विवाहपूर्व शरीरसंबंध.

नमस्कार.


दोन व्यक्तींमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध असणे वा नसणे हा संपूर्णपणे त्या त्या जोडप्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे, हे मान्य. तरीही खालील प्रश्नांसंबंधी मनोगतच्या सभासदांचे मत अपेक्षित आहे. त्यावरून या विषयाबाबत सर्वसाधाराण सामाजिक मत काय आहे हे समजण्यास मदत होईल. माझ्या शोधप्रबंधाच्या दृष्टीने मला हे जाणून घेण्याची गरज वाटत आहे.


१) भावी जोडप्यांमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध असावेत की नसावेत?


२) तुमचे उत्तर 'असावेत' असे असल्यास का असावेत?


३) तुमचे उत्तर 'नसावेत' असे असल्यास का नसावेत? 


वरील प्रश्नांवर आपले मत नोंदवताना सध्या तरी फक्त भारतीय संस्कृतीच्या दृष्टीतूनच विचार व्हावा अशी विनंती. कारण पाश्चिमात्य संस्कृतीच्या दृष्टीने विचार केल्यास गणिते बदलतील आणि चर्चेला अनेक फाटे फुटू शकतील असे वाटते.


आपला,
(समाजशास्त्रप्रेमी) विश्वास जोगळेकर.