आदरणिय ज्येष्ठ, कनीष्ठ व समवयस्क, मित्रांनो आणि मैत्रीणींनो, राम राम.
मनोगताच्या व्यासपीठाचा दर्जा, इतर समुहांपेक्षा फारच उच्च असल्याचे जाणवले. म्हटले चला, मला, तुम्हाला, इतरांना कधी ना कधी पडणाऱ्या / भेडसावणाऱ्या या प्रश्नालाच थेट हात घालावा आणि उहापोहातून कोणते लोणी हाती लागते ते पाहावे. मला "मैत्री" या विषयावर निबंध वा प्रबंध मुळीच अपेक्षीत नाही. इथे, स्वानुभव, संदर्भ [ दासबोधा सारख्या ग्रंथांचे ] किंवा नितीग्रंथांचे [ जसे चाणक्यनीती / विदुरनीती / ईसापनीती ] काय म्हणणे आहे? सहजिवनाच्या कुठल्या प्रकारात " मैत्री" चे संबंध मोडतात? याची तत्त्वे /संकल्पना कोणती? याचे सर्वच्या सर्व कार्य-कारण भाव कोणते? मैत्री, जडते / बिघडते कशी? क्रम कोणता? [ उदा. तत्परता संपली की मैत्री लोप पावू लागते. ] पौराणीक संदर्भ, प्रत्यक्ष समाजीक परिस्थिती, २४ कॅरेट मैत्री / मित्र या कविकल्पना की वास्तव? मैत्री चे आदर्श कोणते? [ उदा. रोल्स-रॉईस] याच्या मर्यादा काय? म्हणी/ वाक्प्रचार / थोरांचे वचन काय व कोणते? याचे फायदे / तोटे? [ मैत्रीत हिशेब मांडणाऱ्यांसाठी ] , असे सगळे, सगळे अपेक्षीत आहे. नवनवीन पिढ्यांची गडबड काय आहे माहित आहे का? इथे, मागील पिढ्यांनी,[पणजोबा, आजोबा, वडील] आपापल्या अनुभवाचा "लॉग" एकत्रीत लिहून ठेवलाच नाही. त्यामुळे, आयुष्याचा मोठा वेळ सामाजीक प्रयोग, Trial and error, कधी कधी blunder मध्ये वाया जातो. इथे अनुभवाच्या घड्याळात, किती वाजले? याचे उत्तर शोधण्यासाठी, घड्याळाचा शोध लावण्यात, घड्याळ कुठे आहे, हा शोध घेण्यात किंवा घड्याळ बनवण्यात वेळ खर्ची होतो.
तर आपणा सर्वांस नम्र विनंती की सर्वांनी आपापले अत्त्युच्च दर्जाचे योगदान द्यावे व नवीन पिढ्यांचे कोटी कोटी प्रणाम घ्यावेत.