मरेनावर लवकर आलो याचा आनंद शांताला तर झालाच. पण बिल्लोही माझ्या पायात-पायात म्यॉव-म्यॉव गोड आवाज करत फिरत होती. नाकेर नर-मादी पण जवळ आले. त्यांना हात मी काही लावायची नाही. तुम्ही आपलं दुरुनच बरं म्हणून हातभर लांबच असायची. त्यांच्या चपट्या-दणकट-जरा पसरट-उग्र, चोचीला मी भ्यायचीच. बिल्लो आपला लाड करून घेऊ लागली. म्हणून मग गबरुही माझ्या पायाला हट्टानं रेलून लाड करून घ्यायला बसला
हिरवाईतली अगदी आतली गांधारी मला परमप्रिय आहे. इथली पहाट-सकाळ-दुपार-सांज-रात्र-मध्यरात्र निराळीच जाणवते. नि माझा जीव या निराळेपणातच गुरफटला. मग हिरवाईतला माझा इथला प्रत्येक दिवस खुलत उलगडला.