काश्मिर, पाकिस्तान आणि मी.


देश १५ ऑगष्ट ४७ साली देश स्वंतत्र झाला. म्हणजे नक्की काय झाले? इंग्रांजानी आपल्या अधिपत्याखालील प्रदेश भारताला दिला. यात संस्थाने सामील नव्हती.

संस्थांनाचे काय? 
त्यांना स्वतंत्र रहायचे होते. साम, दाम, दंड पध्दतीने त्याना भारतात सामील केले गेले. सरदार पटेलानी हे काम कुशलतेने केले.


काश्मिर

फाळणीमध्ये सीमा ठरली नव्हती, मुस्लिम बाहूल्य असलेला प्रदेश पाकिस्तानला मीळणार होता. परंतु राजे हरिसिंगांना स्वतंत्र काश्मिर हवा होता. मुस्लिम बहुसंख्य असल्यामूळे हा प्रदेश आपलाच होणार हे पाकिस्तान वाटले होते, हरिसिंगांचा निर्णय कळाल्यानंतर त्यानी तो प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या.


हरिसिंगाने भारताच्या नवशासनाकडुन विलीन न होता सैनिक साह्य मागीतले, ते नाकारले गेले. एकतर भारताच्या संघीय ढाच्यात विलीन व्हा वा तुम्हीच तुमचा बचाव करा असा निरोप देण्यात आला.


हरिंसिग व काश्मिर जनतेचे नेते शेख अब्दुला यांनी ३७० व्या कलमाची अट घालून सामिलीकरणावर सही केली. त्यानूसार काश्मिर स्वतंत्र रहावे की भारतात रहावे हे ठरवीण्याचा अधिकार काश्मिरी जनतेचा आहे व भारताने काश्मिरमध्ये जनमत घेवून निर्णय घ्यावा. असे ठरले.


पूढे भारताने टोळीवाल्यांना पिटाळुन लावले व जनमताचे काय झाले ते माहीत नाही.


वरील माहीती एकीव आहे, त्यात काही चूक असल्यास निदर्शनास आणावी.


-----------------------------------------------------------


" पाकिस्तान आणि मी " पुढच्या लेखात.