वाढणी
मला एकट्याला पुरते
पाककृतीला लागणारा वेळ
30
जिन्नस
- २ वाट्या कच्चे शेंगदाणे
- पाणी
- मीठ
मार्गदर्शन
कच्चे शेंगदाणे मध्यम आकाराच्या पातेल्यात पाण्यात भिजत घाला. शेंगदाणे बुडुन वर २५ मि.मि. पाणी राहू द्या. त्या पाण्यात २ चमचे मीठ घाला. १५ मिनिटे भिजल्यावर विस्तवावर त्या पाण्याला चांगली उकळी येऊन २-३ मिनिटे उकळू द्या.
थोड्या वेळाने ते दाणे रिवळीत किंवा चाळणीमध्ये घालून ५ मिनिटे निथळू द्या.