मला आवडलेले प्रतिशब्द

आतापावेतो अनेक ठिकाणी अनेक संदर्भांत तुम्ही इतरभाषिक शब्दांना मराठीत वापरलेले प्रतिशब्द वाचलेले / वापरलेले असतील. त्यातल्या आपल्याला आवडलेल्या प्रतिशब्दांची येथे चर्चा करावयाची आहे.

उदा. मला माध्यमिक शालेय जीवनापासून आवडलेले दोन प्रतिशब्द म्हणजे

१ आरोहित्र (स्टेप अप ट्रान्स्फॉर्मर)

२ अवरोहित्र (स्टेप डाऊन ट्रान्स्फॉर्मर)

हे आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे ते एक तर कानाला बरे वाटतात. अर्थाला नेमके आहेत आणि कदाचित मूळ भाषेत शक्य नसलेलाही शब्दप्रयोग प्रत्येक प्रकारच्या रोहित्रासाठी साधलेला आहे.

हे केवळ उदाहरणादाखल लिहिले आहे.

कृपया हे लक्षात ठेवावे आवडणे / न आवडणे हे व्यक्तिगत असते. त्याला तार्किक संगती असेलच असे नाही. शिवाय नुसत्या शब्दांची यादी न देता आपल्याला ते का आवडले ह्यावर काही लिहावे.

(वि‌. सू. :

१. या चर्चासत्रात फक्त 'आवडलेल्या'च प्रतिशब्दांबद्दल लिहायचे आहे.

२. आवडलेले प्रतिशब्द प्रचलित (वापरात) असणे आवश्यक आहे.)