वेगळी वाट... (शेवट)

त्याच्या समोर आणि हॉटेल मधल्या बाकीच्याची माफक करमणूक नको व्हायला असे वाटून पैसे चुकते करून अर्पिताने राधिकासह तिथून काढता पाय घेतला.. पण राधिकाला दुसरी बाजू ही समजावून सांगायला हवी आहे.. नव्हे त्याची फार गरज आहे हे तिला मनोमन पटलं होतं..

*****
पुढे चालू..
*****
रिक्षात बसल्यावर अर्पिता म्हणाली.

मला भविष्य दिसतं .... !

हा अनुभव मला बरेचदा आला आहे. तुमच्यापैकी काहींना आला असण्याची शक्यता आहे.

एखादेवेळी कोणी माझ्याशी बोलत असेल तर अचानक मला वाटते की आता ही व्यक्ती हे वाक्य म्हणणार आहे किंवा अशी हालचाल करणार आहे.... कधी हे मला ती गोष्ट घडण्याच्या लगेच आधी कळते तर कधी १-२ दिवसांपुर्वी तर कधी १-२ महिने किंवा काही वर्षाआधीसुद्धा. पण ते कधी स्वप्नाच्या स्वरुपात असते तर कधी जागेपणी विचारात हरवून गेलेलो असताना....

हे ६ व अवयव नाही हे नक्की कारण जी गोष्ट दिसते (किंवा मी अनुभवतो) ती पुढे केंव्हा घडेल हे मला महिती होत नाही....

वेगळी वाट... (पुढे चालू)

दमलेल्या अर्पिताला तावातावाने काही तरी बोलायचं होतं पण डोळ्यावर येणार्या पेंगे मुळे ती कधी झोपली, तिचं तिला ही कळलं नव्हतं.. 
*****
पुढे चालू ..
*****

पेरूचा पापा ते मोलाचा कावा

 

मुंबईत राहिलेल्या माझ्या पिढीतल्या बहुतेक मध्यमवर्गीय मराठी माणसांना 'पेरूचा पापा' नक्की माहीत असेल, कदाचित ते सुद्धा माझ्याप्रमाणे रोज सकाळी तो घेऊनच कार्यालयासाठी प्रस्थान करत आले असणार. प्रख्यात कथालेखक व. पु. काळे यांनी आधी 'पेरूचा पापा' शोधून काढला आणि नंतर तो घरोघरी पोचला असे मला परवा कोणीतरी सांगितले.