ह्यासोबत
- कामथे काका ( भाग पहिला )
- कामथे काका ( भाग दुसरा)
- कामथे काका (भाग तिसरा)
- कामथे काका (भाग चौथा)
- कामथे काका (भाग पाचवा)
- कामथे काका(भाग सहावा)
- कामथे काका (भाग सातवा)
- कामथे काका (भाग आठवा)
- कामथे काका (भाग नववा)
- कामथे काका (भाग दहावा)
- कामथे काका (भाग अकरावा)
- कामथे काका (भाग बारावा)
- कामथे काका (भाग तेरावा)
- कामथे काका(भाग चौदावा)
- कामथे काका(भाग पंधरावा)
- कामथे काका (भाग सोळावा)
- कामथे काका (भाग सतरावा)
- कामथे काका (भाग अठरावा)
- कामथे काका (भाग एकोणिसावा)
- कामथे काका (भाग विसावा)
- कामथे काका (एकविसावा)
- कामथे काका (भाग बाविसावा)
- कामथे काका (भाग तेविसावा )
- कामथे काका (भाग चोविसावा)
- कामथे काका (भाग २७ वा)
- कामथे काका (अंतिम भाग ६ वा)
- कामथे काका (अंतिम भाग ७ वा)
- कामथे काका (अंतिम भाग ८वा)
- कामथे काका - अंतिम भाग (संपूर्ण)
त्याच्या मागे एक नोकरासारखा दिसणारा माणूस लहानशी ब्रीफकेस घेऊन उभा होता. तोही काही कमी नखरेल नव्हता. डोक्यावर विदूषकासारखी उंच टोपी, सतत हालणारे चंचल डोळे, उंदरासारखे बारीक नाक, लबाड जिवणी, छोटे छोटे कान, अंगात सिल्कचा शर्ट, त्यावर घट्ट बसणारं जाकिट खाली टाइट पँट घातलेली. तो ड्रायव्हर असावा. ते दोघेही सूर्याच्या मागून केबिनमध्ये शिरले. काही क्षणातच काकांच्या टेबलावरचा फोन पेटला. त्यांनी तो उचलला. दादाने त्यांना आत बोलावले होते. काका केबिनच दार उघडून आत शिरले. सूर्याने त्यांना तिरस्काराने विचारले, " क्या है? आपका क्या काम है? " पण दादा लगेच म्हणाला, " मैने बुलाया है" आणि त्यांना आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. सूर्याला ते अजिबात आवडलेलं दिसलं नाही. आलेलं कोणीतरी मोठं गिऱ्हाईक असावं, आणि अशा बाबतीत काकांना मध्ये घेणं त्याला मान्य नव्हतं. पण तो गप्प बसला. मगाशी आत आलेले दोघे दादाच्या समोरच्या खुर्च्यांमध्ये बसले होते. त्यातल्या चिटणिसाने आपला हात मिळवण्यासाठी दादापुढे केला. त्याच्या चारी बोटातल्या हिऱ्या माणकांच्या अंगठ्या चकाकल्या. त्याबरोबर काकांचे आणि दादाचेही डोळे चमकले. दादाने हात मिळवताना अर्थपूर्ण नजरेने सूर्याकडे पाहिले. पण त्याचा राग गेलेला नसल्याने त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही. चेहऱ्यावर येणारी नापसंती टिकू न देता दादाने विचारले, " कौन है आप और कहांसे आते है? "....... थोडा वेळ जाऊ देत (जणू काही सांगावं की नाही असा विचार करून ) तो म्हणाला, " जी हम है जयसिंगजी महाराजजीके दिवाणजी साबरमल उदेपुरवाले. आपसे कुछ काम है........ " मग त्याने काका आणि सूर्या बद्दल नापसंती दर्शवित म्हंटले, " हम अकेलेमे बात कर सकते है क्या? ". दादाला असं बोललेलं आवडलं नाही, पण तो म्हणाला, " हम सब एक है, जो भी कहना है इनके सामने बिना झिझक बताईये "..... दुसरे दोघे जाणार नाहीत असं पाहिल्यावर तो स्थिरावला आणि शब्द जुळवीत म्हणाला, " देखिये, हमारे महाराजजीको संतती नही है. इसलिये....... " तो पुढे बोलण्याच्या आत दादा म्हणाला, " तो क्या हम पैदा करे?. तरीही न चिडता नम्रतेने दिवाणजी म्हणाले, " नही, नही, आप गलत समझ रहे है, हमारा वो मतलब नही. देखिये, भगवानकी क्रिपासे राजासाब के पास कई अरबोंकी दौलत है. लेकीन संतती नही. उनके पास इस सिलसिलेमे आफ्रिकासे एक तांत्रिक आये है. वो कुछ काला विधी करना चाहते है. जिसके लिये एक बरसके कम उमर वाले बच्चोंकी पांच खोपडियोंकी जरुरत है. और वो भी विधीके तारीखसे एक दिन पहलेतक की ताजी होनी चाहिये. हमे आपका नाम किसीने सुझाया, इसलिये हम यहं आये. "..... मग दिवाणजीने थोडा वेळ जाऊ दिला. दादाला त्याच्या लहानपणची आठवण झाली. त्याच्या गावात मुलं पळवणारी टोळी आली होती. मुलांना पकडून त्यांचे हात पाय तोडून एक तर भीक मागायला लावीत किंवा अघोरकर्मांसाठी त्यांचा बळी देण्यासाठी विकत. आई वडलांनी दादाला घरात जवळ जवळ आठवडाभर लपवलं होतं. अशी टोळी गावात काही महिने तरी कार्यरत होती. ते दादाला आठवलं आणि त्याने तो अस्वस्थ झाला. मग विचार करून म्हणाला, " आपको हम बच्चोंकी जान लेनेवाले गुनहगार लगते है? और ये कालाविधी वगैरे हम नही जानते, ना जानना चाहते है. आप यहांसे दफा हो जाईये, जाईये यहांसे.... " दादा एकदम एवढा चिडेल असं काकांना वाटलं नाही. सूर्यालाही जरा आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं.
एवढं झाल्यावरही दिवाणजी नम्रतेने म्हणाले, " अरे दादासाब, आप तो बुरा मान गये. आप कौनसा भी जटिल काम कर सकते है, ऐसा सुनकरही हम आपके पास आये. " दादाने त्यांना हळू आवाजात विचारले, " आप किसके पास गये थे?..... पेरियर के पास? "..... दिवाणजींची बोलती बंद झाली. दादाची नजर चुकवीत ते खालच्या मानेने हो म्हणाले. " फिर वो क्या बोला? कितना मांगा उसने? " दादाने खोदायला सुरुवात केली. पेरियर दादाचा प्रतिस्पर्धी. ज्याचा एक कान दादाबरोबरच्या चकमकीत तुटला होता...... दिवाणजी चाचरत म्हणाले, " उसने मना किया, और, और और..... "
"अरे, और और क्या करता है? क्या बोला वो? " दादाने अधीरतेने विचारले. "ये काम सिर्फ आप कर सकते है, ऐसा बोला. " घाबरत घाबरत दिवाणजी बोलले...... " तो इसलिये आप यहां आये है. " चेहऱ्यावर एक प्रकारची गुर्मी आणित दादा म्हणाला. मग त्या ड्रायव्हरच्या हातात असलेली ब्रीफकेस टेबलावर ठेवीत दिवाणजी म्हणाले, " ये पेशगी भी लाये है हम. विचार करून दादा म्हणाला, " कितना है? "... "जी, दो है (दो म्हणजे दोन लाख) " दादालाच ऐकू येईल अशा आवाजात दिवाणजी म्हणाले. पण ऐकू तिघांना आलं. माणूस जेव्हा दुसऱ्याला ऐकू येऊ नये म्हणून बोलतो, तेव्हा तो जे कोणीही ऐकू नये तेच शब्द मोठ्याने उच्चारतो. दादाच्या कपाळावरची शीर फुगली. तो म्हणाला, " दो लाख? "....... "जी, जी, दो लाख दिये है, पेशगीके तौर पर " दिवाणजी दिलेली रक्कम फार मोठी आहे अशा आविर्भावात भुवया उंचावून म्हणाले....... आता मात्र दादा जाम भडकला. "ऐसा गंदा काम और सिर्फ दो लाखकी पेशगी? ये क्या किराना की दुकान है? "
..... "अरे, नही नही दादासाब इस काम के तो हम आपको पचास देंगे (म्हणजे पन्नास लाख ) " स्वतःला सावरीत झटकन दिवाणजी म्हणाले.
" हम देंगे? फिर महाराजजी क्या देंगे. पचास तो आपकी तरफसे हो गये. " दादा समजूनही खंवचटपणे म्हणाला. " जी नही, हम मतलब महाराजजी " दिवाणजींनी चूक दुरुस्त केली.
.... " बडे मख्खीचूस है आपके महाराजजी, मजाक कर रहे है क्या वो? पांच बच्चोंकी जान और सिर्फ पचास लाख! " दादाने टोला मारला....... " जी आप बोलिये जी...... " परिस्थिती हातातून जाऊ नये या हेतूने दिवाणजी म्हणाले......... काही वेळ दादाने असाच जाऊ दिला. पन्नास लाख काही कमी नाहीत अशा अर्थाने दिवाणजींनी एकदा काकांकडे व एकदा सूर्याकडे मदतीसाठी पाहिले. पण दोघेही काही बोलले नाहीत. मग दादाच निश्चयी आवाजात म्हणाला, " दो करोडके नीचे ये काम नही हो सकता. एक करोड एडवान्समे देना पडेगा, और बाकी काम पूरा होनेके बाद, समझे. जाईये, जाकर समझाईये महाराजजीको. " दिवाणजींचा चेहरा उतरला. त्यांचा त्यात "कट " असावा, तो मिळण्याची शक्यता त्यांना दिसत नसावी. तरीपण त्यांनी टेबलावरची बॅग उघडून पुढ्यात ठेवली आणि म्हणाले, " ये सिर्फ आपके स्वागतके लिये है. इसका अपने वेव्हारपर कोई असर नही होगा. ".......
दादाने बॅग काकांच्या हातात दिली आणि नमस्कार करीत उभ्या राहिलेल्या दिवाणजींना निरोप देताना म्हणाला, " आप जब एडवान्स भेजेगे तबसे हमारा जिम्मा चालू...... " दिवाणजी ताठ होत काही न बोलता ड्रायव्हरसहित बाहेर पडले. काकांना चांगलाच धक्का बसला. या कामातून सुटायलाच पाहिजे. हे आपलं क्षेत्र नाही. फोन घेणं हिशेब ठेवणं, इथपर्यंत ठीक आहे. काहीतरी विचार करायलाच पाहिजे. सूर्याचा राग अधिकच वाढला. तो काकांच्या हातातल्या बॅगेकडे अधाश्यासारखा पाहत होता. काकांना बसलेला धक्का जाणवून दादा म्हणाला, " काकाजी, जिंदगी जीनेके लिये खतरा तो उठानाही पडता है. यहां कोई किसीपर उपकार नही करता, सीधा लेन देन का हिसाब है. यमराज के माफिक. जिसको जमता है वो आगे बढता है, नही जमता वो जमकर वही सडता है..... जाईये, ये काला विधी क्या चीज है, इसकी जानकारी ले आईये. इसके बारेमे कैसा जानना, कितना जानना, ये आपका काम है. उस मख्खीचूसने एडवान्स भेजनेसे पहले, ये जानकारी मुझे चाहिये. ये बूढा सच बोलता है या झूठ, ये मालूम करो. "
बॅग तिथेच ठेवून ते बाहेर आले. त्यांना अचानक हे काम सोडून पळून जावंस वाटू लागलं. उद्या साधनाकडे जायचंय, तिला हे सांगणं किती कठीण आहे. कुणाला सांगावं, कुणाचा सल्ला घ्यावा. अस्वस्थता सुचू देईना. त्यात दादाने त्यांना पुन्हा आत बोलावलं. ते आत शिरले. दादा म्हणाला, " ये रखिये.... " असं म्हणून त्याने त्यांना शंभराची पाच बंडलं दिली. कपाळावरचा घाम पुसत त्यांनी ती घेतली. आणि ते बाहेर आले. इकडे दादा सूर्याला म्हणाला, "देख, ये काका जैसे लोग मजबूर रहते है इनको अपने अंडर रखनेका एकही तरीका है...... पैसा! " पैशाची तरफदारी करीत काकांनी स्वतःच्या मनाला समजावलं. हे काही त्या पूर्ण कामातले पैसे नाहीत. "धिस इज वेलकम मनी ". आणि तसंही हे घेतले नाहीत तर आत्ताच बरेच बखेडे होतील, त्यापेक्षा मध्येच पलटी मारणं बरं पडेल. तरीही मन ठसठसत राहिलं. मन परत म्हणालं, " तो म्हातारा असला प्रस्ताव घेऊन आला नसता तर हे पैसे मिळाले असते का? म्हणजेच हे पैसे त्या कामाचेच आहेत, आणि तू हे काम मान्य केलंस. तू पाच तान्ह्या बाळांचा जीव घ्यायला जबाबदार आहेस. हे आधी मान्य कर. "अप्रत्यक्षपणे आपण ह्या पापात भागीदार होणार. होणार का? आणि का होणार?..... बाहेर एकटेच असल्याने काका स्वतःशीच मोठ्याने ओरडले, " नाही, मी जबाबदार नाही. मागे घेतले ते पैसेही अशाच कोणत्या तरी गुन्हेगारीतले होते ना? मग ते कसे चालले? " खिशातलं पैशाचं ओझंही तेवढं वाईट नव्हतं. पैसा असणं आणि नसणं यात केवढी तफावत आहे. मनातले टोचणारे विचार हळू हळू बोथट झाले. काकांनी मनापासून सध्यातरी सुटका करून घेतली होती. त्यांनी मग आत फोन लावला. दादाला सांगितलं, आणि ते घरी निघाले. पैशाचं कितीही आकर्षण वाटलं तरी "पळा पळा, कोण पुढे पळे तो? " या उक्तीप्रमाणे बाहेर पडले. सोमवारी परत कामावर जायचं होतं. तेव्हाचं तेव्हा बघू.
आजूबाजूची गर्दी त्यांना स्वतःपासून वेगळी वाटू लागली. किती सामान्य, ताणरहित जीवन जगतात, हे लोक? आपणच असे कमनशिबी का? मग मन म्हणालं, " काहीतरी धोका पत्करल्याशिवाय पैसा तरी कसा मिळणार? "...... " म्हणून काय दुसऱ्याचा जीव घ्यायचा? "परत मन कुरतडू लागलं. मग त्यांनी निश्चय केला. मी हे करणार नाही आणि करूही देणार नाही. तंद्रीतच ते गाडी पकडून घरी पोचले. त्यांचं लक्ष कशातच लागेना. रमेशलाही त्यांचं काही बिघडलं असावं, असं वाटलं. त्याने विचारलंही, " कामावर काही टेन्शन आहे का? " अर्थातच ते नाही म्हणाले. त्यांचं जेवण कसंतरी झालं. दहा वाजताच ते अंथरुणावर पडले. त्यांना झोप येईना. म्हणून ते उठून बसले. "आपण अडकत चाललोय, आपण अडकत चाललोय " हे वाक्य ते पुन्हा पुन्हा म्हणू लागले. म्हणून ते सुटणार तर नव्हते....... काय मार्ग आहे आपल्याला?........ मग त्यांच्या मनात "पोलिस " हा शब्द आला. एखाद्या अंधाऱ्या पण खोल विहिरीतून बुडबुडा यावा तसा. त्यांनाही आश्चर्य वाटलं. हा विचार कुठून आला? आणि पोलिसांशी काय संबंध आहे?.... हां, पोलिसांकडून आपण पकडले गेलो तर? विचारासरशी त्यांच्या अंगावर काटा आला. एकदा बेड्या पडलेल्या आहेत. खूप विचार करूनही त्यांना पोलिसांचा उपयोग लक्षात येईना. पोलिस म्हटलं की बेड्या आणि तुरुंग, हेच साधारण माणसाच्या समोर येतं....... इतकं असूनही घाबरत, घाबरत येणारा नवा विचार वर आला...... आपण योग्य वेळी पोलिसांना खबर दिली तर?....... आपल्याला त्यांचं संरक्षण मिळेल?..... माफीचा साक्षीदार..... त्यांना आपली पोलिस चौकशी आठवली. चौकशीत त्या एसीपीने त्यांना विचारलं होतं. बोला, मि. कामथे या व्यवहारात कोण कोण वरिष्ठ गुंतलेले आहेत? हा पैसा कोणाकोणा विभागला जातो? तुम्हाला माफीचा साक्षीदार करू. अगदी "रेड हँड " पकडलं असलं तरी. त्यावेळेला तरी त्यांना खोटं आमिष वाटलं होतं. तसं त्यांना या बाबतीत त्यांच्या एचोडी "विश्वनाथनचं "नाव कानावर आलं होतं. पण ते बोलले नाहीत. उगाच काहीतरी भकण्यात अर्थ वाटला नव्हता. माफीचा साक्षीदार रिट्रेस झाला तर? त्याची हालत फार वाईट होते असं त्यांनी वाचलं होतं. भारतीय दंड विधानाचा थोडाफार अभ्यास त्यांनीही केला होता. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. इथे पाच लहान जीवांचा प्रश्न आहे. मग दमलेल्या मेंदूतून नवीन विचार न आल्याने त्यांनी झोपण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी कामुक विचार उपयोगी पडतात. आपोआपच त्रास दायक विचार माणूस विसरतो, अशी काकांच्या मनाची ठेवण होती, म्हणून त्यांनी साधनाचा विचार बळे बळे करायला घेतला. तिची आकर्षक फिगर, तिच्या अंगाचा वास तिचं कलर कॉंबिनेशन अगदी रोहिणीसारखं वाटू लागलं. तिला सुद्धा आपल्यात इंटरेस्ट असला पाहिजे. नाहीतर केवळ दोन तीन वेळच्या ओळखीवर तिने घरी कशाला बोलावलं असतं? हा प्रबळ विचार त्यांच्या मनात आला आणि झांकळून राहिला. लवकरच ते स्वप्नं रंगवीत झोपेच्या अधीन झाले. पण झोप अधून मधून चाळवत राहिली. ते चुळबुळत राहिले. स्वप्नात त्यांना लहान लहान नवजात बालकांच्या रडण्याचा आवाज येत राहिल. सकाळी ते उशिरा उठले. आठ सव्वा आठ झाले. होते. चहा पिता पिताच रमेश म्हणाला, " आम्ही आज नीताच्या मावशीकडे जेवायला जाणार आहोत. खरं तर तुम्हालाही बोलवलंय तिथे पण उगाच आम्हाला कांडकोंडल्यासारखं होऊ नये म्हणून तुम्ही येऊ नका.. तुम्ही पाहा तुम्हाला काय करायचंय ते. तसंही बाहेर जेवण्याची तुम्हाला सवय आहेच " ते काहीच बोलले नाहीत. सगळं तर ह्यानेच ठरवलंय, मग काय बोलायचं? ते फक्त "ठीक आहे " म्हणाले. आजकाल रमेश बरं बोलायचा. तिरकसपणा थोडा कमी झाला होता. साडेनऊ पर्यंत रमेश आणि नीता श्वेताला घेऊन निघाले. जाताना श्वेताने स्वतः त्यांना टाटा केला.
मग त्यांनी सर्व दैनंदिन विधी उरकले. ठेवणीतला जोधपुरी सूट काढला. तो घालून त्यांनी गुलाबाचा सेंट फवारला. डोळ्यावर गॉगल चढवला. गुळगुळीत दाढी केल्याने ते आता स्मार्ट दिसू लागले. नाही म्हटलं तरी मिळणाऱ्या पैशामुळे त्यांच्या तोंडावर थोडा सुखवस्तूपणाचा कोशेटा चढला होता. रोहिणीला ते हा सूट घातल्यावर आवडत असत. आरशात पाहिल्यावर त्यांना हा सूट नवीन शिवला आणि घातला, तेव्हाची आठवण झाली. अशीच दाढी करून, गॉगल वगैरे लावून आरशा ते समोर उभे होते. आई कुठेतरी बाहेर गेली होती. रमेश खेळायला गेला होता. रोहिणी कणीक मळत होती. तिने बाहेर येऊन त्यांच्याकडे पाहिले. तिच्या तोंडावर काकांना हा सूट छान दिसतोय असे कौतुकाचे भाव होते. दरवाजा उघडा होता, तरी काकांनी तिला मिठीत घेऊन तिची चुंबनं घेतली. तिलाही भान राहिलं नाही. मग लक्षात आल्यावर दिसलं की काकांच्या सुटावर आणि तोंडावरही कणीक लागलेली आहे. ते पाहून ते दोघेही बराच वेळ हसत सुटले होते. आत्ता मात्र रोहिणी नव्हती....... काका भानावर आले. ते आरशात एखाद्या मंत्र्यासारखे दिसत होते. फक्त गुलाबाचं फूल खिशाला नव्हतं. तेही घेऊन लावू, असं त्यांच्या मनात आलं. ते दरवाजा बंद करून बाहेर निघाले. दहा वाजून गेले होते. साधनाकडे जाण्यासाठी त्यांनी मुंबई सेंट्रलला जाणारी बस पकडली..... एक मंत्री आज बसने जात होता.
ते जेवढे बसमधून जाताना उल्हसित होते, तेवढे ते उतरताना राहिले नाहीत. साधनाबद्दलचं शारीरिक आकर्षण आत्तापर्यंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. पण प्रत्यक्षात ते तिने दिलेल्या पत्त्यावर पोचल्यावर त्यांना जाऊ नये असं वाटू लागलं. नाहीतरी साधना एक परकी स्त्री. अशी किती मोकळेपणाने वागणार ती? आपल्याला आकर्षण वाटायला तिची आपली ओळख फार जुनीही नाही. त्यापेक्षा नाही गेलो तर? परत एकदा बोलवेल तेव्हा पाहू. असं म्हणून ते प्रीतम बिल्डिंगबाबत विचारणार इतक्यात त्यांची नजर समोरच्या फूटपाथवर गेली. "प्रीतम बिल्डिंग " असं मोठ्या अक्षरात नाव लिहिलेलं आढळलं. पण परत त्यांच्या मनातला विचार एका आणखी गोष्टीने बदलला. ती म्हणजे तळमजल्यावर असलेल्या बँकेच्या नावाने. बँकेचं नाव होतं " श्रीकृष्ण सहकारी बँक लि. " त्यांची एकदम ट्यूब पेटली. हीच ती बँक, जिची माहिती आपल्याला काढायची आहे. आज रविवार होता. बँक बंद होती. तसंही माहिती कशी काढायची हे त्यांनी काहीही ठरवलं नव्हतं. मग मात्र नकळत ते बिल्डिंगच्या प्रवेशदाराजवळ आले. आत कुठेतरी उत्सुकता होती म्हणा, किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा निर्माण झाल्याने म्हणा, ते बिल्डिंगमध्ये शिरले. बिल्डिंग पंधरा वीस वर्षे जुनी असावी. पूर्वी रंग निळसर असावा. तिथे राहणाऱ्या लोकांनी परत कधी रंग देण्याचा विचार केला नसावा. ते दुसऱ्या मजल्यावर पोचले. फ्लॅट नं. १४ पुढे ते उभे होते. दरवाज्यावर कोरीव नक्षीकाम होते. नेम प्लेट होती. "जितेंद्र आर. मेहता. " त्यांनी बेल वाजवली. आतून " आले, आले... ऽ " असा आवाज आला. दरवाजा उघडला. साधनाबेन दारात उभी होती. ती आज न्हायली असावी. तिच्या अंगावर गुलाबी रंगाचा मॅक्सी होता. डोक्याला टॉवेल गुंडाळला होता. तिने त्यांचं हसून स्वागत केलं. त्यांनी आत यावं म्हणून ती दरवाज्यातून बाजूला झाली. काकांनी डोळ्यावरचा गॉगल काढला आणि ते आत शिरले. आत सगळीकडे सेंटचा सुगंध भरला होता.
सेंटचा मंद सुगंध आणि साधनाचं गोड हसणं यांनी काकांना खूपच बरं वाटलं. बरेच वर्षांनंतर रोहिणीसारखं कोणीतरी आपल्या स्वागतासाठी समोर उभं होतं. काय बोलावं याचा विचार करीत असतानाच तिने विचारलं, " आज मूड ठीक आहे ना? मध्ये भेटलात तेव्हा अस्वस्थ वाटलात म्हणून विचारलं. " काकांनी सगळं ठीक असल्याचं सांगितलं. अचानक त्यांना तिच्या मुलीची आठवण होऊन त्यांनी विचारलं, " सोनाली दिसत नाही कुठे? आहे ना आत? ".... मग तिने मुलीला हाक मारली, " सोना बेटा बाहेर ये. बघ कोण आलय ते..... " अंगावर निळसर रंगाचा बेबी फ्रॉक घातलेली सोनाली बाहेर आली आणि साधनाला चिकटून उभी राहिली. "बेटा काकांना हॅलो कर.... " त्यावर ती अधिकच लाजली आणि तिने तोंड लपवले. साधना म्हणाली, " तू गुड गर्ल आहेस ना, मग काकांना हॅलो कर. " मग तिने हळूच हॅलो म्हटलं. काकांनी तिला जवळ बोलावलं. पण ती लाजून आत पळाली. काकांच्या मनात आलं, आपण तिच्यासाठी काहीच आणलं नाही. ते म्हणाले, " अगं, मी हिच्यासाठी काहीच आणलं नाही, सॉरी. " साधना मान तिरकी करून केस पुशीत म्हणाली, " ठीक आहे हो, एवढं काय त्यात? पुन्हा याल तेव्हा आणा. " काकांना जरा ओशाळवाणी झालं. खरंतर आपण इथे येण्याचं नक्की केलं नव्हत. त्यांना साधना म्हणाली, " या ना आत, घर दाखवते. " काका एका हातात गॉगल धरून तिच्या मागून आतल्या खोलीत गेले. बाहेरचा हॉल साधाच होता. त्यात एका कोपऱ्यात टीव्ही होता. हॉलला दोन खिडक्या होत्या. एक बिल्डिंगच्या मागच्या रोडवर उघडत होती, तर दुसरी पुढच्या भागाकडील मुख्य रोडवर. खिडकीच्या बाजूला सोफा सेट होता. आणि छोट्या टिपॉय सारख्या टेबलावर बांबूच्या काड्यांपासून बनवलेलं बुद्धिबळातल्या घोड्याचं तोंड होतं. त्याच्या डोळ्यांच्या ठिकाणी काचेच्या निळ्या रंगाच्या गोट्या वापरलेल्या होत्या. त्याने तो जास्त उग्र आणि निर्जीव वाटत होता. काकांना त्या शिल्पाचा अर्थ लागेना. काकांना वातावरणाची एक वेगळीच जाणीव होत असे. ते पुढे गेले खरे, पण आतल्या खोलीच्या दरवाजातच उभे राहिले.
आतली खोली म्हणजे एक लहानशी बेडरूमच होती. त्या खोलीला मागच्या बाजूला एक खिडकी होती. आतली खोलीही नीटनेटकी आणि बेताची सजावट केलेली होती. खोलीत समोरासमोरच्या भिंतींवर एकेक मोठा आरसा लावलेला होता. त्या आरशात बेडचं प्रतिबिंब पडत होतं. याचा अर्थ झोपल्यावर आरशात दिसलं असतं. असाच एक आरसा काकांच्या बेडरूम मध्ये रोहिणीने सहज म्हणून लावून घेतला होता. तो त्यांनी तिला काढायला लावला होता. त्यांना बेडवर झोपल्यावर आरशात दिसू नये असं वाटायचं. आणि मुख्य म्हणजे, रात्री बेरात्री उठावं लागलं तर आरशातलं प्रतिबिंब पाहून माणूस एखाद वेळेस घाबरू शकतो असा त्यांचा समज होता. मध्यभागी असलेल्या बेडवर आकाशी रंगाची चादर घातलेली होती जिच्या चारही टोकांना गुलाबी रंगाचे फुलांचे गुच्छ रंगवलेले दिसत होते. आत एक दोन कपाटं होती. स्वैपाकघरातल्या खिडकीतूनही थोडंफार ऊन त्या खोलीतही येत होतं. मध्येच साधना म्हणाली, " ही एक रूम आणि बाजूला आणखीन एक रूम आहे. ती जरा मोठी आहे. " तिलाही दोन खिडक्या होत्या. ज्याने त्या घराचं आर्किटेक्चर केलं होतं तो खिडक्यांचा शौकीन असावा. दुसऱ्या बेडरूममध्ये एक डबलबेड होता. एका भिंतीवर एका माणसाचा फोटो चंदनाचा हार घालून टांगलेला होता. बहुतेक साधनाच्या मिस्टरांचा असावा. काका तिकडे पाहत आहेत असं जाणवून साधना एक खिडकी उघडीत म्हणाली, " हा मिस्टरांचा फोटो आहे. त्यांना जाऊन आता बारा वर्ष होतील. " फोटोतला माणूस फुगीर नाकाचा पण वर्तुळाकार चेहऱ्याचा होता. डोक्यावरचे केस विरळ झालेले दिसत होते. एक टिपीकल गुजराथी लुक त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण डोळ्यांमध्ये प्रेमळ भाव होता. चेहऱ्यावर कोठेही उग्रतेचं चिन्ह नव्हतं. काकांचं तरी प्रथमदर्शनी मत बरं झालं होतं. अर्थातच त्यांच्या मताला किंमत नव्हती. फोटोतला माणूस काही जिवंत नव्हता...... साधनाने बोलता बोलता केस झटकले आणि दोन्ही हात वर करून ते मागे बांधले. काकांना मॅक्सीमधून तिची फिगर पडणाऱ्या उन्हामुळे स्पष्ट दिसत होती. उगाचच गैरसमज नको म्हणून काकांनी कष्टाने मान वळवली. तिने त्यांच्याकडे सहज पाहिलं पण काकांना त्यांच्या भावना जाणवल्या असल्यासारखं वाटलं. त्यांनी मुद्दामच मागे मान वळवली. सोनाली अजूनही आतल्या खोलीच्या दारा आडून त्यांच्या कडे चोरून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अनोळखी छटा होत्या. पण हा माणूस कधी जाणार असा भाव नव्हता. तिने काकांना ओळखलं होतं, पण कुठे पाहिलं ते तिला आठवत नव्हतं.
साधनाला एकदम आठवण झाली. आपण काकांना काही थंड पेय वगैरे घेणार का असंही विचारलं नाही. ती घाईघाईने स्वयंपाकघरात गेली. फ्रीज मधून तिने मँगोलाची बाटली काढली, आणि तीन ग्लास भरून ट्रे मधून ती घेऊन आली. काका हॉल मध्ये येऊन सोफ्यावर बसले. जवळच्याच टिपॉयवर ठेवलेल्या ग्लासेस मधून एक ग्लास त्यांना देत ती म्हणाली, " आमच्याकडे केव्हाही पेय घ्यायचं म्हटलं तरी सोनासाठी पण ग्लास तयार ठेवावा लागतो. सोना, इकडे ये. हे घे " म्हणत तिने सोनाला ग्लास हातात दिला. मग तिने स्वतः चा ग्लास संपवून ती घाईघाईने स्वैपाक घरात जात म्हणाली, " बसा हं जरा. स्वैपाकाकडे बघते, म्हणजे आपल्याला जेवायला बसता येईल. समोरच्या कपाटात पुस्तकं आणि बाहेर आजचा पेपर आहे पाहा. म्हणजे तुमचा वेळ जाईल. " काकांनी सहज म्हणून समोरचे कपाट उघडले. पुस्तकं चाळायला सुरुवात केली. बहुतेक पुस्तकं मराठी होती. काही इंग्रजी, तर थोडी गुजराथीही होती. कादंबऱ्या, गूढ कथा, वेगवेगळे कथासंग्रह आणि एक बायबलची प्रतही दिसली. त्यांना आश्चर्य वाटलं.
(क्र म शः )