सगळ्या जगात हे कोडं आइन्स्टाइनचं कोडं Einstein's Riddle म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने म्हणे खूप लहान असताना हे रचलं होतं. तन्वीर मणियार नावाच्या माझ्या एका सहकाऱ्याने आमच्या कार्यालयाच्या ब्लॉगवर टाकलं होतं. तन्वीरचे आभार मानून हे कोडं मनोगतींच्या डोक्याला खाऊ म्हणून देत आहे.
१. पाच घरे आहेत.
२. ब्रिटिश मनुष्य लाल घरात राहतो.
३. स्पॅनिश माणसाकडे कुत्रा आहे.
४. हिरव्या घरात कॉफी प्यायली जाते.
५. युक्रेनिअन माणूस चहा पितो.
६. हिरवे घर पांढऱ्या घराच्या लगेच शेजारी उजवीकडे आहे.