टिचकीसरशी शब्दकोडे ३६

टिचकीसरशी शब्दकोडे ३६

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
बैठकीत नकार नसला की चक्रे ह्याभोवती फिरतात. (२)
चुकीच्या अवतारांनंतर अनुमोदन देण्याने चमकणारा रंग. (३)
१३ सुभद्रा व कर्णामध्ये विरघळविणारा. (३)
२४ अगदी सुरवातीचे एक नक्षत्र. (२)
३२ समेनंतर दर महिन्याला असे शब्द जुळलेले असतात. (४)
४१ एक वेल राहत नसे. (२)
४३ असा  झाल्यास दिवा चालू तर दरवाजा बंद होतो. (३)
नवऱ्यापर्यंत पोहोचणारी रडारड. (३)
ह्याला  हाक मारणे  म्हणजे एका साधूकडे गुणवत्तेत बरोबरी मागणे. (५)
घडातील फळ रुमालात गुंडाळून साधू लोक गळ्यात घालतात. (५)
येथे धान्य साठवतात ते खेपेवर खेप घालण्यात मिळेल. (२)
१५ कौशल्याआधी वेदना असताना उसाचा रस फार वेळ ठेवल्यावर असा झाला. (४)
३१ नुकताच तयार केला असता जाणारा मागे फिरला. (२)