पांथस्थांचे दुसरे मन-भाग २
(भाग १-स्वप्नात आहे)
मनापासून प्रेम करावं... तर ...आपल प्रेम हसतं..
कारण ..या जगात प्रेम करावं ..असं खूप काही असतं..
प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच स्वप्ने असतात..
आणि ती खूप वेडावणारी असतात.
स्वप्ने ही खरी व्हावी..आपल्या जीवनात बहार यावी..
जणू मिटलेल्या कळ्यांना भल्या पहाटे जाग यावी..
महत्त्वाच्या वळणावरचं ते आशावादी दार असतं..
अचूक किल्लीने ते उघडायच असत
मनापासून प्रेम करावं...आपल प्रेम हसत
या जगात प्रेम करावं ..असं खूप काही दिसत.
अशाच एका सकाळी एक स्वप्न निसटत
पाऱ्याच्या प्रवाही खूप काही विस्कटत
मग कित्येक रात्री उरलेल्या स्वप्नांनी जागवायच्या
आशेच्या किरणांनी तारका फ़ुलवायच्या
खंगलेल्या मनाला, थकलेल्या मनाला , पुन्हा खुलवायच
ह्याच नावही प्रेम हेच असतं..
मनापासून प्रेम करावं... मग ...आपल रुसलेल प्रेम हसतं..
कारण ..या जगात प्रेम करावं ..असं खूप काही असतं..