टिचकीसरशी शब्दकोडे १०

टिचकीसरशी शब्दकोडे १०

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
आपल्या भेटीचे ठिकाण. (४)
११ महागाईने मन इतकं विटलंय की बाजारात जायची इच्छाच होत नाही. (२)
१३ जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी आपल्या संस्कृतीचे जतन करतात. (२)
२१ "बघणाऱ्यांनो करणाऱ्यांना मदत करा" हे सांगण्यात अडकलेला सेवक. (३)
२४ ब्राह्मणाच्या बुद्धिचातुर्याने प्रभावित होऊन राजाने त्याचा यथोचित सत्कार केला. (२) 
३१ गोडी नाही असे म्हणताना हिला गोडी समजते! (३)
३४ आठवण असणारी मैत्रीण. (२)
४१ पंडित नेहरु, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यात भारताच्या पंतप्रधान-पदाखेरीज आणखी कोणता सारखेपणा आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा. (५)
आम्हाला दिसते भाकर चतकोर
ह्या कवीला दिसतो मोर नि चकोर
उगाच नाही होत रानकवी----(४)
जिच्यावर राष्ट्रपित्याचे चित्र असते तिच्यात अर्थ असतो. (२)
आवश्यकतेत बदल करून हा सकाळी लवकर उठायला लागतो! (३)
अब्रू उलटली तर बारा वर्षे साधना करूनही ती परत येत नाही. (२)
शिंपल्यातुनी -- घडवी आभाळातिल पाणी
दुर्गा झाली गौरी त्याची ऐका नवलकहाणी (२)
२२ तुमच्याशिवाय इतकी वर्षे सरली पण तुमची उणीव भासणे अजून कमी झाले नाही. (३)
२४ जसजसे दिवस सरतात तश्या पुष्कळ गोष्टी विस्मृतीत जातात. (३)
२५ हे कितीही केले तरी वाळूतून तेल काढणे अशक्यप्राय आहे हे लिहिल्यामुळे मास्तरांनी जी.एं.ना चौदावे रत्न दाखवले.(३)
३३ मनातल्या एका कोपऱ्यावर अधिराज्य करणारी दुधावरची साय. (२)