सहज मागील अंक चाळता चाळता विविध भागामधील मनोगती लोकांच्या कट्या/कंपू बद्दल वाचायला मिळाले... विविध भागामधील मनोगती एकत्र येणे हा एक चांगला उपक्रम आहे. मी एकडे आंग्ल देशी गेली ७-८ महिने आहे. अजून कोणी मनोगती एकडे असतील/येत असतील तर जरूर कळवा.
काल एक अत्यंत आगळा वेगळा आणि जितका देखणा तितकाच हृद्य असा कार्यक्रम पहायची संधि मिळाली. प्रख्यात चतुरस्त्र साहित्यिक कै.डॉ.वसंत व-हाडपांडे यांच्या निवडक गीतांच्या कॅसेट व सीडीच्या प्रकाशनाचा हा समारंभ अणुशक्तिनगरमध्ये साजरा झाला.
काल गंमत झाली म.टा. मधे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणारी बातमी आली आणि त्याच दिवशी महाराष्ट्राची करुण कहाणी सांगणारा म.टा. चा अग्रलेख वाचायला मिळाला. मनोगतावर दोन्ही एकदम देऊन चर्चा करता यावी म्हणून येथे ते दोन्ही लेख उतरवून ठेवलेले आहेत.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.