आजच्या म. टा. मधील अस्वस्थ करणारे पत्र

आजच्या म. टा. मधील 'संवाद' पुरवणीतील 'माझेही मत या सदरातील हे पत्र.

हे पत्र

त्यावरील ही माझी संकेतस्थळावर जाऊन नोंदविलेली प्रतिक्रिया मा. संपादक, आजच्या म. टा. संवादमधील ’माझेही मत’ या सदरात श्री. विजय दांडेकर यांनी लिहिलेल्या पत्रातून एकुण असा सूर असल्याचे जाणवले की स्वा. सावरकर यांनी बोटीतून समुद्रात उडी मारलीच नव्हती. या साठी श्री. दांडेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक व स्व्तातंत्र्यसंग्रामाचे अभ्यासक कै. डॉ. य. दि. फडके यांचा दाखला दिला आहे. या संबंधी मला असलेल्या दोन शंका १) दांडेकरसाहेबांनी ह प्रश्न डॉ. फडके यांच्या हयातीत का उपस्थित केला नाही? आता ते नसताना ’आज ते असते तर त्यांनी खुलासा केला असता’ असे लिहिण्यात काही अर्थ नाही २) जेव्हा अंदमानान येथील स्वातंत्र्यज्योतीवरील स्वा. सावरकर यांचे उदगार मणीशंकर अय्यर यांनी काढून टाकले तेव्हा बराच गदारोळ उठला होता व कोट्यावधी स्वा. सावरकरभक्त संतप्त झाले होते व त्या अनुषंगाने अनेक चर्चा घडल्या होत्या. दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात मी या संबंधी डॉ. फडके यांची मुलाखत पाहिली होती. डॉ. फडके यांच्या सारख्या परखड संशोधकाने जर त्यांना असे काही माहित असते तर त्यांनी ते लपवून न ठेवता जनतेला सांगितले असते. स्वा. सावरकरांची धास्ती जन्मभर बाळगणाऱ्या ईंग्रजांनी तर अशी काही कपोलकल्पित घटना स्वा. सावरकरांचे महात्म्य प्रस्थापित करते आहे हे लक्षात येताच अशी उडी न घेतल्याचे ठणाणा करून सांगितले असते व स्वा. सावरकरांना जनतेचा आदर लाभणार नाही याची पूर्ण काळजी घेतली असती. मात्र इंग्रजसरकारने या घटनेचा इंकार केल्याचे कुठे ऐकिवात नाही. स्वा. सावरकरांची ही जगप्रसिद्ध उडी हे कोट्यावधी हिंदुस्थानियांचे श्रद्धास्थान आहे. श्री. दांडेकर महाशयांना अशी घटना घडलीच नाही असे म्हणायचे असेल तर त्यांनी स्वा. सावरकरांचे ते पत्र व अन्य पुरावे कृपया सादर करावेत. ते खरे असल्यास आम्ही अंध भक्ती न करता आम्हाला आराध्य असले तरी स्वा. सावरकरांनी अशी उडी मारली नव्हती हे मनोमन मान्य करू.