अमेरिकायण! (भाग २१ : लास वेगास २ - कसिनोंच्या शहरात)

दुपारच्या मस्त झोपेनंतर जेव्हा सायंकाळी वेगासच्या रस्त्यांवर बाहेर पडलो तेव्हा हेच का ते सकाळी पाहिलेलं वेगास असा प्रश्न पडला. संध्याकाळ होता होता सुरू झालेल्या रोषणाईने त्या शहराचा नूर  पूर्णपणे पालटला होता. शहर एकदम जिवंत झाले होते. स्ट्रीपवरून फिरायला सुरुवात केली. एकेक कसीनो म्हणजे अबब!! प्रत्येक कसीनोला संपूर्ण शहराचा दर्जा देता येईल.

दाण्याची ओली चटणी

वाढणी
४ जणानसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
10

जिन्नस

  • शेंगदाणे (पाव वाटी)
  • हिरव्या मिरच्या २-३
  • लसूण पाकल्या ५-६
  • जिरे - पाव चमचा
  • मीठ - चवीप्रमाणे
  • तेल आणि मोहरी - फोडणीसाठी
  • दही

मार्गदर्शन

शेंगदाणे, मिरच्या, लसून, जिरे मिक्सर मधून थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. त्यात दही मिसळावे. चविप्रमाणे मीठ घालवे. एकत्र कालवावे. वरून तेल व मोहरीची फोडणी द्यावी. 

टीपा
नाही.

माहितीचा स्रोत
अर्थातच आई

गांधारी (२)

पहाटे-पहाटे बाजूच्या भिंतीपल्याडनं कोंबड्याची बांग ऐकू आली. नि बांग मोजता-मोजता परत गाढ झोपले. उजाडू लागलं तसं एक-एक पाखरांचा आवाज घुमू लागला. हिरवाई बोलकी होऊ लागलेली. दयाळाची शीळ तर ऐकतच राहावी अशीच होती. त्यांचं एकमेकांना साद देणं सुरू झालं. एक-एक आवाज ऐकत आळसावत पडून होते. दाराच्या वरचा भाग फूटभर मोकळा होता. तिथनं दिसलं की फटफटत होतं. जरा वेळानं मी उठून बाहेर आले.

व्हाईट पोहे....

वाढणी
२/३ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
5

जिन्नस

  • जाडे पोहे-३ वाट्या
  • ओले खोबरे- १ वाटी
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • लिंबू चवीनुसार
  • साखर लिंबाच्या प्रमाणात
  • हिरवी मिरची बारीक चिरून

मार्गदर्शन
जाडे पोहे धुवून घ्यावेत. त्यात ओलेखोबरे, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, लिंबाचा रस, मीठ, साखर सगळे घालायचे. नीट एकत्र मिसळून घ्यायचे आणि गटं स्वाहा करायचे.

टीपा

व्हाईट पोहे हे नाव माझ्या मुलीचे. मी झटपट पोहे म्हणायचे.

अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास-३

शि. टी. १: त्यांना 'एकता कपूर थिसीस' तेव्हाच अवगत झाला होता. (ते डोळस कवी आहेत. )
शि. टी. २: म्हणजे हनीमूनचे का रे भाऊ?

कविता

कवींना 'जे न देखे रवी' ते दिसतं म्हणे. बरोबरच आहे. रवी बिचारा (न) बोलून (न) चालून निर्जीव! त्याला दिसणार कसं? पण ही ओळ एका कवीचीच असल्यामुळे कवी किती डोळस असतात हे आपल्या चांगलं लक्षात येईल!

आध्यात्मिक उन्नती (भाग - ३)

"आज देवगडला खासदार आले होते.  त्यांच्या पुढे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी मी अगदी ठामपणे मांडली." आत येता येता उषा सांगत होती.

" पण मला नाही वाटत हे सरकार कानवलीसाठी काही करेल. " आणि मी तिथेच आहे म्हटल्यावर म्हणाली "आपणही आलेला आहात वाटतं?  अर्थात आपल्याला या असल्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नसेल ना? "

"देणं घेणं नाही कसं? अगदी जरूर आहे.  पण आजपर्यंत माझं मत कधी ऐकून घेतलयस तू? मला तर खरंच वाटतं की हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे."

"खरंच? "

कुठे बरं वाचलंय हे? -१०

आम्ही  सर्व भावंडे त्यांना 'दादा' म्हणत असू. मध्यम उंची. काळा ओबडधोबड चेहरा. मुद्रा करारी. पण लहान मुलांशी बोलताना डोळ्यांमध्ये एक खट्याळ छटा. धोतर, पांढरा सदरा, खाकी कोट आणि काळी टोपी हा त्यांचा नित्याचा पेहराव. हातात काठी, मात्र त्या काठीचा उपयोग आधारापेक्षा इतरांना दमबाजी करण्यासाठी जास्त. मध्यमवर्गीय नोकरपेशे 'ऑफिसमधून' येत असतात. दादा 'कामावरून' यायचे आणि येताना आम्हा मुलांसाठी नानकटाई आणायचे.