आणि गाडी थोडीशी वेडीवाकडी चालू लागली. काय झाले आहे ते पाहण्यासाठी ड्राइव्हरने गाडी उभी केली. माझ्या पोटात गोळाच आला. आणि मनात विचार येऊ लागले. 'आता मी विमानतळावर कशी पोचणार? माझे विमान चुकणार तर नाही ना? '
ड्राइव्हरने पाहून सांगितले की पंक्चर झाले आहे. तो खूपच आश्चर्यचकित झाला होता. म्हणाला गेल्या २७ वर्षात असे कधी झाले नव्हते. मी विचारले 'किती वेळ लागेल? ' तर तो म्हणाला १० ते १५ मिनिटे. माझ्याकडे स्टेपनी आहे. मग मला थोडे बरे वाटले. माझा घाबरलेला चेहेरा पाहून तो म्हणाला 'काही काळजी करू नको. मी तुला वेळेवर विमानतळावर पोचवतो'.