बाजाराचा समतोल

काही वर्षांपुर्वी माझ्या बहिणीने मला एका इंग्रजी चित्रपटाची कथा सांगितली होती.
एका शहरात मंदीचे वातावरण असते. लोक जास्त काही खरेदी करीत नसतात. काय चाललंय कोणाला काही कळत नसते. एक दिवस एक माणुस कार विक्रेत्याकडे जातो आणि म्हणतो की मला ती महागडी कार खरेदी करायची आहे. मी ख्रिसमसच्या दिवशी घेऊन जाईन. हा विक्रेता विचार करतो की कित्येक दिवस आपण घरात काही चांगल्या,वेगळ्या वस्तू विकत घेतल्या नाहीत. आता जर ही कार विकली गेली तर आपल्याला भरपूर पैसे (रुपांतर :) )मिळतील. मग का नको आपण ही थोडा खर्च करूया. म्हणुन तो घराचे सामान विकणाऱ्याच्या दुकानात जातो आणि स्वत:च्या घराकरीता चांगले सामान घेतो. आता पुढे हा दुसरा विक्रेता स्वत:करीता काही गोष्टी खरेदी करतो. अशा प्रकारे त्या शहराच्या बाजारात एक प्रकारचे नवचैतन्य येते. प्रत्येक जण सणाकरिता काही ना काही खरेदी करतो. शहरातील मंदीचे वातावरण निवळून निघते.
काही दिवसांनी कळते की जो माणूस ती कार खरेदी करण्याकरीता गेला तो वेडा/मंद असतो. तो काही ती कार घेऊ शकत नाही.

आझाद हिंद सेना १३ - हंगामी सरकारची स्थापना

आपल्या देशाबाहेर पडुन साडे तीन वर्षे उलटुन गेलेल्या नेताजींना आपल्या मातृभूमीत परतायची अनिवार ओढ होती, पण त्यांना देशात प्रवेश करायचा होता तो शत्रूचा नि:पात करून व आपल्या मातृभूमीला दास्यमुक्त करून आपल्या सार्वभौम देशाचा एक सन्माननिय नागरिक म्हणुन. गेली साडेतीन वर्षे केलेली अपार मेहेनत व नियोजन आता फलस्वरुप होण्याची लक्षणे दिसु लागत होती, मात्र नेताजी म्हणजे दिवास्वप्न पाहणारा आशावादी मनुष्य नव्हता तर तो एक द्र्ष्टा होता. संपूर्ण तयारीनिशी व ताकदीनिशी हल्ला चढवुन तो निर्णायक व यशस्वी होण्याची पूर्ण खात्री झाल्यावर मगच ते आपला निर्णायक घाव घालणार होते. आणि असा निर्णायक हल्ला यशस्वी होण्यासाठी केवळ सैन्य व शस्त्रे पुरेशी नसून आपल्या देशातील बांधवांचा आपल्या प्रयत्नाला मनापासून पाठिंबा असणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते. किंबहुना जेव्हा आझाद हिंद सेना पूर्वेकडुन परकिय सत्तेवर बाहेरून हल्ला चढवेल त्याच वेळी जागृत झालेली व स्वतंत्र्यासाठी सज्ज झालेली सर्वसामान्य भारतीय जनता आतुन उठाव करेल व या दुहेरी पात्यांत परकियांचा निभाव लागणार नाही आणि नेमका तोच स्वातंत्र्याचा क्षण असेल हा नेताजींचा ध्येयवाद होता.

भारतीय संस्कृती (दिवाळीचा अविस्मरणीय अनुभव )

दिवाळी म्हणजे आपणा भारतीयांचा सर्वात आवडता सण ! दसरा दिवाळीचे आमंत्रण देऊन जातो आणि दिवाळीची जय्यत तयारी सुरू होते. घर आवरण,फराळ,खरेदी त्यात विशेष म्हणजे बच्चेकंपनीसाठी फटक्यांची खरेदी.मी शिक्षण आणि नोकरीसाठी घराबाहेर राहते,तेव्हा दिवाळीसाठी घरी जाण्याचा बेत होता.माझ्या मित्र-मैत्रिणीनमध्ये बरेच जण माझ्यासारखेच घराबाहेर राहतात.त्यामुळे दिवाळी सेलेब्रेशन म्हणून आम्ही ७ नोव्हेंबरला रात्रीच्या जेवणासाठी पुण्यातील घोले रोडवर असलेल्या " शबरी "  हॉटेलमध्ये गेलो होतो.तेथे मी जो अनुभव घेतला तो मझ्यासाठी नवखाच होता.

(२००००) वरुण

सन २८ नोव्हेंबर २०००, बरोब्बर सात वर्षांपुर्वी डॉ. रॉबर्ट मॅकमिलन एक परीक्षण पुर्ण करून उत्साहात होते. हाच तो शोध होता जो त्यांना खगोलाभ्यासकांत मान मिळवून देणार होता. गेले वर्षे ऍरिझोना विद्यापिठात चालणाऱ्या "स्पेसवॉच" या उपक्रमाचे ते प्रमुख होते. 'नेपच्युनबाह्य वस्तु' या विषयावर काम करणाऱ्या ह्या उपक्रमाच्या नावावर आजपर्यंत "६०५५८ सेशल्स", "५१४५ फोलस", "स्पेसवॉच धुमकेतु" इ. शोध होते. मात्र आज डॉक्टरसाहेबांना मिळालेली वस्तु एका नव्या "लघुग्रहसदृश गोला"चा जन्म होता.

वारी--८

          आम्ही गेलो तो मे महिना असल्यामुळे हवा बरीच उष्ण होती‌. सकाळी तर कडक ऊनही असे.एक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश पडला असताही सुजित छत्री घेऊन कामावर निघाला हे पाहून मी आश्चर्याने त्याला छत्री घेण्याचे कारण विचारले तर त्याने संध्याकाळी पाऊस येणार म्हणून ही खबरदारी असे सांगितले.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी तो कामावरून आला त्यावेळी खरेच धोधो पाऊस कोसळत होता. यावरून पुण्यातील सिमला ऑफीस ऊर्फ ऑब्झर्वेटरीविषयी मला एकाने सांगितलेला किस्सा आठवला.पुण्यातील वेधशाळाचे कार्यालय इंग्रजांच्या काळी सिमल्यास होते म्हणे.त्यावेळी जो व्हाइसरॉय होता त्याला एकदा त्याच्या खास दोस्ताना पार्टी द्यायची होती आणि ती त्याच्या बंगल्याच्या पटांगणात ! त्यामुळे वेधशाळाप्रमुखाला फोन करून त्याने पार्टीच्या  दिवशी संध्याकाळी हवा कशी असेल याविषयी विचारणा केली त्यावर त्याने साहेबांचे काम म्हणून जरा पहाणी करून सांगतो असे सांगितले.थोड्या वेळाने त्याने साहेबांना फोन करून "काही काळजीचे कारण नाही हवा एकदम स्वच्छ राहणार आहे पाऊस पडणार नाही "असे सांगितले‌‌. साहेबानी मग पार्टीचे निश्चित करून मित्रांना आमंत्रणे दिली.पार्टीच्यादिवशी सकाळी साहेब फिरायला बाहेर पडले असता  त्यांना एक लमाण आपली गाढवे हाकीत रस्त्यावरून जाताना दिसला.त्याने साहेबाच्या बंगल्यासमोरील गडबड पाहिली होती.आणि उत्सुकतेने दरवानाला त्यामागचे कारणही विचारले होते.त्यामुळे साहेबाला पाहून आदबीने नमस्कार करून तो लमाण म्हणाला,"साहेब आज संध्याकाळी पाऊस येणार आहे.""तुला कसे कळले?" साहेबाने विचारले." माझ्या गाढवांना कळते पाऊस येणार असेल तर."त्याचे उत्तर ऐकून साहेबाला हंसू आवरेना तरीही घरी परत आल्यावर त्याने वेधशाळाप्रमुखास फोन करून खरच पाऊस येणार नाहीना याची चौकशी केली.आणी त्याला पाऊस निश्चित येणार नाही अशी ग्वाही मिळाली.त्यामुळे साहेब निश्चिंत झाले.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी पार्टी रंगात आल्यावर अगदी धोधो पाऊस आला आणि पार्टीच्या रंगाचा नेरंग झाला‌. साहेब एकदम संतापले आणि त्यानी वेधशाळेचे ते ओफिसच तेथून उचलून पार पुण्यात नेऊन टाका असा हुकुम दिला.तेव्हापासून म्हणे वेधशाळा पुण्यात आली सिमला ऑफिस या नावामागचा इतिहास असा आहे म्हणे ! आंतरजालावर पाहता खरोखरच १९२८ मध्ये शिमला ऑफिस पुण्यात स्थलांतरित झाल्याचा उल्लेख वाचून कदाचित गोष्ट खरीही असेल असे वाटले आणि अजूनही त्यांनी आपली चुकीचे भाकित करण्याची परंपरा मात्र सोडली नाही हे लक्षात आले..त्यामुळे वेधशाळेने पाऊस पडणार नाही असा हवाला दिला की लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतात.येथे अमेरिकेत मात्र हवामानाचा अंदाज क्वचितच चुकल्याचा अनुभव मला आला. अगदी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी किती तपमान असणार याविषयीचा अंदाजही आठवडा आठवडा अगोदर वर्तवला जातो आणि तो क्वचितच चूक ठरतो.आणि न्यू जर्सीतील हवा तर इतकी बेभरवशाची आहे की योग्य भाकीत आवश्यकच आहे.माझ्या मुलाने सांगितले की इथल्या हवेविष्यी असे म्हणतात If you donot like NJ weather wait for five minutes you will get good weather.यामागची अतिशयोक्ती सोडली तरी हवा फारच सारखी बदलत असते हे मात्र खरे.

कुठे बरं वाचलंय हे? -३

महाभारताची शोकांतिका कशात आहे? द्रौपदीच्या पुत्रांच्या निधनात? कर्णाच्या बलिदानात? कुंतीच्या अविरत वाहत्या दुःखाच्याधारेत? कौरवाच्या भीषण संहारात? मला वाटते, हे सारे दुःख एकत्र केले तरी ज्ञानलालसेतून जन्मलेल्या ज्या अभिमानाने, आणिलीनतेने काठोकाठ भरलेल्या ज्या अभिनव अनामिक दुःखाने एकलव्याला पूर्णपणे एकाकी केले, त्या दुःखाच्या कणाचीही बरोबरी याथोरांच्या जगन्मान्य दुःखांना यायची नाही. आणि कशी येणार? त्यांच्या प्रत्येकाच्या दुःखांत स्वतःचीही काही प्रमादांची भागीदारी होती. स्वतःच्या कर्माचे भोक्तृत्व होते. पण एकलव्याचे भोक्तृत्व? त्याचे अखेरपर्यंत वर्णन करायला व्यासांचीही लेखणी आखडली. मात्र जिथे एकलव्याची कथा संपली, तिथे तो धागा एकदमच गुंडाळून घेऊन त्याला कायमचा विराम--अपुऱ्या अवस्थेतविराम--देण्याचे जे कसब व्यासाने दाखविले आहे त्याला तोड नाही. कवीचे मौन हे सर्वात निर्माणशील असते असे म्हणतात. त्यादृष्टीने पाहिले तर आपल्या कृतीत असे निर्मितीची बीजे पोटी साठवणारे मौन एकट्या व्यासानेच धारण केलेले मला दिसते. मात्र कधी संदेह येतो की, प्रतिष्ठितपणाच्या गाभ्यालाच आव्हान देणाऱ्या झोंबऱ्या व चावऱ्या सत्यालाच झाकून टाकायची'नरो वा कुंजरो वा' अशी चलाखी तर याच्यामागे नसेल? थोडे सांतिगले व सत्याची एक झलक कायम राखली. वरवरपाहता एकलव्याची कथा जशी घडली तशी आली. पण तिचे साद-पडसाद? कुठे गेले ते? देवयानीच्या प्रेमहानीचा आक्रोश, त्याचे सारे सारे सूक्ष्म प्रतिध्वनी स्वच्छपणे ऐकू येतात. दमयंतीची व्यथा, तिचे सुखही किती कोमलपणे सांगितले गेले. सावित्रीच्यापातिव्रत्याची कथा पावित्र्याने ओसंडून गेली. पण एकलव्याची कथा सांगताना मात्र रोकडा एकसूरआणि अतिसंक्षिप्त वाणी का वापरली गेली? इथे कविमन तुडुंब भरून जाण्यासारखे काहीच नव्हते? ओसंडून पुरासारखे वाहूनजाण्याइतके आवेगी सत्य इथे नव्हतेच काय?

गीतासार: एका श्लोकात एक अध्याय (१०,११,१२)

क्षमस्व! दीपावलीनिमित्त जरा सुट्टी घेतली होती.

मध्यंतरी आपलेच एक मनोगती श्री. चिंतामणी जोग यांच्याकडून अधिक शुद्द प्रत (वृत्तांसहीत )  मिळाली आहे, त्याचाच आता वापर करीन.

अध्याय १० (स्त्रग्धरा)

गाणे हवे आहे..

मला संदीप खरे यांचे "सैरभैर झाला सारा वारा रानमाळ..." हे गाणे mp3  हवे आहे.

कोणाकडे सिडी असल्यास मला गाणे पाठवावे. किंवा त्याची लिंक पाठवावी.

मला व्य. नि. तून लिहावे म्हणजे मी माझा इमेल कळवेन. इथे रोमन अक्षरांचे बंधन आहे. देता येत नाही.

तीन प्रवासी

विंदा करंदीकरांच्या 'धॄपद' या काव्यसंग्रहातली काही दिवसांपूवी वाचलेली कविता अर्थ नीट न समजल्याने मनात राहिली आहे.

तीन प्रवासी


विमान आले डुंबत डुंबत
अंधारातुन
आणि उतरले तीन प्रवासी
चिंचेच्या अर्ध्या पानावर

प्रेम

मी गेले काही महिने बंगळूर येथे नोकरी करतो. साधारण दहा एक महिने झाले असतील. जेव्हा मला इथे सहा महिने झाले, तेव्ह माझी एक मैत्रिण इथे आली. तीही एका मोठ्या आय टी कंपनित नोकरी करते. तिच्याशी माझी चांगली मैत्री आहे. आण्खी एक मित्र आहे आमचा इथे.