
आता पाहायचे होते राज्य वस्तुसंग्रहालय अर्थात स्टेट म्यूझियम. जातांना रिक्षाने जाऊन येतांना बसने यायचे असे ठरले. रिक्षा भुवनेश्वरच्या अतिशय देखण्या राखलेल्या भागातून जायला लागली. मुंबईतल्या म्यूझियमसभोवतालच्या प्रदेशातले रस्ते किंचित अरुंद केले तर कसे वाटेल तसे. पण मुंबईच्या मानाने झाडे भरपूर. ती देखील चांगली निगा राखलेली.
संग्रहालयाला प्रशस्त, विस्तीर्ण आवार. राजभवन, टी आय एफ आर वगैरे मोजकी स्थळे वगळता मुंबईत एवढे विस्तीर्ण आवार कुठेच नाही. आवारात विविध आकारांच्या चौकटीत सीमित केलेली, सुरेख राखलेली हिरवळ आणि व्यवस्थित कातरलेली झाडे.