घटस्फोटात पतिपत्नी एकमेकांविरुद्ध तर जातातच पण तसे करून त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी राहणे हे निसर्गाविरुद्धही जात असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आलेले आहे!
अमेरिकेतच नाही तर चीनसारख्या विकसनशील देशातही धार्मिक बंधने असूनही घटस्फोट वाढत आहेत. त्यामुळे पाणी जागा आणि ऊर्जा ह्यांचा वापरही वाढत आहे. नवे घर बांधले की आत कमी माणसे असली तरी बांधकामाची संसाधने आणि जागा काही कमी लागत नाही. हवा तापवायला, थंड करायला इंधन लागतेच. घरात दोन माणसे असोत वा चार फ्रीज तितकीच ऊर्जा खातो. २००५ मध्ये एकट्या अमेरिकेतच घरे नांदती राहिली असती तर ७३ अब्ज किलोवॉट तास वीज आणि ६२७ अब्ज गॅलन पाणी वाचले असते. अमेरिका, ब्राझील, कोस्टा रिका, इक्वाडोर, ग्रीस, मेक्सिको द. आफ्रिका, ह्या देशांमध्ये ९८ ते २००२ दरम्यान सगळे संसार सुखाने नांदले असते, तर ७४ लक्ष घरे कमी बांधली गेली असती. घटस्फोटित घरांमुळे दरडोई ३३% जास्त खोल्या वापरल्या जाऊ लागल्या.