परदेशातुन...

मी द. कोरियाला आलो तेंव्हाची गोष्ट. इथे आल्यावर मला इतर भारतीयांनी कोरीअन लोकांबद्दल सांगितले. ते मी माझ्या मुंबईच्या मित्राला सांगितले, तेंव्हाचा हा संवाद. हा मित्र बी. एम. सी. (बृहन्मुंबई महानगर पालिका) नामक सरकारी कंपनीत "श्वान-नियंत्रण" विभागात कार्यरत आहे.

मी :- तुला माहिती आहे, इथल्या लोकांना कुत्रे खुप आवडतात.

तोः - असं. लगेच पाठवून देतो... इथे खुप झाले आहेत.

मीः- अरे तसं नाही. म्हणजे पाळायला नाही आवडत जास्त.

तोः- मग ?

मीः- त्यांना खायला खुप आवडते. इथे "डॉग फुड" खुप महाग आहे.

ताणलेलं सरप्राईज!

(टीपः-सरप्राईज! सरप्राईज! ही कथा वाचल्यावर काही आंबटशौकीन वाचकांनी 'पिक्चरमध्ये काय झालं? ' अशी निर्लज्जपणे पृच्छा केली. असला भोचकपणा मला मुळीच आवडत नाही. म्हणून खरं तर माझ्या खाजगी गोष्टी वरची ही कथा लिहीणार नव्हतो. पण काय करणार? हल्ली पापाराझींचा इतका सुळसुळाट झालाय ना की त्यामुळे कुठलही गुपित फार दिवस कुपित राहत नाही. असल्या आगंतुक लोकांनी भलते सलते फोटो घालून सनसनाटी मथळ्याखाली उलट सुलट लिहीण्यापेक्षा आपणच सत्य परिस्थिती कथन करावी असं ठरवून मी हे नाईलाजास्तव लिहीत आहे. निदान 'प्रकाश माटेचं काय झालं?

देशपांडे (भाग - अंतिम)

या लांबलचक विनोदाची, विनोदाची म्हणा किंवा विचित्रपणाची म्हणा, सुरुवात ही अशी झाली.  पुढल्या गोष्टी - म्हणजे देशपांड्यांचा स्वतःचं रुप पालटवण्याचा प्रयत्न, त्यांचं साधूसारखे लांब केस अन दाढी राखणं, डोळ्यावर चष्मा लावायला सुरुवात करणं वगैरे वगैरे - या साऱ्या आपोआप घडल्यासारख्या घडायला लागल्या.   कुणी ओळखू नये म्हणून देशपांड्यांनी वेगळं रूप धारण केलं.   पण नेमकं याच कारणानं त्यांनी स्वतःच्या परतीचे एक एक दोर पण कापले.   देशपांड्यांच्या स्वभावातला सुप्त आडमुठेपणा इथेही जागृत झाला.   "बघू बरं किती दिवस तिला आपली उणीव जाणवते.