भाषांतर, अनुवाद, स्वैर अनुवाद आणि रूपांतर ही चार भावंडं आहेत, असं लहानपणी शिकलो होतो. यांपैकी भाषांतर हे दोन भाषांमधल्या मजकुरांमध्ये अंतर न पाडता करायचं असतं! अनुवाद हा भाषांतरापेक्षा स्वैर असतो, पण स्वैर अनुवाद हा वेगळा असतो. रूपांतर हेदेखील दोन्ही भाषांतलं सौंदर्य न बदलता करायचं असतं! (याखेरीज 'उचल' हेही एक मूळ लेखकांच्या पाचवीला पूजलेलं पाचवं वाह्यात भावंडं आहे.....'आधारित' करणं हा या 'उचल' नावाच्या भावंडाला सुधारण्याचा एक उपाय आहे.)