३१ मार्च
आज उपक्रमाच्या खरडवहीत गप्पा मारताना पुण्याचा विषय निघाला आणि अभिमानाने छाती भरून आली. अरे, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आहे, महाराजा. सांस्कृतिक राजधानी, खायच्या गप्पा नाहीत. पुण्याचं महत्त्व त्या मुंबईच्या बनियेगिरीला काय कळणार? नुसता पैसा कमावणे हे एकच ध्येय. पुणे तिथे काय उणे, उगीच नाही म्हटलेलं. पुणे विद्यापीठ, एनसीएल, भांडारकर यादी करायला गेलो तर तास लागेल, आहात कुठे? शेवटी पैसा म्हणजेच सगळं असतं का? माणसाला इंटेलेक्चुअल बाजूही असतेच ना? हे त्या सिंध्यांना काय कळणार म्हणा, जाऊ द्या झालं.
प्रिय मनोगती जन,
सर्व प्रथम, सर्व मनोगतींना दिवाळीच्या शुभेच्छा. मराठी संकेतस्थळांत दर्जा, सातत्य यामुळं उठून दिसणाऱ्या 'मनोगत'चा पहिलावहिला दिवाळी अंक सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
या अंकाच्या प्रवासात संपादक मंडळाला काही तांत्रिक अडचणीही आल्या. काही वेळा संपादक मंडळ देशोदेशी विखुरलेले असल्याने परस्परसंपर्कास वेळ लागला. प्रसंगी लिखाण पाठवणार्यांना काही युनिकोड संबंधित अडचणी आल्या. अर्थातच मनोगताचा हा पहिलाच अंक असल्याने काही अडचणी येणे स्वाभाविक होते. आणखी एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे हे संपादक मंडळ म्हणजे हजारांमध्ये सदस्य असणार्या पूर्ण मनोगताचे प्रतिनिधित्व नव्हे. त्यामुळे संपादक मंडळाने निवडलेले लिखाण हे सर्व मनोगतींना सर्वश्रेष्ठ वाटेल असे नव्हे, किंवा संपादक मंडळाला जागेमुळे निवडता न आलेले लिखाण सर्व मनोगतींना निवडलेल्या काही लिखाणापेक्षा जास्तही आवडू शकते. आलेल्या लिखाणातून निवड किंवा वगळ या गोष्टी आमच्यासाठीही अवघड होत्या. लिखाणाचे गुण आणि दर्जा हा बर्याचदा व्यक्तिसापेक्ष असतो. त्यामुळे ज्यांच्या लिखाणांची या अंकात निवड होऊ शकली नाही त्यांना ही विनंतिवजा आग्रह आहे की त्यांनी नाउमेद न होता लिहीत राहावे.
त्यानंतर अधिक अधिक मोठे मॉल्स पाहिले,बरेचसे मॉल पूर्ण पाहण्यापूर्वीच पाय दुखू लागले,पुढेपुढेतर मी मुलांना खरेदी करा म्हणून सांगून कुठल्यातरी आरामशीर खुर्चीवर बसून आराम करीत असे.वॉलमार्ट, शॉपराइट, पाथमार्क,मार्शल्स ही काही प्रसिद्ध साखळीमॉल्सची नावे. मॉल्समध्ये खाद्यपेये,स्टेशनरी,मिळत असे त्याशिवाय ठराविक प्रकाराचेच साहित्य विकणारी तर असंख्य दुकाने.तीही इतकी विस्तीर्ण की पूर्ण पाहणे अशक्यच.बेड बाथ अंड बियॉंड (झोपण्या व अंघोळीचे सामान), होम डेपो (घर बांधण्यासाठी किंवा सजवण्यासाठीचे सामान) ,टॉयझरस,बेबी-ज-रस (खेळणी आणि लाहान मुलांसाठी) अशी विशिष्ट प्रकारचे सामान विकणारीही असंख्य दुकाने . आमच्या सुदैवाने शॉपराइट.मार्शल्स,ड्रगफेअर ही दुकाने आमच्या घरातून चालत जाण्याच्या अंतरावर होती.दुकाने चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी कामात असणाऱ्या व्यक्तीला आठवड्यातून एकच दिवस मिळत असल्याने आणि अगदीच किरकोळ म्हणजे अर्धा लिटर दूध,अर्धा किलो भाजी अशा वस्तू आणायला गेले तर वस्तू घेण्यापेक्षा ज्या कौंटरवर पैसे द्यायचे तेथे एवढी गर्दी असे की तेवढ्या वस्तूच्या पेमेंटसाठी सहज अर्धा तास मोडायचा.एकदा अर्धा डझन केळी शॉपराइटमधून आणायला मला चालत जाऊन केळी घेऊन परत चालतच येण्यास अर्धा तास आणि दीड डॉलर किंमत चुकवण्यात एक तास असावेळ गेला.भारतात आम्हाला घराबाहेर पडल्यापडल्या दिसणाऱ्या दुकानात हवी ती वस्तू मिळते,जास्त वस्तू असल्या तर वाणी घरी पाठवून द्यायलाही एका पायावर तयार असतो.त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ आणि संवयीने आळशी बनलेल्या, गाडी चालवता न येणाऱ्या नागरिकांमुळे तरी मॉल संस्कृती आली तरी अमेरिकेसारखी ती पूर्णतया रुजू शकणार नाही. मॉल्समुळे वस्तू स्वस्त मिळतील आणि चांगल्या मिळतील असेही खात्रीने सांगता येत माही कारण भेसळ करण्याची संवय लागलेले भारतीय व्यापारी अमेरिकेत माल पाठवतानाही ( देशाचे नाव बदनाम होईल याची अजिबात पर्वा न करता) जेथे भेसळ करायला मागेपुढे बघत नाहीर् तेथे मॉलची काय कथा?आपल्याकडे इतक्या मोठ्या जागा मॉल बांधायला आणि गाड्या पार्क करायला उपलब्ध होण्याचीही अडचण आहे अर्थात सध्याच्या मॉलकडे नजर टाकली तर लोकांना गाड्या लावायला जागा मिळते की नाही याची ना मॉलचालकांना काळजी ना त्यांना त्यासाठी परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना काळजी.रस्तावर वाहतुक कोंडी होऊन चारदोन अपघात झाले आणि लोकांनी दगडफेक केली की मग सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होणार.
अमेरिकेत पोचण्याच्या दुसऱ्या दिवसापासून फिरायला जायला योग्य जागा मी शोधू लागलो.पुण्यात सिंहगड रस्त्यावर सकाळी सातपूर्वीच इतकी रहदारी चालू होते की मी सुरवातीला पुण्यातील आमच्या गृह संकुलाच्या मागील बाजूस असणाऱ्या आंबराईत फिरायला जाण्याचा पर्याय शोधला होता आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणाना तो पसंत पडला होता.पण आंबराईच्या मालकाला इतके ज्येष्ठ नागरिक या एकुलत्या एक शुद्ध हवेच्या ठिकाणाचा लाभ घेऊ लागले तर ते अधिकच दीर्घायु होऊन शासनास सेवानिवृत्तीवेतनचा फारच भूर्दंड पडेल आणि देशाचे मोठे नुकसान होईल असे वाटून लगेच त्याने तेथे तारेचे कुंपण घालून टाकले.तोपर्यंत पी. चिदंबरम् अर्थमंत्री झाल्यामुळे शासनातर्फे त्याला बहुतेक काही बहुमान मिळण्याची शक्यता वाटते सध्या त्या विभागाचा नगरसेवक म्हणून त्याला संधी देण्यात आली आहे. अशा वातावरणातून अमेरिकेत गेल्यावर कोठेही फिरायला मला रान मोकळे मिळाल्यासारखे झाले तरीही मुलाने उगीच इकडेतिकडे जाऊ नका रस्ता चुकला तर पंचाईत व्हायची असा धाक घालून ठेवला होता.त्याने मोबाइल घेऊन जा असा आग्रह पण केला.पण मी रस्ता चुकण्यापेक्षा मोबाइलच हरवून टाकेन अशी मला भीती वाटत असल्याने मी टप्प्याटप्प्याने आपली फिरण्याची कक्षा वाडवायची असे ठरवले. सुरवातीस तर आम्ही एकएकटे फिरायला बाहेर पडायचे ठरवल्यामुळे पहिला टप्पा फक्त मुलाच्या घराशेजारच्या रोलरस्केटिंगच्या मैदानावरच तासभर फेऱ्या मारायच्या असा मी बेत केला कारण तेही तसे बऱ्यापैकी मोठे होते.
त्यानंतर हळूहळू रस्त्यावर जायचे असे ठरवले म्हणून बाहेर पडलो पण रस्ता इतका मोकळा पाहून पुढे जाण्याचा मोह आवरेना.रस्ता पाहून अमेरिकन लोकाना आमच्यापासून शिकण्यासारखे कितीतरी आहे याची जाणीव झाली कारण रस्ता अगदी जेवढी रुंदी उपलब्ध होती तितक्या रुंदीचा करून बाजूला पदपथ ज्याला इथे साइडवॉक म्हणतात ते पूर्ण करून आता करण्याला शिल्लक काही ठेवलेच नव्हते आपल्या गरजेपुरतेच वापरा आणि गरजा कमीतकमी ठेवा हा म. गांधींचा दृष्टीकोण या लोकाना कुठला पटायला.येथे रस्ते अगोदर तयार असतात आणि लोक त्या भागात नंतर रहायला सुरवात करतात.आपल्याकडे लोक नव्या भागात रहायला गेल्यावर बरेच दिवस ठेचकाळत जात रस्ता झाला तर बरे होईल असे म्हणत आणि ते न करत असल्याबद्दल नगर्सेवकांबा शिव्या देत देत प्रवास करतात शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या श्रीकृष्णाप्रमाणे नगरसेवक शिव्यांची लाखोली पूर्ण होण्याची वाट पाहतात,तोपर्यंत लोकांच्या चालण्यामुळे बऱ्यापैकी पायवाट तयार होते आणि रस्ता कमीतकमी किती रुंदीचा केला तरी भागेल याची त्यांना कल्पना येते.त्यानुसार एकदिवस नगरविकास रचनेत शंभर फुटी म्हणून दाखवलेल्या रस्त्याची सुरवातीस वीस फुटाच्या रुंदीचीच आखणी होते आणि तरीही नागरिकांच्या आशेला पालवी फुटते.त्यानंतर काही दिवसानी त्या आखलेल्या रुंदीच्या दोन्ही बाजूने खडीचे ढीग दिसू लागतात आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा चालणे किंवा वाहन चालवणे अवघड झाले तरी रम्य भावीकाळासाठी ही अडचण नागरिक सोसायला तयार होतात.मग कित्येक दिवस काहीच घडत नाही आणि त्या ढिगातील खडी हळूहळू जाणाऱ्यायेणाऱ्या पादचाऱ्यांना आजूबाजूने जाणाऱ्या वाहनापासून बचावण्यासाठी त्या खडीच्या ढिगावरूनच चालावे लागून रस्त्यावर पसरू लागते.आणी एक दिवस भल्या पहाटे बऱ्याच कामगारांचा ताफा ती खडी पुन्हा ढिगात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करून मग तीच नियोजित रुंदीची रस्त्याची पट्टी झाडण्याचा प्रयत्न करून जाणाऱ्या येणाऱ्याना त्यावरून चालणे किंवा वाहनातून जाणे मुश्किल करतात. त्यादिवसाच्या अखेरीस ती खडी रस्त्यावर पसरली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून तेथील नागरिकांचे खरे हाल सुरू होतात,कारण खडी पसरण्याचे काम पूर्ण करून ठेकेदार आपली कामगारसेना दुसऱ्या तशाच कामासाठी हाकारतो पण तोपर्यंत डांबरीकरण करणारा ठेकेदार ठरायचे बाकी असते कारण कोणत्या ठेकेदाराकडून अधिक प्राप्ती होणार याची चाचपणी नगरसेवकांकडून चालू असते आणि त्यामुळे पहिला रस्ताच बरा होता असे म्हणत पूर्वीपेक्षाही अधिक शिव्यांचा संग्रह नागरिकांपाशी तयार होतो आणि नाइलाजाने त्या खडीवरूनच चालण्याची संवय नागरिकांना आणि वाहनचालकांना पण लागते,त्यांच्या जाण्याने खडी बऱ्यापैकी दबली जाते आणि असाच रस्ता तयार होईल की काय असा विचार दृढ होताहोता एक दिवस रस्त्याच्या बाजूला रोडरोलर दिसू लागतो आणि पुन्हा नागरिकांच्या आशेला पालवी फुटू लागते पण त्याला फळे येण्यापूर्वीच तो रोलर पुन्हा तेथून गुप्त होतो आणि पुन्हा शिव्यासप्तशतीचा पाठ नागरिक म्हणू लागतात. पण अचानक एक दिवस त्या भागाला कोणीतरी बडी असामी भेट देणार अशी आवई उठते.आणी एकदम कामगारांची मोठी फौज,रोडरोलर,डांबराची पिपे त्या भागात येऊन त्या दिवशी तो रस्ता वाहतुकीला बंद होऊन संध्याकाळपर्यंत एकदम चकचकीत डांबरी पट्टी त्या जागेवर दिसू लागते आणि त्या भागातील नागरिकांना स्वर्ग हाती आल्याचा भास होतो.इतक्या प्रतीक्षेनंतर तयार होणारा रस्ता कसाही झाला तरी तो पूर्वीपेक्षा बराच होता याविषयी नागरिकांत एकमत होते. तो रस्ता ती बडी असामी येईपर्यंत कसाबसा तग धरतो आणि हळूहळू रस्त्याच्या बाजूची धूळ त्यात पाऊस पडल्याने चिखलाच्या रूपाने तयार रस्त्यावर येऊन रस्ता डांबराचा नसून चिखलाचा आहे असे वाटू लागते. असे झाले तरी " ठेविले अनंते तैसेची राहावे" अशा शिकवणीत वाढलेले आपले नागरिक तशाही अवस्थेत हसतमुख राहण्याचा प्रयत्न करतात.रस्ता करणे ही इतकी सोपी गोष्ट आहे हे या बेट्या अमेरिकनांना माहीतच नाही आणि एकदा केलेला रस्ता जणू काही जन्मोजन्म टिकावा आणि तो पुन्हा कधीच करायचा नाही अशा थाटात करण्याचा त्यांचा अट्टाहास न समजण्यासारखा वाटतो.खरे तर रस्ता ही गोष्ट बायकांच्या साड्यासारखी अथवा इतर वस्त्रप्रावरणाप्रमाणेच पुन्हापुन्हा करावी लागून त्यातून नगरसेवकांच्या कित्येक पिढ्यांना पुरेल अशी तरतूद करावयाची असते ही साधी गोष्ट यांना कळत नाही. काहीका असेना अशा पद्धतीने रस्ता तयार होताच महापालिकेच्या इतर विभागानाही किंवा टेलिफोनवाल्याना जाग येते, रस्ता तयार झाला आहे असा टेलिफोनच जणू त्याना जातो की लगेच केबल टाकण्यासाठी रस्ता खणण्याच्या तयारीत ते तस्त्यावर हल्ला करतात.
रस्त्याच्या बाबतीत मला येथे आणखी जाणवणारी गोष्ट म्हणजे रस्ता केवळ वाहतुकीसाठीच वापरायचा असतो ही यांची गैरसमजूत.आपल्याकडे कसे रस्ता हा शक्य झाले तर वाहतुकीसाठी वापरायची चीज आहे.त्याव्यतिरिक्त भाजीविक्रेते, भेळपुरीवाले, किल्ल्या तयार करणारे,या सर्वांना रस्त्याचाच आधार असतो.दुकानदाराना आपला माल गिऱ्हाइकांना दिसेल असा बाहेर ठेवायला रस्त्याचाच वापर करावा लागतो.वाहने पार्क करायला नागरिकांनाही रस्ताच आवडतो,या रस्ताच्याच डाव्या उजव्या बाजूस नागरिकांनी कचरा टाकावा म्हणून मोठ्या कुंड्या ठेवलेल्या असतात पण या कुंड्यांचा नागरिक खोखो खेळण्याच्या खुंटासारखा वापर करून कचऱ्याचा सडा मात्र रस्त्यावरच पडेल याची दक्षता घेतात.आणी इथे मात्र पार्कात फिरायला गेलो तर बरोबर आणलेल्या पाळीव कुत्र्याच्या मालकांना त्या कुत्र्यामागे पिशवी घेऊन धावून त्याची विष्ठा बागेत पडू नये याची काळजी घ्यावी लागते नाहीतर त्यांना जबरदस्त दंड बसतो आपल्याकडे तर काही मानवप्राणीही रस्त्याच्या कडेची शोभा वाढवण्यात धन्यता मानतात.
रस्त्यावर वाहने अतिशय वेगाने जात असतात आणि आणि ती फारच मोठ्या प्रमाणात चारचाकीच असतात. आपल्याकडे दिसणारी वाहनांची विविधता येथे दिसत नाही.आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे रस्त्यावर कोठेच पाळीव अथवा कसलेच प्राणी दिसत नाहीत.याउलट आपल्याकडे पाळीव प्राणी मालकाकडे कामापुरते राहून बाकीचा काळ रस्त्यावरच व्यतीत करतात त्यामुळे आपला रस्ता हे शिक्षणाचे मोठे केंद्रच असतो.अमेरिकेतील मुलांना साधे कोंबडे,गायी,घोडे.इ.प्राणी प्राणिसंग्रहालयातच जाऊनच पाहावे लागतात याउलट आपल्या बालकांना मात्र हती,घोडा,गाय बैल,म्हशी,कधीकधी उंट ,कोंबड्या इ. चे सांगोपांग ज्ञान रस्त्यावरच मिळते त्यासाठी त्यांना प्राणिसंग्रहालयात जावे लागत नाही.फक्त आता वाघ सिंह आणि माशांसारखे जलचर प्राणीच काय ते रस्त्यावर दिसत नाहीत.बोरिवली वगैरे अभयारण्यांच्या शेजारील रस्त्यावर तेही दिसतात अधूनमधून.रस्त्यावरील प्राण्यांची आठवण येताच एका म्हशीने केलेली माझी फजिती आठवल्याशिवाय कशी राहील.नुकतेच लग्न झाल्यावर ऐटीत बायकोला घेऊन एरंडवण्यातून मेव्हण्यांच्या घरातून बाहेर पडून लोकमान्यनगरात जाण्यासाठी निघालो होतो अंगात त्यावेळी चांगलेच म्हणता येतील असे कपडे म्हणजे शुभ्र शर्ट आणि सटिन ब्ल्यू पँट होती̮. लोकमान्यनगरला जाण्यासाठी कर्वे रस्ता ओलांडून कॉजवेवरून( आता तेथे पूल झाला आहे.) चालतच जाता येणे शक्य होते.कॉजवेवर थोडे अंतर आम्ही गेलो तो समोरून म्हशींचा एक घोळका लडिवाळपणे एकमेकांच्या शिंगात शिंगे अडकवत आला त्यातील एका म्हशीला आमचे जोडीने चालणे आवडले नसावे आणि आम्ही जवळून जात असताना तिने शेपटीची एक डौलदार तान घेत समेचा एक फटकारा माझ्या छातीवर असा लगावून दिला की त्यापुढे येसाजी कंकाने ज्या तलवारीच्या एका वारात हत्तीची साँड उतरवली तो वारही फिका पडावा आणि त्या फटकाऱ्याने माझ्या शर्टाची पुढची बाजू खांद्यापासून कमरेपर्यंत जानव्यासमांतर शेणाच्या पट्ट्याने सजून निघाली अर्थातच लगेचच परत घरी प्रवेश करून कपडे बदलूनच मला बाहेर पडावे लागले.
याशिवाय श्वानमित्र संस्थांमुळे कुत्र्यांच्या तर झुंडीच रस्त्यावर फिरत असतात.त्यामुळे आपल्याकडे ज्याविषयी उगीचच शिक्षणतज्ञ आणि राज्यकर्ते यांच्यातच जो चर्चेचा कल्लोळ चालू आहे त्या लैंगिक शिक्षणाचे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर प्रात्यक्षिकही बालकांना रस्त्यावरच पहायला मिळत असल्याने उगीचच त्या विषयावर चर्चासत्रे कशासाठी चालू आहेत, समजत नाही.थोडक्यात रस्ता हे आपल्याकडील विद्यापीठच आहे म्हणाना कुटुंबनियोजनाचा प्रसार व्हावा तसा होत नसल्याने आपल्याकडे रस्त्यांचा लोकसंख्या नियंत्रणासाठीही उपयोग केला जातो त्यासाठी सलमानखानसारख्या ताऱ्यांची मदत होते. त्यामुळे आपल्याकडे डोळे उघडे ठेऊन अगदी काळजी पूर्वक रस्त्यावर चालावे लागते आणि तरीही तुमचे दैवच बलवत्तर असेल तर तुम्ही रस्त्यावर सुखरूपपणे चालू शकता.अशी सवय असल्याने रस्ता ओलांडताना एक वाहन येत आहे म्हणून मी थांबलो तर तो वाहनचालकच थांबून मला रस्ता ओलांडण्याचा आग्रह करू लागला आणि माझे अंतः करण अगदी भरून आले आणि बिचाऱ्याचा हिरमोड करायला नको म्हणून मी त्याच्या विनंतीस मान दिला.
रस्त्याचा असा अगदी मर्यादित वापरच माहीत असल्याने येथील वाहनचालकाना वाहने अगदी जपून चालवावी लागतात.आणि जिकडेतिकडे पाट्या दिसतात " कायद्यानुसार पायी चालणारास अग्रक्रम देणे आवश्यक आहे." आपल्याकडे असे केले तर मला वाटते गाडी चालवणाऱ्याना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालतच जावेसे वाटेल.आणी अशा प्रकारे इंधनाची बरीच बचत होईल.
.
-- मुंबईला निघून गेला. त्याच्यासोबत असण्याची मला फार सवय झाली होती. आता सगळा दिवस मला खायला उठू लागला.काही कारणानं आम्ही सारखे भेटायचो; खूप वेळ एकत्र घालवायचो. कधी ग्राऊंडवर, कधी नुसतंच फिरायला, कधी सिनेमा तर कधी नुसत्याच गप्पा. त्याचे सारखे मनसुबे चाललेले असायचे. मी मुंबईला जाणार, मोठा सर्जन होणार; आणि मी काय करावं हे मला कळायचं नाही! ऍनेस्थेशिया, पॅथोलॉजी असं काहीही मला करत येईल असं तो म्हणायचा, पण मला पेशंटच्या इलाजा संबंधानं काहीतरी करायचं होतं. ऍनेस्थेशियाबद्दल त्या काळात खूप माहिती नव्हती, परंतु कुतूहल होतं. पॅथोलॉजी मात्रअजिबात आवडत नव्हती. तो म्हणाला, "तुला सर्जरी करायची तर माझी हरकत नाही, पण दोघांना सर्जरी करायची असेल तरलग्न, मुलं वगैरे नक्कीच विसरायला लागेल!" म्हणून मी ऍनेस्थेशिया घेतला. मलाही सर्जन व्हायची इच्छा होती. पण वाटायलालागलं, की तो सर्जन होणार असेल तर आपण ऍनेस्थेटिस्ट झालेलं बरं. दोघांना पूरक काम करता येईल.
कर्णाबद्दल कुणी कुणी काय काय वाचले आहे? त्या लेखकाने लिहिलेले काय काय आणि कसे वाटले आणि तुमचे स्वतः चे
कर्ण
ह्या व्यक्तिमत्वावर काय म्हणणे आहे????
मी म्रुत्युंजय हे पुस्तक ९ वेळा वाचले आहे.... आणि मी लेखकाच्या विचारांशी सहमत आहे....
निन्दन्तु नीतीनिपुणाः यदि वा स्तुवन्तु
लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेच्छम्।
अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा
न्यायात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः॥
असं नीतिशतकात म्हटलंय. मानवी गुणांमध्ये शौर्य या गुणाचे महत्त्व फार मोठे आहे. वीर हा नेहमी रणांगणातच शोभून दिसतो म्हणतात. शेक्सपियर म्हणतो जग ही रंगभूमी आहे. ज्याला त्याला आपापल्या वृत्तीप्रमाणे जग वाटते असे माझे मत आहे. कोणाला जग रंगभूमी वाटेल तर कोणाला मरुभूमी.
पण मला मात्र जग , जग म्हणण्यापेक्षा जीवन ही रणभूमी वाटते. आमचा कायमचाच अर्जुन झालेला असतो. तोसुद्धा एकाग्रतेने , सव्यसाचीपणे सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनून तळपणारा नव्हे, तर कुरुक्षेत्रावर समोर युद्धाचा प्रसंग पाहून श्रीकृष्णाला ' सीदन्ति मम गात्राणि... ' असं सांगणारा. किंकर्तव्यविमूढ झालेला. असा अर्जुन होण्याचा प्रसंग रोजरोज येत असल्यामुळे कुठल्याही संकटकाळी न डगमगणारा आणि सर्व प्रकारची युद्धे लढून ती हमखास जिंकणारा, शक्तिमान तरीही नम्र, न्यायाचा मार्ग कधीही न सोडणारा, वचनाला जागण्यासाठी प्राणांचंही बलिदान देणारा आणि वर उद्धृत केलेलं नीतिशतकांतलं सुभाषित सार्थ करून दाखवणारा असा शूर वीर नायक जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा मी थक्क होऊन त्याच्याकडे बघतच राहिले. या वीराचं नाव मॅक्सिमस डेस्मस मरिलियस. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या 'ग्लॅडिएटर' या चित्रपटाचा नायक.
जितक्या वेळा हा चित्रपट पाहावा तितक्या वेळा त्याचे नवीनच कंगोरे हातात येतात. नाट्यमयता हा या चित्रपटाचा स्थायीभाव आहे. आणि खटकेबाज संवादांमधून त्या नाट्याची खुमारी उत्तरोत्तर वाढतच जाते.
हा आहे एक राजकारणाचा विशाल पट. यात एक राजा आहे. वृद्ध, जराजर्जर आणि तरीही जग पादाक्रांत करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतारवयातही कष्ट सोसणारा राजा. राजा कसला सम्राटच तो. एक चतुर्थांश जगावर ज्याची सत्ता चालते असा , अनिर्बंध, एकाधिकारशाही राजसत्तेचे प्रतीक असणारा सम्राट. पण हा सम्राट विचारी आहे. विवेकी आहे. न्यायी आहे. आयुष्याच्या अंताला आल्यावर त्याला आपल्या चुका कळतात. आयुष्याचं सिंहावलोकन करून तो नीरक्षीरविवेक करतो. जाताना या जगाला आपण काय देऊन जाणार? जग आपल्याला एक मूर्ख हुकूमशहा म्हणून ओळखणार का? असे प्रश्न त्याला पडतात.
यात एक सेनापती आहे. रोमच्या सम्राटाचा विश्वविजयी सेनापती. राजकारण्यांनाही चळचळा कापायला लावेल असे प्रचंड सैन्यबळ त्याच्या पाठीशी आहे. आपल्या शूर पण दिलदार स्वभावाने त्याने सैनिकांची मने केव्हाच जिंकली आहेत. त्याच्या एका शब्दासरशी त्याचे सैनिक वारा, वादळ, ऊन, तहान ,भूक, हाडं गोठवणारी थंडी यापैकी कशाचीही पर्वा न करता युद्धात स्वतःला झोकून देतात इतका त्यांचा आपल्या नायकावर विश्वास आहे. आणि त्याचंही आपल्या सेनेवर प्रेम आहे. या वीरांवर अन्याय होऊ नये म्हणून तो डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो. त्याला मोठेपणाचा, पदाचा, प्रतिष्ठेचा हव्यास नाही. सेनापतीच्या वस्त्रांमध्येही तो एक साधा शेतकरीच राहिलेला आहे. आपल्या गव्हाच्या शेतात सोन्यासारखे दाणे पिकवावेत, आपल्या लाडक्या मुलाबरोबर काळ घालवावा ही त्याची एकमेव इच्छा आहे.
यात एक राजपुत्र आहे. पित्याच्या मृत्यूनंतर रोमचा राजा होण्याचं त्याचं स्वप्न आहे. स्वभावाने क्रूर, कपटी, पाताळयंत्री, सगळी मूल्ये धाब्यावर बसवणारा , वृत्तीने नीच असा हा मुलगा आहे. त्यातच नुकतंच आलेलं तारुण्य त्याच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालतंय. कणाकणाने झिजणाऱ्या, दर क्षणाला मृत्यूच्या आणखी जवळ जाणाऱ्या आपल्या पित्याबद्दल त्याला काडीचंही प्रेम नाही. उलट आपला बाप कधी मरतो याचीच तो वाट पाहत बसला आहे. तो शूर असल्याचा आव आणतो पण त्याचं काळीज सशाचं आहे. मरणाची भीती त्याला वाटते.
या राजपुत्राला एक मोठी बहीण आहे. ल्युसिला तिचं नाव. नुकतेच वैधव्य आले असल्यामुळे आपल्या आठ वर्षांच्या मुलाला घेऊन ती माहेरी आली आहे. रोमन सम्राटाची मुलगी असल्यामुळे राजकारण तिला नवीन नाही. ती त्यात चांगलीच मुरलेली आहे. सध्या तरी आपल्या भावाला राजा होण्यासाठी ती सर्वार्थाने मदत करते आहे. एके काळी ती मॅक्सिमसच्या प्रेमात होती. तिने त्याला आपला स्वीकार करण्याची विनंती केली होती. पण मॅक्सिमसचे आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे त्याने ही मागणी धुडकावून लावली होती. अजूनही ती मॅक्सिमसला विसरू शकलेली नाही. विजयानिमित्त सीझरने दिलेल्या मेजवानीच्या प्रसंगीही ती गवाक्षातून चोरून मॅक्सिमसकडे पाहते. ल्युसिला आपल्या भावापेक्षा - कॉमोडसपेक्षा सर्वच बाबतीत उजवी आहे. केवळ ती मुलगी आहे म्हणून, नाहीतर ती खूप चांगली सम्राट होऊ शकली असती. तिच्या वृद्ध पित्याच्या नजरेतून तिचं मॅक्सिमसकडे बघणंही सुटलेलं नाही आणि तिचा भावाला असलेला पाठिंबाही सुटलेला नाही. सीझरच्या दृष्टीने ल्युसिलाला राणी करणं हा योग्य पर्याय ठरू शकेल हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं.
या चार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा या चित्रपटाचा भार सांभाळणाऱ्या भव्य स्तंभांप्रमाणे आहेत. आणि यांच्या अवतीभवती उभा आहे तो रोमच्या राजमुकुटाचा काटेरी मार्ग.
चित्रपटाला सुरुवात होते ती सीझर मार्कस ओरिलियसच्या शेवटच्या लढाईपासून. ज्ञात जगाचं हे शेवटचं टोक आहे. जर्मेनियामधल्या रानटी टोळ्या तहाचा मार्ग धुडकावून लावतात आणि मॅक्सिमस सूर्यासारखा आग ओकत रणांगणात उतरतो. मॅक्सिमस हा मूर्तिमंत पराक्रम आहे. आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा देऊन तो त्यांच्यातलाच एक म्हणून लढतो. विजयश्री खेचून आणतो.
या विजयानिमित्त सीझर मार्कस ओरिलियसने आयोजित केलेल्या मेजवानीमध्ये रोमच्या संसदेचे सदस्य आलेले आहेत. एके काळी लोकाधिकार असलेल्या रोमवर सध्या सीझरची अनिर्बंध सत्ता आहे. संसदेतले हे लोकप्रतिनिधी ज्याच्या बाजूला असतील त्याला सत्ता मिळण्याचा मार्ग सुकर होईल असं साधं सोपं समीकरण आहे. आपल्या महत्त्वाकांक्षेला अधिक मुरड घालू न शकणारा कॉमोडस या लोकप्रतिनिधींचे साहाय्य मिळावे म्हणून खेळी खेळतो आहे. काही लोकप्रतिनिधी त्याला बधतात. काही अधिक विचारी सांसद सावध पावलं टाकू पाहतात. त्यांना रोममध्ये पुन्हा लोकशाहीची स्थापना झालेली हवी आहे. सत्तेच्या मार्गामध्ये आपल्याला जर सैन्याची मदत झाली तर आपण संसदेला धाब्यावर बसवू शकतो हे कळण्याइतका कॉमोडस हुशार आहे. तो खुबीने मॅक्सिमसचा कल जाणून घेऊ पाहतो. मॅक्सिमस हा तलवारबहाद्दर असला तरी राजकारणातल्या डावपेचांचा त्याला तिटकारा आहे. कसलेही छक्केपंजे न करता तो आपली निष्ठा सीझरवर आणि पर्यायाने रोमवर असून व्यक्तिगत लांगूलचालन आपल्याला जमणार नाही हे स्पष्ट करतो. लाडावलेल्या आणि 'नाही' हा शब्द माहीत नसलेल्या हट्टी कॉमोडसला हा सरळ नकार पचणं शक्यच नाही. पण वरवर तरी तो तसे काही दाखवत नाही.
रोमची सत्ता म्हणजे पतंगांना आकृष्ट करणारा एक रत्नदीप आहे आणि या रत्नदीपाचं भासमान स्वामित्वदेखील कोणा एकाच्या हाती फार काळ राहू शकणार नाही हे आपल्याला या मेजवानीमध्ये जाणवतं. एका सम्राटाच्या होऊ घातलेल्या अस्ताबरोबर तीव्र होऊ पाहणाऱ्या सत्तासंघर्षाचं बुद्धिबळाच्या पटासारखं त्रिमित रूप या मेजवानीमध्ये अगदी ठळकपणे दिसतं. आपल्या मुख्य पात्रांची, त्यांच्या स्वभावांची नेमकी ओळख आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांची नांदी इतक्या रोचक पद्धतीने आणि इतक्या कमी वेळात करून देणाऱ्या पटकथाकाराच्या प्रतिभेला ' हॅट्स ऑफ ' असंच म्हणावंसं वाटतं.
दुसऱ्या दिवशीची सकाळ. सीझर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मॅक्सिमसला आपल्या तंबूत बोलावतो आणि मॅक्सिमसला त्याच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे सांगायला सांगतो. मॅक्सिमसला घरी जायचं आहे. त्याला तीन वर्षात घरी जायला मिळालेलं नाही. जिंकण्याजोगा प्रदेश संपला म्हणजेच युद्ध संपलं आणि युद्धाखेरीज इतर कशातही मॅक्सिमसला रस नाही. मॅक्सिमसच्या अंगी असलेल्या, धैर्य, न्यायी बुद्धी, सत्याची चाड, दिल्या शब्दाला जागण्याची वृत्ती, अतुल आणि निःसंशय निष्ठा आणि अर्थातच धगधगता अतुलनीय पराक्रम या गुणांमुळे सीझरच्या मनात काही वेगळंच घाटतंय. अत्यंत स्वार्थी, आत्मकेंद्रित आणि लोभी कॉमोडस राज्यावर बसला तर किती मोठा अनर्थ होईल हे सीझर चांगलाच ओळखून आहे. म्हणूनच पुत्रप्रेमाने आंधळा न होता तो एका राजाचं कर्तव्य बजावतो. आपल्यानंतर राज्याच्या रक्षणाची जबाबदारी तो मॅक्सिमसवर सोपवू इच्छितो आहे. मॅक्सिमसने रोमचा पालक होऊन तिथे लोकशाहीची पुनर्स्थापना करावी आणि ही शेवटची कामगिरी पार पाडल्यावर सुखाने निवृत्त होऊन घरी जावं असं तो त्याला सांगतो. असं करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करताना तो म्हणतो, " राजा हा पालनकर्ता असावा लागतो. हे काम मी तुझ्यावर सोपवतो आहे कारण तुला रोमचा सत्ताधीश व्हावं असं मुळीच वाटत नाही. सत्तेचा हव्यास तुला स्पर्श करू शकत नसल्यामुळे तूच सत्तेचा पालक होऊ शकशील. या बाबतीत तुझा स्वार्थ कधीच आड येणार नाही हे मला माहीत आहे. तूच माझा मुलगा होण्यास लायक आहेस. तू माझा मुलगा असायला हवा होतास. कॉमोडस सारख्या न्यायनीती धाब्यावर बसवणाऱ्या मुलाला राजा होऊ देण्यासारखा अनर्थ नाही. तो माझा उत्तराधिकारी असणार नाही ही गोष्ट मी स्वतः त्याला सांगणार आहे. या बाबतीत मी तुला आदेश देणार नाही पण तू ही कामगिरी करावीस अशी माझी आत्यंतिक इच्छा आहे."
सम्राट मॅक्सिमसला आपला मुलगा मानतो यातून त्याचा मोठेपणा अधोरेखित होतो. पोटच्या मुलाबद्दलचं प्रेम न सुटल्यामुळे राज्यं बेचिराख झालेली इतिहासाने पाहिली आहेत. पण इथे मात्र उपभोगशून्य स्वामी होऊन रोमची सत्ता पुन्हा एकदा लोकांच्या हाती देण्याची जबाबदारी मॅक्सिमसवर सोपवून सीझर त्याचा बहुमानच करतो.
इथे कथेतल्या नाट्यमयतेचा पहिला चरम बिंदू आपल्याला बघायला मिळतो. आयुष्यभर हुकूमशहा म्हणून अनिर्बंध अधिकाराने राज्य केलेल्या सीझरला शेवटी झालेला साक्षात्कार, रोमसारख्या विश्वविजयी राज्याची सत्ता आपल्या हाताने लोकांच्या हातात देण्याची त्याची तळमळ, त्याच सत्तेसाठी वेड्या झालेला आपल्या पुत्रापेक्षा लायक उमेदवार समोर आहे हे पाहून त्याला रोमच्या सत्ताबदलासाठी सर्वाधिकार देणारा हा सम्राट एक अतिशय महत्त्वाचं तत्त्व सांगून जातो.
त्याच रात्री कॉमोडस सीझरचा गळा दाबून खून करतो. एक माणूस म्हणून मुलाचं अपयश हे एक पिता म्हणून आपलं अपयश आहे अशी कळवळून दिलेली कबुली उच्चारतानाच त्या जराजर्जर सम्राटाचा पोटच्या मुलाकडून कपटाने खून होतो. मॅक्सिमसचा पाठिंबा आपल्याला कधीच मिळणार नाही हे ओळखून त्याचा काटा काढायचा कॉमोडसचा बेत अयशस्वी होतो खरा पण मॅक्सिमसची पत्नी आणि त्याचा आठ वर्षांचा मुलगा यांना मात्र हालहाल करून मारण्यात येत. सर्वस्व लुबाडला गेलेला परागंदा मॅक्सिमस बेशुद्धावस्थेत एका गुलामांच्या व्यापाऱ्याला सापडतो आणि डोंबाऱ्यांसारखे तलवारीचे खेळ करून दाखवणारा तमासगीर मुलाम अर्थात ग्लॅडिएटर म्हणून आयुष्य काढण्याची वेळ त्याच्यावर येते. रोमचा सर्वशक्तिमान सेनापती एक तमासगीर होतो तेव्हा नियतीच्या खेळाबद्दल हसूही येतं आणि रडूही.
राजा म्हणून नालायक असलेला कॉमोडस लोकांचं लक्ष आपल्या ढिसाळ कारभारावरून काढून ते दुसरीकडे वेधून घेण्यासाठी एक अचूक चाल खेळतो. जुन्या सीझरने तलवारबाजीच्या खेळावर घातलेली बंदी उठवून तो त्या खेळांचा महोत्सवच आयोजित करतो. रोमचे प्रजाजन म्हणजे फक्त एक जमाव आहे आणि जो कोणी या जमावावर नियंत्रण मिळवेल त्याला रोमच्या सत्तेपासून कधीही दूर जावं लागणार नाही हे कॉमोडसने ओळखलं आहे. त्याची ही चाल इतकी बिनतोड आहे की राजकारणात मुरलेले आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी झटणारे सेनेटर ग्राकस सारखे लोकही हा सगळा खेळखंडोबा नुसता बघण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत.
या खेळात आपलं नशीब फळफळेल या आशेने मॅक्सिमसचा मालक आपल्या गुलामांना घेऊन रोममध्ये येतो. इथे चित्रपटाचा दुसरा सगळ्यात मोठा नाट्यमय बिंदू आपल्याला पाहायला मिळतो. एक तर गेल्या शंभर वर्षात रोमच्या सेनेने रोम शहरात पाऊल ठेवलेलं आही. त्यामुळे मॅक्सिमसनेही रोम कधीच पाहिलेलं नाही. जगाची राजधानी, लोकशाहीची गंगोत्री, अमर्यादित सत्ताकेंद्र, लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातल्या संघर्षाचा केंद्रबिंदू अशा अनेक पैलूंमुळे रोमचं महत्त्व वादातीत आहे. आणि अशा रोमचा राजनियुक्त पालक मॅक्सिमस कोणाच्याही नकळत एक नामहीन, अस्तित्वहीन गुलाम म्हणून रोम शहरात पाऊल ठेवतो. नियतीचा हा दुसरा वार आहे. अर्थात नियतीच्या हातातलं बाहुलं होऊन राहण्याऐवजी, टँजंट जाणारा बिंदू जसा वर्तुळाच्या त्या बिंदूला लंबरूप जाताना वर्तुळाचे शून्यमंडळ भेदून जातो तसा आपल्या कथेचा नायक नियतीचा हा वाकडा फास छेदून तिच्या कक्षेच्या पार निघून जाताना आपल्याला दिसतो.
मॅक्सिमस जिथे येऊन पोचला आहे ते रोमचं प्रसिद्ध कलोझियम आणि तिथली युद्धभूमी अर्थात अरीना या चित्रपटात अनेक पैलू घेऊन येणारी एक अत्यंत महत्त्वाची जागा आहे. ' असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ' अशा वृत्तीने लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या योद्ध्याची लढाई बघण्यासाठी त्याच्याभोवती कोंडाळं करून उभं राहणाऱ्या आणि त्या लढाईतून आपलं मनोरंजन करून घेणाऱ्या रोमवासीयांचं हे कलोझियम हे जगातल्या सर्वसामान्य लोकांचं प्रतीक आहे असं वाटून जातं.
कलोझियममधे विशेष गुणवत्ता दाखवणाऱ्या तलवारबाजांना सीझरकडून एक लाकडी तलवार मिळते. ही तलवार त्यांच्या दास्यत्वातून मुक्तीचं प्रतीक असते. मॅक्सिमसचा मालक या तलवारीचं आमिष दाखवून त्याला उत्तम खेळ करून दाखवण्यासाठी उद्युक्त करू पाहतो. पण ' मारा किंवा मरा ' चा हा हिंस्र खेळ करून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या सामान्य तलवारबाजांपेक्षा ज्ञानाने, कर्तृत्वाने, मानाने खूप मोठ्या असलेल्या मॅक्सिमसचे डोळे मात्र पैलतीराला लागलेले आहेत. वृद्ध सीझरची अखेरची इच्छा एखाद्या फासासारखी गळ्याला खुपते आहे आणि बायको - मुलावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचाय या एकाच इच्छेने तो अरीनामधे उतरतो. नियतीच्या या अजब खेळात मॅक्सिमसच्या अंगातले नैसर्गिक नायकाचे गुण उचंबळून येतात. आपल्या सहकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून सांघिक प्रयत्नांनी तो हेही युद्ध जिंकतो. रोमच्या जनतेने आजवर इतकं प्रेक्षणीय काही पाहिलेलंच नाही. कलोझियममधला हजारो लोकांचा समुदाय अक्षरशः खुळावल्यासारखा मॅक्सिमसचा जयजयकार करतो. नवीन सीझर कॉमोडसलाही त्याची दखल घेणं भाग पडतं.
जिंकल्यानंतर फुरफुरणाऱ्या घोड्यावरून प्रेक्षकांना अभिवादन करणारा गुलाम मॅक्सिमस हा संपूर्ण चित्रपटातील माझा सर्वात आवडता क्षण आहे. त्याच्या अंगावरची गुलामीची लाजिरवाणी कातडी फाडून त्याच्यातला विश्वविजयी सेनापती झळाळणाऱ्या सोन्यासारखा बाहेर येताना बघून आता हा नियतीला काटशह नक्की देणार अशी खात्रीच पटते.
या पराक्रमी तलवारबाजाची एका क्षणात आभाळाला भिडलेली लोकप्रियता सहन न होऊन कॉमोडस त्याला भेटायला आपल्या आसनावरून खाली अरीनामधे उतरतो. खरे तर आताच हातातल्या शस्त्राने त्याची कंठनाळ भेदून आपला सूड पुरा करायचा अशी मॅक्सिमसची इच्छा आहे. पण कॉमोडसच्या पुढ्यात उभा असलेल्या ल्युसिलाच्या मुलाला - ल्युसिअसला पाहून त्याला कुठेतरी दुसऱ्या जगात त्याची आतुरतेने वाट पाहणारा आपला मुलगा आठवतो. हातातलं शस्त्र खाली टाकून तो मागे वळतो. त्यानंतरचा संवाद तर जगप्रसिद्धच आहे. कॉमोडसने खूपच हट्ट केल्यावर आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढून मॅक्सिमस जेव्हा त्याच्या समोर उभा राहतो तेव्हा मात्र कॉमोडसच्या पायाखालची जमीन निसटते. आधीच अतुलनीय शौर्याने जनतेच्या गळ्यातला ताईत झालेला मॅक्सिमस आपल्या सीझर मार्कस ओरीयसवरील निष्ठेचा पुनरुच्चार करतो आणि एका क्षणात नियतीची पारडी फिरतात. एक गुलाम सीझरपेक्षाही मोठा होतो. अरीनाच्या लुटुपुटूच्या युद्धभूमीवर एका गुलामाकडून रोमन सीझरचा पराभव होतो.
कॉमोडस मॅक्सिमसपुढे नेहमीच खुजा होता. पण आजवर हे सत्य रोमन जनतेच्या लक्षात आलं नव्हतं. आता मात्र कॉमोडस - मॅक्सिमसमधला विरोधाभास लोकांच्या नजरेत अगदी ढळढळीतपणे आला आहे. कॉमोडसच्या एकेक कपटी वाराला सहज तोंड देणारा मॅक्सिमसचं नेतेपण आता लोकांबरोबरच सेनेटर ग्राकसलाही मान्य झालं आहे. ल्युसिअसच्या जिवाची भीती घालून अन्याय्य आणि अनैतिक मागण्या करणाऱ्या कॉमोडसचं खरं रूप पाहून मुळापासून हादरलेली ल्युसिलाही आता मॅक्सिमसला पाठिंबा देते आहे. ल्युसिअसकडे पाहून आपल्या निष्पाप मुलाची आठवण येणारा मॅक्सिमस ल्युसिलाचा संघर्ष पाहून अखेरीस तिची साथ स्वीकारतो. रातोरात रोममधून बाहेर पडून आपल्या सेनेला घेऊन दोन दिवसात रोमवर कब्जा मिळवायची योजना ल्युसिला, मॅक्सिमस आणि सेनेटर ग्राकस आखतात. पण ऐनवेळी ग्राकसला अटक होते, मॅक्सिमसला दगा देऊन पकडलं जातं आणि कॉमोडस ही योजना उधळून लावतो.
या परिस्थितीमध्ये मॅक्सिमसचा खून किंवा वध झाला तर तो हुतात्मा होईल आणि जनतेचा असंतोष उफाळून येईल हे ओळखून कॉमोडस अखेरचा विषभरा दंश करतो. रोमच्या लोकांसमोर कलोझियमच्या अरीनामध्येच मॅक्सिमसला लढाईत मारायचा बेत कॉमोडस आखतो. त्याने आपली लोकप्रियता परत येईल अशी त्याला खात्री असते.
आपल्याविरुद्ध कट करताना पकडल्या गेलेल्या सख्ख्या मोठ्या बहिणीला ल्युसिअसच्या जिवाची भीती घालून आपल्याशी लग्न करायला भाग पाडणारा कॉमोडस अजूनही सशाच्या काळजाचाच आहे. साक्षात मृत्यू समोर उभा राहिल्यावर त्याच्याकडे हसून पाहण्याची धमक त्याच्याकडे नाही. रणांगणात आपण मॅक्सिमसला सरळसरळ कधीच नमवू शकणार नाही हे ओळखून युद्ध सुरू व्हायच्या आधी मॅक्सिमसच्या पाठीत तो खंजीर खुपसतो. जखमी अर्धमेल्या अवस्थेत मॅक्सिमसला रणांगणावर आणलं जातं. आणि सुरू होतो एका विश्वविजयी योद्ध्याचा सर्वश्रेष्ठ रणसंग्राम.
त्याही अवस्थेमध्ये शत्रूवर जीवघेणे प्रहार करीत, त्याचे प्रहार चुकवीत मॅक्सिमस त्याला निःशस्त्र करतो. धर्मयुद्धाचे नियम कधीच न विसरणारा सच्चा सैनिक असल्यामुळे कॉमोडस निःशस्त्र केल्यावर तो आपली तलवारही टाकून देतो. आता मात्र कॉमोडसला भान राहिलेलं नाही. आसपास उभ्या सैनिकांकडे तो तलवार मागतो. पण युद्धाच्या नियमांप्रमाणे त्याला तलवार मिळणार नाही हे लक्षात आल्यावर आपल्याच पायापाशी लपवलेला खंजीर काढून तो मॅक्सिमसवर वार करू पाहतो. नेहमीच परिस्थितीपेक्षा मोठा होणारा खराखुरा धीरोदात्त नायक मॅक्सिमस त्याच खंजिराने उरल्यासुरल्या शक्तीनिशी कॉमोडसला कंठस्नान घालतो.
रोमच्या लाखो प्रजाजनांच्या साक्षीने कपटी कॉमोडसचा अंत होतो. आता मात्र मॅक्सिमसला 'त्या' जगापासून अधिक काळ दूर राहणं शक्य नाही. तो ती वाट चालूही लागतो. पण त्याच्या घराच्या उंबरठ्याशी त्याचे प्राण अडखळतात. अजून त्याने त्याची सगळी कर्तव्यं बजावलेली नाहीत. ल्युसिलाला पाहून तो थांबतो. ल्युसिअसचं भविष्य सुरक्षित असल्याची तो तिला ग्वाही देतो. सेनेशिवाय लढलेला हा रोमचा खरा सत्ताधीश रोममध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचे आदेश देतो. जर्मेनियाच्या सीमेवर बर्फात गोठणाऱ्या आणि स्वार्थी राजकारणामुळे अन्याय सोसत खितपत पडलेल्या आपल्या प्रिय सैनिकांना त्यांचं स्वातंत्र्य बहाल करतो. शेवटी सीझरच्या जात्या जिवाच्या अखेरच्या इच्छेला आपण योग्य न्याय देऊ शकलो या समाधानात इहलोकातून परलोकाचा त्याचा प्रवास संपतो. त्या जगात त्याचे आप्त त्याला भेटतात रोममध्ये एक नवी पहाट होते. आयुष्यभर अनेक लढाया जिंकलेला हा वीर मरताना माणसांपेक्षा, नियतीपेक्षा , एवढंच नाही तर प्रत्यक्ष जीवनापेक्षाही मोठा होतो. एका सुडो-आफ्रिकन भाषेत लिहिलेल्या गाण्याचे सूर आपल्याही कानात घुमत राहतात. हा प्रसंग नाट्यमयतेची चरम सीमा गाठणारा तिसरा बिंदू ठरतो.
या शोकांतिकेचा हा शेवट इतका परिणामकारक आहे की तो लख्ख सूर्यप्रकाशही क्षणभर करडा वाटायला लागतो. ग्रीक ऑपेराचे सूर काळजाला विद्ध करून जातात. असं वाटतं की काळाचं हजारो वर्षांच अंतर कुठल्या कुठे नाहीसं झालंय आणि हा क्षण त्या क्षणाशी एकरूप झालाय. त्या गाण्यातल्या शब्दांचा अर्थ कळत नाही पण 'आता मी मुक्त आहे' असा त्यातला भाव समजायला शब्दांची गरजच पडत नाही. डोळे मिटून बसलं तर संपूर्ण चित्रपट डोळ्यांसमोर जसाच्या तसा पुन्हा एकदा पाहता येईल इतका सखोल परिणाम करणारा दुसरा चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही.
बाकी चित्रपटाची पटकथा घट्ट आणि बांधेसूद आहे. दिग्दर्शकाचं कौशल्य वादातीत आहे. कलोझियममधली दृश्यं तर संगणकावर घडवून नंतर इथे चिकटवली आहेत अशी शंकासुद्धा येऊ नये इतकी बेमालूम जमली आहेत. युद्धाचे प्रसंग अंगावर काटे उभे करतात. पहिल्या लढाईच्या चित्रीकरणाच्या वेळी जंगलातील झाडांना इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणाऱ्या आणि नंतर इथे असं काही घडलं होतं अशी शंकाही येऊ नये अशी चोख साफसफाई करणाऱ्या निसर्गप्रेमी तंत्रज्ञांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट झाल्यामुळे ही एक जमून आलेली भट्टी ठरली आहे. मॅक्सिमसची लार्जर दॅन लाईफ भूमिका जिवंतपणे साकारणाऱ्या रसेल क्रो या गुणी अभिनेत्याबद्दल तर काय सांगावं? कुठेही भडकपणा किंवा बटबटीत छटा न येऊ देता त्याने उभा केलेला मॅक्सिमस अक्षरशः अविस्मरणीय आहे. या अभिनेत्याची खरी ताकद ' अ ब्यूटिफुल माइंड ' या चित्रपटात त्याने उभ्या केलेल्या नोबेल विजेत्या स्किझोफ्रेनिक शास्त्रज्ञाकडे बघून लक्षात येते. विशेषतः ग्लॅडिएटर पाहिल्यावर जर ब्यूटिफुल माइंड पाहिला तर त्याने डॉ. जॉन नॅश यांचं व्यक्तिमत्त्व साकारताना मुळातून बदललेली संपूर्ण देहबोली पाहून थक्क व्हायला होतं.
चित्रपट पाहताना प्रेक्षकांना हे सगळं केवळ काल्पनिक आहे या गोष्टीचा संपूर्णपणे विसर पडतो आणि ते पडद्यावरच्या कथेशी अगदी एकरूप होऊन जातात. इतकं जबरदस्त सामर्थ्य या चित्रपटात आहे यातच मला वाटतं सारं काही आलं.
आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून आनंद झाला. अभंगांनी मराठीच काय पण परभाषिक किंवा परदेशी व्यक्तींनाही गोडी लागावी हे वाचून गंमत वाटली. ह्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी म्हणून ती बातमी येथे उतरवून ठेवत आहे.
ईसकाळातली मूळ बातमी : "ऑपेरा सिंगर' गातेय मराठी अभंग...
प्रवासवर्णने हा काही नवीन साहित्यप्रकार नाही. किंबहुना गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास'ने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे उत्कट चित्रण करून अर्वाचीन साहित्याला एक वेगळे परिमाण दिले. मात्र त्यानंतर बराच काळ प्रवासवर्णनांमध्ये ललित, विनोदी आणि आत्मनिष्ठ या तीन गोष्टींवर (एकत्रित वा वेगवेगळा) भर देण्यात आला. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' हा एक अपवाद (पण एकच नव्हे; जगदीश गोडबोले, आणि त्यांच्यासारखे इतर कार्यकर्त्यांनी वेळोवेळी सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणारे वृत्तांत लिहिले), पण एकंदर प्रवासवर्णन म्हटले की याप्रकारचे लेखन झाकोळले जाते हे खरे.
विजयादशमीनिमीत्त स्वरनगरी रंगमंच येथे "अभिनेते व प्रवासगाणी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही निवडक अभिनेत्यांच्या अभिनय प्रवासावर हा कार्यक्रम आधारीत होता. "स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स्" व "थर्ड बेल एंटरटेनमेन्ट" तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्यांशी संवाद साधून त्यांचा आत्तापर्यंत झालेला अभिनयाचा प्रवास या कार्यक्रमाद्वारे रसिकांसमोर आला. कार्यक्रमाचे दिग्दर्शन व निवेदन स्वप्नील रास्ते याचे होते. अरुण नलावडे, भार्गवी चिरमुले, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी - मोने, प्रसाद ओक, मधुराणी गोखले - प्रभुलकर या अभिनेत्यांशी निवेदक स्वप्नील रास्ते याने संवाद साधला. गपागोष्टी, अनुभव, किस्से आणि गाणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. त्याचबरोबर सा रे ग म प अजिंक्यतरा प्रसाद ओक् व मधुराणी गोखले यांनी काही निवडक गाणी रसिकांसमोर सादर केली.