ओदिशा - ८: चिल्का सरोवर

चिल्काच्या पश्चिम किनार्‍यावरील भुवनेश्वरपासून १२० किमीवरील रंभा, भुवनेश्वरहून ९७ किमी वरील बरकूल ही भुवनेश्वरपासून सोयीची आहेत. भुवनेश्वरहून ११० किमीवरील सतपाडा मात्र चिल्काच्या पूर्व किनार्‍यावर असून पुरीहून जवळ म्हणजे ६२ किमी आहे. तिथून जलपर्यटनाची सोय आहे तसेच तिथे राहण्यासाठी देखणे यात्री निवास देखील आहे. त्यामुळे पुरीवरूनच सतपाडाला जावे.

ओदिशा - ७ : जगन्नाथपुरी

प्रथम महाजालावरून पुरी मंदिराबद्दल उचललेली माहिती. त्यात वैचित्र्यपूर्ण अशा मनोरंजक धार्मिक कथा देखील दिलेल्या आहेत. त्यात सत्याचा भाग किती ते आपणच ठरवायचे.

प्रवेशासाठी वेळ: फक्त हिंदूंना प्रवेश: पहाटे ०५.३० ते १५.०० आणि १६.०० ते २२.०० जाण्यासाठी सुयोग्य वेळ आहे सकाळी ०६.०० ते ०७.००
कॅमेरा, मोबाईल, टोप्या, कमरपट्टा, चामड्याची कोणतीही वस्तु निषिद्ध आहे.
अहिंदूंसाठी बाजूच्या इमारतीतील रघुनंदन ग्रंथालयाच्या गच्चीतून सोय केली जाते.
दूरध्वनी: ०६७५२-२२२००१-०२

नाटाचे अभंग...३१

३०. बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं ।
 फेडीन संतसंगती धणी । गर्जईल गुणीं वैखरी ॥१॥
 न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं ।
 झालों संताची आंदणी दासी । केला येविशीं निर्धार ॥धृ॥
 जीवनीं राखिला जिव्हाळा । झालों मी मजसी निराळा ।
 पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥३॥
 जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें ।
 ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवंडूनि* ॥४॥
 आस निरसली ये खेपे । अवघे पंथ झाले सोपे ।
 तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥५॥

यांचे काय करायचे?

   अरविंदकडे सहज डोकावलो तो नवरा बायको बराच पसारा काढून बसली होती.अरविंद पुस्तकांच्या कपाटाबाहेर एका स्टुलावर बसून कपाटातली पुस्तकं काढून त्याच्या मुखपृष्ठावरील नाव वाचून काही पुस्तकं एकीकडे तर काही दुसरीकडे टाकत होता  तर वहिनी भांढ्यांच्या पेटाऱ्यातून भांडी काढून कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला टाकत होत्या."काय चाललेय काय तुम्हा दोघांचं ?काही उद्योग नाही म्हणून तू पुस्तकांची आणि वहिनींनी भांड्यांची मोजदाद चालवलीय का?" मी त्यांच्या उद्योगात खीळ घालत म्हणालो.
"नाही रे बाबा,आता हाच महत्त्वाचा उद्योग होऊन बसलाय आता हा ब्लॉक रिकामा करायचा आहे ना ?"