मला न आवडलेले प्रतिशब्द

आतापावेतो अनेक ठिकाणी अनेक संदर्भांत तुम्ही इतरभाषिक शब्दांना मराठीत वापरलेले प्रतिशब्द वाचलेले / वापरलेले असतील. त्यातल्या आपल्याला न आवडलेल्या प्रतिशब्दांची येथे चर्चा करावयाची आहे.

उदा. मला न आवडलेला एक प्रतिशब्द म्हणजे

१ अकादमी (ऍकॅडमी)

हा न आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे असे मुद्दाम केलेले अपभ्रंश कानाला बरे वाटत नाहीत. दुसरे म्हणजे प्रबोधिनी (किंवा प्रबोधिका) हा शब्द मला जास्त सुबोध वाटतो.

हे केवळ उदाहरणादाखल लिहिलेले आहे.

कृपया हे लक्षात ठेवावे आवडणे / न आवडणे हे व्यक्तिगत असते. त्याला तार्किक संगती असेलच असे नाही. शिवाय नुसत्या शब्दांची यादी न देता आपल्याला ते का आवडले नाहीत ह्यावर काही लिहावे.

(वि‌. सू. :

१. या चर्चासत्रात फक्त 'न आवडलेल्या'च  प्रतिशब्दांबद्दल लिहायचे आहे.

२. न आवडलेले प्रतिशब्द प्रचलित (वापरात) असणे आवश्यक आहे.)