"येत्या शनीवारी मोकळा आहेस ना?" श्री. पार्क श्रीकांतला विचारत होते. "हो, आहे की. का बुवा काही जास्तीचे काम आहे ऑफिसमधे?" श्रीकांतची शंका. "अरे, आपल्या पूर्ण गटाला अर्धा दिवस प्योंगतेकला जायचे आहे विसरलास की काय?" पूर्व आशियातल्या इलेट्रॉनिक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद.
काही माणसांचं वैशिष्ट्यच असं असतं, की ती थेट काळजात घुसतात. सर्वार्थानं ती परिपूर्ण असतात, किंवा आदर्श असतात असं मुळीच नाही. पण त्यांच्यातला एखादाच गुण एवढा जोरकस असतो, की रूढ अर्थानं असलेले इतर दुर्गुण त्यापुढे झक् मारतात!
मी अगदी लहान असताना कुठल्यातरी वर्तमानपत्रात - मला वाटतं महाराष्ट्र टाईम्स किंवा लोकसत्ता असेल बहुतेक - एक बातमी का एक गोष्ट असं काहीतरी वाचल्याचं आठवतं. एका माणसाची गोष्ट. असं समजा त्या माणसाला आपण देशपांडे म्हणू. देशपांडे - जो कित्येक वर्षं आपल्या बायकोपासून दूर राहिला. तसं पाहिलं तर यात काय विशेष? म्हणजे अगदी बातमी बनण्यासारखं काय? उलट आजकाल तर कुणी बायकोपासून अजिबात दूर गेला नाही तर अशा माणसाचीच बातमी होऊ शकेल कदाचित. पण देशपांडे बायकोपासून दूर तर राहिलेच आणि शिवाय बातमी बनण्यासारखे राहिले.
शाळेतल्या वरच्या वर्गांत गेल्यावर त्या वर्गांना लावलेल्या मराठी भाषेच्या पुस्तकांमध्ये मराठी साहित्यातले निवडक उतारे शिकायला मिळायचे. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला किंवा त्याच्या खाली त्याच्या लेखकाचा किंवा कवीचा संक्षिप्त परिचय दिलेला असायचा. त्यात त्यांच्या सुप्रसिद्ध साहित्यकृती आणि त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती असायची. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी ती महत्वाची असल्यामुळे आम्ही इतिहासातील सनावलीप्रमाणे पाठ करत असू. "अमक्या अमक्या साली तमक्या शहरात झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. " हे वाक्य त्यात हमखास असायचे.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.