शिक्षणासाठी मातृभाषाच योग्य.

आजच्या काळात संगणक आणि नवे तंत्रज्ञान शिकण्यास इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेतले पाहिजे असा बाऊ करणारे सगळे लोक स्वतः मातृभाषेतूनच शिकून  मोठे झाले आहेत हे सांगायचे  ते स्वतः सोयीस्करपणे टाळतात. हे वेड व गैरसमज इतके बळावले आहेत की
स्थळ म्हणून सांगून आलेल्या एक महाराष्ट्रीय मुलीने मला पहिल्या भेटीतच माझी इतर कुठलीही माहिती न विचारता आपल्या मुलांना काँव्हेंट शाळेमधेच घालणार ना ? असा प्रश्न  विचारला होता.
ज्या मुलीचे नावही मला माहित नाही, ती मुलगी आपली मुले हा शब्द वापरते हेच मोठे करुणाजनक नाही काय ? शाळेची व शिक्षणाच्या माध्य्माची बात तर फार लांब राहिली.

खरे तर संगणक व भाषा यांचा काडीचा संबध नाही. संगणक हा कोणत्याही मानवी भाषेवर चालत नाही. संगणक तयार करणाऱ्यांनी त्यांची मातृभाषा रोमन लिपीतून असल्याने, संगणकाची माणसांना प्रतिसाद देण्याची भाषा रोमन लीपीवर अधारलेली ठेवली.
तसेच तंत्रज्ञानाचे आहे. सगळे वैज्ञानिक शोध काही इंग्रजी मातृभाषिकांनी लावलेले नाहीत.
मी स्वत: मराठी माध्यमातून शिकलो. फक्त एक डिप्लोमा केला. मी तर पदवीधरही नाही. पण व्यक्तीगत रस असल्याने संगणक शिकलो. १९८८ -९० मधले संगणक आजच्या इतके पुढारलेले नव्हते व शिकण्यास क्लिष्ट होते. संगणकाकडून लहान सहान गोष्ट करून घ्यायलाही बरेच टंकलेखन करावे लागे. Windows GUI सारख्या सोप्या प्रणाली तर अजिबात नव्ह्त्या.  मी स्वतःच  अभ्यास करून संगणक शिकलो. माझ्या इंग्रजीचे तर १२ वाजलेले होतेच व आजही आहेतच पण आधीपेक्षा जरा कामी (११:४५) असतील !!. त्या मुळे  म्या पामराला इंग्रजी शब्द अडण्या ऐवजी नडायचे !
अर्थ 'नडले' की  कोणाला तरी विचारायचो किंवा शब्द्कोश पहायचो. खरे तर व्यवहाराचे इंग्रजी व संगणाकाचे इंग्रजी वेगळेच आहे.
संगणकाबाबत बोलायचे तर Mouse हा उंदीर अथवा मूषक अर्थाने वापरलेला नाही.
तेच Windows चे आहे व असे अनेक शब्द आहेत जे इंग्रजी असले तरी संगणकाच्या संदर्भात प्रतिकात्मक अथवा मूळ अर्थापेक्षा निराळ्या अर्थाने वापरले जातात.
मी जिथे जिथे संगणकीय क्षेत्रात नोकरी करत होतो तिथे BE,ME,MS केलेले लोक माझ्याकडे समस्यांवर तोडग़ा मागण्यासाठी येत.
२००३ मधे विद्यापिठांच्या पेपर फुटीवर तोड्गा म्हणून, मी १ अभेद्य संगणकीय  आज्ञाप्रणालीची कल्प्नना राष्ट्रपतींकडे पाठवली होती. तिच्यात तथ्य अढळल्याने त्यांनी ती संबधित मंत्रालयाकडे पाठवून दिली होती. पण पुढे केवळ राजकारणामुळे ती  नाकारली गेली किंवा कदाचित काही काळाने कुणी  तरी तोच तोड्गा स्वत:च्या नावावर सरकारला विकेल .  असो ...
सांगायचा मुद्दा हाच आहे की ज्ञानार्जनासाठी इंग्रजी भाषेचा आग्रह धरणे  साफ चुकीचे आहे.

आम्ही शाळेत असताना NCERT चा एक अभ्यासक्रम होता. तो आता बंद केला असल्याचे कळते. ज्यात  केवळ गणित, विज्ञान हे विषय इंग्रजीत होते. बाकी सर्व विषय मातृभाषेत असत. हा एक पर्याय खरे तर ठीक   होता.
खरे तर आज भारतातील त्या त्या राज्याच्या राज्य सरकारांनी   प्रदेशिक भाषेत किंवा राष्ट्र्भाषेत शिक्षण घेतल्यास महत्वाच्या परिक्षेत २% वाढवून देण्याची पध्दत आणावी जेणे करून राष्ट्र्भाषेचे तसेच मातृभाषेचे पोषण व रक्षण होईल; व असे २ % वाढलेल्यांना गुणवत्तेत प्रथम विचारात घ्यावे.
हा असाच काहीसा प्रकार  HCS PCM साठी मुळातच लागू आहे. बारावीत भौतिक  व रसायन शास्त्र तसे गणित हे विषय घेतल्यास विशिष्ठ परिस्थितीत एकूण गुणांच्या टक्केवरीत २% वाढतात.

या संदर्भात  एक उदाहऱण जुजबी माहितीसह देत आहे.

ग्रॅन्ड कॅनियन सहल-झायन कॅनियन भेट

झायन कॅनियन


     झायन कॅनियन हे उटा राज्यातील सर्वात प्राचीन राष्ट्रीय उद्यान आहे. झायन त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेच पण त्याच्या अनेक चिंचोळ्या घळयांसाठीसुद्धा.                


           झायन कॅनियनचे रुप ग्रॅन्ड कॅनियन आणि ब्राईस कॅनियनपेक्षा खूप वेगळे वाटले. झायनच्या मोहकतेमध्ये रौद्र रूप सामावले होते . कदाचित त्या प्रदेशात असणारे अजस्त्र दगड हे सुद्धा त्याचे कारण असू शकेल. झायन कॅनियन नजरेच्या टप्प्यात दिसू लागला तेव्हापासून पवर्ताच्या रांगा अवाढव्य होत गेल्या असे जाणवले. एवढेच नाही तर दगडांची भव्यता, त्यांचे अणकुचीदार सुळके यांनी आमचे लक्ष वेधले. एकूणच प्रदेशाची दुर्गमता ग्रॅन्ड आणि ब्राईसच्या तुलनेत आम्हाला अधिक वाटली.

प्राँस् पालक (कोलंबी पालक )

वाढणी
४ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • १ जुडी पालक
  • १५ - २० मोठ्या कोलंब्या
  • १ कांदा बारीक चौकोनी चिरलेला
  • आख्खा गरम मसाला ( काळीमीरी ८-१० , लहान तमाल पत्र , थोडी दालचीनी)
  • मीठ चवी नुसार
  • ३ चमचे तेल

मार्गदर्शन

दाल तडका

वाढणी
६-७ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • तूर डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ प्रत्येकी एक-एक मूठ
  • लसूण ५ पाकळ्या
  • तिखट १ टीस्पून
  • तेल १ डाव
  • कोथिंबीर दोन टेबल स्पून
  • हळद अर्धा टी स्पून
  • मीठ चवीनुसार.
  • पांढरे जीरे दीड टी स्पून
  • मोहरी १ टी स्पून

मार्गदर्शन

सर्व डाळी तासभर एकत्र भिजत ठेवा.

शेवयांचा उपमा

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • कुस्करलेल्या शेवया १ वाटी
  • साजुक तुप अथवा तेल
  • मोहोरी, हिंग
  • मीठ, साखर, लिंबू १/२
  • कांदा १/२, हिरव्या मिरच्या ३,
  • भाजलेले शेंगदाणे १०/१२

मार्गदर्शन

१ चमचा साजुक तूप अथवा तेलामधे शेवया गुलाबी रंग येईपर्यंत भाजुन घेणे. शेवया भाजताना गॅस मंद ठेवणे.

शेवयांची खीर.

वाढणी
७-८ जणांसाठी.

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • बारीक शेवया मुठभर
  • दूध १ लिटर
  • साखर आवडीनुसार
  • वेलची पूड १ टीस्पून
  • तूप शेवया परतण्या साठी.

मार्गदर्शन

शेवया केसांसारख्या बारीक घ्याव्यात. (शब्दशः नाही, अंदाजाने)

शेवया कुस्करून २-३ चमचे साजूक तुपावर लालसर रंगावर परतून घ्याव्यात.

दूध मंद गॅसवर उकळायला ठेवावे. त्यात वेलची पूड टाकावी.

दूध उकळले की त्यात परतून घेतलेल्या शेवया टाकून शिजवून घ्याव्यात.

नमनाला तेल किती?

 


नमनाला तेल किती? घडाभर की धडाभर?


मी शिकताना "धडाभर" असे शिकले आहे पण काही नामवंत लेखकांच्या पुस्तकात "घडाभर" असे वाचण्यात आले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला.


लहानपणी आम्हाला असे सांगितले होते की पूर्वी तेल मोजण्यासाठी एक माप असायचे, त्याला "धडा" म्हणत. जसे धान्य मोजण्याची मापे म्हणजे "चिपटे, मापटे, अधुली, पायली.. " असायची तसेच "धडा" हे तेलाचे माप होते.

वांग्याचे काप

वाढणी
एका मोठ्या वांग्याचे साधारण १० काप होतात. त्यानुसार वाढणी बदलेल.

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • वांग्याचे गोल काप (चकत्या), मीठ, तिखट, तांदुळाची पिठी, तेल

मार्गदर्शन

कृती -

१. वांग्याचे मध्यम जाडीचे गोल काप करावे. [यासाठी 'भरताचे वांगे' वापरणे. छोटे काटेरी वांगे नव्हे.]

२. तांदुळाच्या पिठीत चवीनुसार मीठ, लाल तिखट कालवून घ्यावे.

३. वांग्याचे काप या पिठीत घोळून घ्यावे.

४. तापलेल्या तव्यावर हे काप तेलावर परतावे. कापांच्या कडेने तेल सोडणे.