पूरिया-धनाश्री (जालनिशी)

संध्याकाळचं तरल वातावरण असतं. सगळं सावळं झालेलं असतं. कसलीशी गूढ माया दाटून आलेली असते. सगळीकडे एक भारावलेपण असतं. अशा वेळी पूरिया-धनाश्री चे मधाळ सूर कुठूनतरी येतात. त्या हरवत चाललेल्या चैतन्यमयी प्रकाशाचा विरह अधोरेखित करतात.

मनोगतावरील काही शब्दांचे (खरे) अर्थ !

मित्रहो, मनोगतावर नेहमी वापरात येणाऱ्या काही शब्दांचे (गर्भित) अर्थ इथे देत आहे. कृपया हलकेच घ्यावे,अर्थातच कुणालाही दुखावण्याचा उद्देश नाही हे सांगणे नलगे.


अशाच अजून काही शब्दांची मनोगतींकडून भर पडल्यास उत्तमच !


वि. सू. या लेखाला प्रतिसाद देताना तरी खालील वाक्यप्रयोग वापरले जाणार नाहीत अशी आशा करतो. winking

पदरव

फ़ार पूर्वी वाचलेल्या एका कथेचा स्वैर अनुवाद -


गर्द वनराईमधून डोंगरांच्या वळणावळणाने जाणारी ती रेल्वेलाईन होती. छोटी पिंकी आईबरोबर रेल्वेरूळावरून चालली होती. काखोटीला तिची लाडकी चिंध्यांची बाहुली होती. मामाच्या घरून निघताना त्याने  दिलेले वचन आठवून ती मनोमन खूष होत होती. त्याच्या मांजरीला लवकरच पिल्ले होणार होती आणि तिला त्यातले पाहिजे ते निवडता येणार होते. शिवाय मामीला चिमुकले बाळसुद्धा होणार होते.

मेघ राग

रे म प नी नी प म ... रे म म रे .... नीं पं
कित्येक वर्षांपूर्वीची मे महिन्यातली एक दुपार. माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या उत्तरार्धाचा काळ.
मी त्या अवेळी रविकांताच्या अरण्येश्वरातल्या घरी का आलो होतो आणि ती एल्पी रेकॉर्ड लावून ठेवून तो मला एकट्याला सोडून कुठे निघून गेला होता देव जाणे.