कामथे काका (अंतिम भाग ७ वा)

  टाचक्या टिचक्या जागेत किती वेळ पडून राहणार ? गुड्डीला येऊन आता दोन दिवस होत
आले. खरंतर आल्याच्या  दुसऱ्या दिवशीही तो भीतीने
खोलीबाहेर पडला नाही
. तो
फक्त अधूनमधून खिडकीतून
बाहेर
डोकवी.
आणि एखाद
दुसरा हवालदार दिसला
तरी, लहान मुलं
घाबरतात , तशी खिडकी
बंद करी.
तसंही त्या रस्त्यावर
बघण्यासारखं काहीच नव्हतं.
जिकडे पाहावं तिकडे धंद्याकरिता उभ्या
असलेल्या पोरी, दलालांची
भांडणं, त्यांनी केलेली
गिऱ्हाईकाची रस्सीखेच, सडलेल्या
पानाच्या गाद्या , भसाड्या आवाजात
लागलेली अचकट  विचकट
गाणी आणि
ती वाजवणारी भिकारडी
हॉटेलं. त्याच्या मनात
आलं इथे
असं कोणतं मोठं गिऱ्हाईक
येत असणार ? ह्या मावश्या
इतक्या मिजास करतात
ती 
कोणाच्या जोरावर ? दादाला नक्की
किती पैसे मिळत होते कुणास ठाऊक . 
काहीही
असलं तरी
त्याला या वातावरणाचा
आधार होता. धेच त्याला
लपवणाऱ्या मावशीकडून खाना
 
आला होता. बेचव
जेवण त्याने घशाखाली
ढकललं.
तो  संध्याकाळ  होण्याची
वाट पाहत
होता. म्हणजे जमलं
तर खाली
उतरायला बरं. पण तसं झालं नाही . संध्याकाळ झाली
. तो
निघाला. पण जवानी मावशीने त्याच्यावर
नजर ठेवायला सांगितलेल्या पठाणाने त्याला
अडवले. 
 " , सुव्वरके
बच्चे,  जानेको मना
है तेरेको. चल
अंदर. "
 
तसा तो
घाबरट होता. तो पुन्हा आत
आला. रागाने त्याने बाजूच्याच
कमऱ्यात असलेल्या मौसीकडे
दाद  मागण्यासाठी जायचं
ठरवलं. पण जाता तो स्वस्थ बसला. तिने
उरलेले पैसे मागितले तर ? ...
आपण पहिल्यापासून भित्रट
, असं
त्याच्या
मनात आलं. त्याला एकदम
आब्बाजानची आठवण झाली.
ते म्हणायचे, " तेरेमे
हुन्नर नही है बेटा , तेरा ये जनानी चेहरा
देखकरही कोई रहम करेगा तो करेगा, वरना
जिंदगी हराम हो जायगी."  आता त्याला
ते खरं
वाटू लागलं. आपण अगदीच
पुचाट आहोत. आता
फक्त "मिस्चिफ आया तोही कुछ हो सकता है. " असं तो आत्तापर्यंत
तीन चार
वेळा तरी
म्हणाला असेल. संध्याकाळने
तो विभाग
रंगवला. दिव्यांच्या रंगीत प्रकाशात
आकाशातल्या चांदण्यांचं स्वरूप आलं. 
गुड्डी
पुन्हा खिडकीतून डोकवू
लागला. त्याच्या मनात
आलं साला
आपण आणि
या रांडांमध्ये काय
फरक आहे
? आपणही आज खिडकीतच उभे आहोत. चुकून आपणही
धंदा करतोय असा
समज होऊन
एखादा पुरुषाचा शौकीन
आला तर
पंचाइत व्हायची. म्हणून
तो बाजूला झाला. असला प्रकार त्याने ब्लू फिल्ममध्ये पाहिला होता.
पळाल्यापासून मजा अशी करता आली नव्हती. 

                                             
          अचानक त्याला खिडकीतून समोरच्या रस्त्यावर पोलिसांची गाडी उभी राहत
असलेली दिसली. त्याने 
खिडकी अर्धवट लावून घेतली.  त्यातल्या फटीतून तो
पाहू लागला. तीन चार  इन्स्पेक्टर्स, चार पाच हवालदार असा तांडा समोरच्या
फुटपाथवर असलेल्या प्रीतम बारमध्ये घुसताना त्याने पाहिला. मग काहीच झालं नाही.
साला पोलिसांची रेड असणार . आपण राहतो इथेही पडली तर ? पण मौसी हप्ता देत असणार. पण
पोलिस नावाच्या  हबशी माणसाचं कधी समाधान होत नसतं. ..... साधारण अर्ध्या पाऊण
तासाच्या अवधी नंतर पोलिस पार्टी पकडलेल्या पोरींसहित आणि मावशी सहीत बाहेर पडली.
त्याला पोलिसांचं मानसशास्त्र कळेना . साला 
लोकांनी धंदा केला तर कुठे बिघडलं ? तशी ही पण
समाजसेवाच नाही का ? समाजातल्या कितीतरी लोकांना रिझवण्याचं काम हा धंदा करीत असतो.
पण हे समजणार कस ? तो समोरचं दृश्य पाहण्यात एवढा रमला होता की त्याला
दरवाज्यावरच्या थापा ऐकूच आल्या नाहीत. आल्या तेव्हा तो घाबरत दरवाज्याकडे सरकला.
दरवाज्या उघडला आणि समोर मौसी उभी दिसली. ती आत येत म्हणाली, " देख , मेरे राजा , अब
इधर तू ज्यादा दिन नही रह सकता. जलदी दुसरा मकान ढूंढ.  पुलिस यहां कभीभी आ सकती
है. अभी अभी मुझे खबर मिली है, एक  साली ताई है वो  
अपना धंदा
बंद करके बंबई साफ सुथरी करना
चाहती है. " .....  गुड्डीच्या
तोंडाला कोरड पडली
असणार याची खात्री
असल्याने तिने बाजूच्या
मटक्यातून पेला रून त्याला पाणी
दिलं. म्हणाली, " डरपोक
साला, किशाने कैसा
भरोसा किया रे तेरे उपर ? इतना डरना नही , जवानी सब सम्हाल 
सकती है.
लेकीन उसे माल  चाहिये, अब तू मेरेको डेढ
लाख देगा, समझे
. तोही मै पुलिससे
बचा पाउंगी. "
.... मग ती आपला पार्श्वभाग हालवीत  हसत  निघून गेली. ......
मौसीची मागणी वाढलेली पाहून त्याला कापरं भरलं. मग त्याच्या लक्षात आलं या मौसीचं
पण काहीतरी करावं लागेल. त्याने मिस्चिफला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. ... ̱
गुड्डीने दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला. वाटलं तर पळून जाता येईल . थंडगार वारा सुटला
होता. पावसाने हलका का होईना ओलसर थंडावा आणला होता. एक प्रकारची मादकता
वातावरणात 
भरून राहिली होती. आपण मौसीच्या परवानगीनेच
बाहेर गेलो तर काहीच प्रश्न येणार नाही. असं वाटून 
 तो समोरच्या एका उघड्या खोलीकडे   निघाला. जिन्या
 
जवळील पठाण परत मध्ये आडवा
आला. "
तेरेकू अंदरहीच बैठनेको बोला ना ?  चल अंदर चल. " मग
मात्र गुड्डी म्हणाला, " देख मेरेको मौसीसे मिलना है, सीधी तरहसे जाने दे, वरना
अंजाम अच्छा नही होगा. " खिशात पिस्तूल नसल्याने त्याला बाहेर काढता आलं नाही.
पठाणाने एकदा त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं , आणि त्याला काय वाटलं , कोण जाणे तो
म्हणाला, " चल मौसीके पास चलते है. " असं म्हणून त्याला घेऊन पठाण समोरच्या रुमकडे
त्याला घेऊन गेला. मौसीकडे पोरींची बरीच गर्दी होती. त्याला पाहून ती म्हणाली, "
अरे 
मेरे प्यारे , इतना जलदी हो गया पैसे का इंतजाम
?  " त्यावर गयावया करीत गुड्डी म्हणाला, " अरे मौसी क्यूं मजाक उडाती है , मै थोडा
बाहर जाना चाहता था, इधर बैठके तो इंतजाम नही होगा न ? "   मग ती म्हणाली, " क्या
है ना , तेरी जगह कोई और  होता, तो मै मान जाती , लेकीन तू है पुलिसका वाँटेड. जा
बेटा जा, अपनी रूममे बैठके जो करना है वही कर. मै सिर्फ दो दिन राह देखेगी, नही तो
पुलिसको बुलाउंगी. या तू मुझे इनाम  देगा , या तो वो देंगे. "   गुड्डीच्या लक्षात
आलं, ही महाचालू आहे , आपल्याला धमकी देऊन राहिली आहे. तो आपल्या रूमकडे जाण्यासाठी
वळला आणि जाता  जाता म्हणाला, " पुलिस तेरेको इनाम थोडीही देनेवाली है,  तेरेकोही
पकडके ले जायेगी. सोच ले. "  
                                    मग तो मागे
न बघता आपल्या खोलीकडे भराभर गेला. त्याने खोलीचा दरवाजा लावून घेतला. पुन्हा एकदा
त्याने मिस्चिफला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. निराशेने तो त्या लहानशा खोलीत
बेडला सांभाळून फेऱ्या मारीत राहिला. 
आजपर्यंत इतक्या भराभर त्याने कधीही फेऱ्या
मारलेल्या नव्हत्या. कोणाच्या ना कोणाच्या तरी आधाराने त्याला जगण्याची सवय होती.
पण 
आधार घेताना तो विचार करीत नसे. थोडा जरी आधार
कोणाकडून मिळण्याची शक्यता असली तरी तो त्याला चिकटत असे. तो
स्वतःवर 
चिडला. " बाहर जानेका नही, अंदर बैठनेको जगा
नही, किसीका फोन आता नही किसीको फोन लगता नही, ये साला क्या लाइफ है ?, कमसेकम कोई लडकी साथ होती तो एक दो घंटे मजेमे गुजर जाते. " असली व्यर्थ बडबड त्याने स्वतःशी
करून पाहिली. पण उपयोग झाला 
नाही. परिस्थिती बदलायला तयार नव्हती . तिला
पाहिजे तेव्हाच ती बदलते आणि बदलायला लावते. शेवटी अर्धा पाऊण तास गेल्यावर
तो 
दमल्यासारखा बेडवर पडला. आपण एखादा ईदचा बकरा
आहोत असं त्याला वाटू लागलं. कापलं जाण्याची वाट पाहणारा, त्याला निदान गावभर
फिरवतात तरी. तो रडकुंडीला आला आणि विव्हळू लागला. शेवटी तो जोरात ओरडला, " मै कहां
जाऊ ? मेरेको बाहर निकालो रे 
यहांसे . " पण बाहेरच्या वातावरणात एवढे आवाज
होते की त्याचा आवाज कोणालाच ऐकू गेला नाही. तो उठला. दोन्ही हातात डोकं
धरून 
बसला. आता आठ वाजून गेले होते. रात्रीचे जेवण
येईल. आणणारा पठाणच होता. थाळी पण तोच घेऊन जाणार. तो गेला की मोका
आहे. 
आपण पळून जायचं. पण कुठे ? ............ तो
स्तब्ध झाला. असले प्रश्न पळून जाणाऱ्याला नेहमीच  पडतात.  कुठेही जाऊ, पण इथे
नक्कीच राहायचं नाही. पण पोलिसांनी पकडलं तर ?  ........ यावर त्याने विचार केला
नाही. त्याला सुचेना मग त्याने तो  विचार झटकून टाकला. खाली जाताना कोणी पकडलं तर ?
त्यावर तो शहारला. त्याने कोणतंच काम  स्वतःच्या बळावर केललं नव्हतं. नुसत्या 
कल्पनेनेच त्याला धडधडू लागलं. आता नऊ वाजायला आले होते. अधून मधून तो खिडकी बाहेर
पाही, पण बाहेर काहीच बदल दिसत नव्हता. कोणत्याही घटनेची कोणालाच पर्वा नाही असे
 लोक वागत होते. अचानक  दरवाज्यावर थाप पडली. त्याने घाबरून जाऊन पिस्तूल हातात
घेतलं. तो 
बेड ओलांडून दरवाज्याकडे सरकला. पठाणाला
पिस्तुलाचा धाक दाखवून आत बांधून ठेवून पळून गेलं तर ? पण त्याच्यात असलं धैर्य
नव्हतं. 
त्याने दरवाज्या  हळूच उघडला. बाहेर एक पोरगी परकर
पोलक्यात उभी होती. ती रडत असावी. तिच्या ब्लाऊजची वरची दोन बटणं तुटलेली दिसत
होती. त्यातून तिच्या जवानीचा उभार डोकावत होता. विस्क्टलेले केस वाऱ्यावर उडत
होते. पाऊस आणि वाऱ्याला नुसते उधाण आलेले होते. समोरच्या खोल्यांमध्ये
गिऱ्हाईकाची गर्दी होती. खालून कोणीतरी ओरडत वर येत होतं.  बहुदा तिच्यामागेच
असावं. पोरगी म्हणाली, " 
मुझे छुपाइये, अंदर आने दीजिये प्लीज. ....."
तिने गुड्डीकडे आशेने पाहिलं. त्याने जास्त विचार न करता तिला आत घेऊन कडी लावून
घेतली. 
त्याच्या मनात आलं. लडकी चाहिये थी , वो भी आ
गयी. ती आत शिरताच बेडच्या पलीकडील भागात उभी राहिली आणि म्हणाली, " देखिये , मै ऐसी
वैसी लडकी नही हूं. मेरी शादी तय हो चुकी है,  और ये गुंडे मुझे उठाके लाये है.
यहांसे जानेमे मेरी मदद करेंगे क्या ? "   गुड्डी मनात म्हणाला साला इधर हम भी कहा
रहने आये है . पण त्याने तिला धीर दिला. " देख तू डरना नही. मै भी यहांसे जाना
चाहता हूं. और अब रोनाभी नही. तू बेडके नीचे छुप जा. " ती बेडच्या खाली अनिच्छेनेच
पण गेली. ....
                                             
गुड्डी पुन्हा बेडवर बसतो न बसतो तोच पुन्हा दरवाजा ठोकला गेला. दोनतीन वेळा थाप
पडल्यावर त्याला समजलं की मगाशी खालून धावत वर येणारी माणसंच असणार, जी या पोरीचा
शोध घेत आली. त्याने हातातलं पिस्तूल सांभाळीत दरवाजा उघडला. बाहेर पठाण जेवणाची
थाळी घेऊन उभा होता. गुड्डीच्या हातातलं पिस्तूल पाहून त्याच्या हातात थाळी सरकवीत
तो म्हणाला, " तुम 
स्साला खुदकुशी करेगा ?  मुसलमान कभी खुदकुशी
नही करता, समझे, चल खाना खा ले  और चुपचाप बैठ. " असं म्हणून तो निघून
गेला. 
त्याला पोरगी पळून आलेली असल्याची खबर नसावी.
म्हणजेच हा इथे नव्हता तर. आपण प्रयत्न केला असता तर जाऊ शकलो
असतो. 
जेवणाची थाळी बेडवर ठेवून त्याने बेडखाली
लपलेल्या पोरीला बाहेर यायला सांगितले. " देख , खाना खा ले. फिर यहांसे कैसा
भागनेका 
इसके बारेमे बात करेंगे. " पोरगी बाहेर येताच
पुन्हा म्हणाली, " मुझे कुछ नही चाहिये, मुझे यहांसे जाना है..... तिने स्वतःच्या
उघड्या छातीवर हात आडवे ठेवले. एकूण तिचा बांधा चांगला होता. तिच्या अंगावर त्याला
ओरबाडल्याच्या खुणा गुड्डीला दिसल्या. कां कोण जाणे पण त्याला या पोरीची कीव आली.
हिला पळून जायला आपण मदत करायला हवी. असं त्याला वाटू लागलं. तो परत म्हणाला, "
भागना तो है ही. लेकीन भागने के लिये ताकत तो चाहिये, इसलिये खाना खा लो. डरना नही.
" मग त्याने थाळीतल्या एका ताटलीत तिला दोन चपात्या  आणि भाजी दिली . तिच्यापुढे
ठेवली. अजून तिला विश्वास नव्हता. तिने उभ्या उभ्याच चपात्या खाण्यास सुरुवात केली.
पण तिची नजर एक सारखी इकडे 
तिकडे फिरत होती. ते पाहून गुड्डी स्वतःशी
म्हणाला, हिला जरी बाहेर काढली तरी हिच्या घरच्या लोकांनी हिला घरात घ्यायला हवं.
म्हणजे 
ही परत आपल्याच ताब्यात राहील. त्याचं मन डचमळू
लागलं. आलेले चांगले विचार विरले. म्हणजे आपली कायमची सोय होईल. त्याच्या
विचारांमध्ये काहीतरी बदल होतोय हे पोरीला जाणवलं म्हणून तिने पुन्हा काळजीने
विचारले, " आप मुझे बाहर निकालेंगे ना ? नही तो मै अभी 
एक अभी खुदकुशी कर लूंगी , मुझे मेरे जान की  परवाह नही है. " असं म्हणून तिने पटकन हातातली थाळी फेकली आणि  बेडवर
ठेवलेलं  
पिस्तूल उचललं आणि स्वतःच्या कानशिलाजवळ नेलं.
गुड्डीने जेवण अर्धवट सोडले आणि तिला समजावणीच्या सुरात म्हणाला, " अरे
अरे, 
ये क्या कर रही तो  तुम , कही बात  हो जायेगी .
ऐसा मत करना बेबी. तेरे साथ मै भी मर जाउंगा, मै भी यहां नही रहना चाहता. " त्याने
घाईघाईने तिचा दंड धरला. तिच्या हातातलं पिस्तूल काढून घेण्यासाठी तो झटापट करू
लागला. त्यात ती आरडा ओरडा करू लागेल 
असे दिसताच त्याने दुसऱ्या हाताने तिच्या
कानफटात मारली. पिस्तुलाचा सेफ्टी कॅच मघाशीच सरकवलेला होता. तिने घाबरून जाऊन

ट्रिगर दाबला......... दणदणीत आवाज करीत गोळी
सुटली. आणि समोरच्या भिंतीत जाऊन अडकली. बाहेरच्या दरवाज्यावर जोर जोरात थापा पडू
लागल्या पण एकदाचं पिस्तूल तिच्या हातातून काढण्यात गुड्डी यशस्वी झाला. त्याने
पटकन  बेडवरून उडी मारली. आणि दरवाज्याजवळ गेला. बाहेरच्या थापा आता वाढल्या
होत्या. दरवाज्या उघडला, पण त्याचा मोबाइलही वाजू लागला. बाहेर पठाण एक दोन दुसरे
लोक , मावशी आणि काही पोरी अशी गर्दी जमली होती. हातातलं पिस्तूल त्याने तसंच धरलं
होतं. अचानक त्याला कसलं बळ आलं कोण जाणे. तेच पिस्तूल मावशीवर  रोखत आणि इतरांना
दम देत तो म्हणाला, " सब लोग बाजूमे हो जाव, नही तो गोलीसे उडा दूंगा, "  त्याच्या
डोळ्यातली लाली पाहून मावशी पण जरा हादरलीच. त्याने कधीही पिस्तुलाची गोळी उडवलीच
नव्हती.  मग त्याने त्या परकर पोलक्यात असलेल्या पोरीला बोलावले, " चल , छोकरी ,
अभी निकल जायेंगे. "   हळूहळू  बेड पलीकडची पोरगी पुढे आली. मावशीला आता अंदाज आला.
ती म्हणाली, " देख , गुड्डी, किसीको गोली लग जायेगी , हटाना ये पिस्तूल , इसे
वापरना तेरे बसकी बात नही है. कोई मर गया तो 
बेफालतूकी यहां पुलिस आयेगी . धंदा खतरेमे
आयेगा. बैठके बात करते है. "   पण गुड्डी ऐकायला तयार नव्हता. त्याने जवळ आलेल्या
पोरीचा हात पकडला आणी म्हणाला, " देख मौसी, मै और ये लडकी जा रहे है, तेरेको जो
करना है वो कर"   आणि मावशीला धक्का  देऊन गर्दी मधून 
ते दोघे पळत सुटले. रस्त्यावर ते आले. मग मौसी
म्हणाली, " देख ये लडकी पेरियरकी है, अच्छा नही होगा. जान लेगा वो तेरी. " पेरियर
म्हटल्यावर गुड्डीने काही सेकंद विचार केला. आता आपल्याला स्वतःच काहीतरी करावं
लागेल, कारण आपण गेल्यावर मावशी पोलिसांना 
नक्कीच खबर  देणार. तरीही तो रस्त्याच्या
गर्दीमधून पोरीचा हात धरून दुसऱ्या हाताने पिस्तूल सांभाळत पळत
सुटला. 
                                         
धावता धावता त्याच्या हे लक्षात येईना, नक्की आपण कुठे जाणार आहोत. खरंतर हॉटेल
डिलाइट काही लांब नव्हतं. पण त्याच्या ते लक्षात आलं नाही. आणि आलं असतं तरी तो
गेला असताच असंही नव्हतं. कारण तिथे पोलिसांचा खतरा होता. आता तर 
त्याच्यामागे पेरियरची माणसं आणि पोलिस दोघेही
होते. त्यातल्या त्यात पोलिसांच्या ताब्यात आपल्याला जास्त सुरक्षित वाटेल.
पेरियरची माणसं आपल्याला  जिवंत ठेवणं कठीण आहे याची त्याला धावता धावता जाणीव
झाली. असं पोरीला घेऊन पळणं या विभागातल्या  लोकांना
नवीन नव्हतं. त्याने रस्ता ओलांडला तेव्हा
समोरचा प्रीतम बार पाहिल्यावर  त्याच्या लक्षात आलं की आपण तिथल्या तिथेच फिरतोय.
 त्याने
त्या बारमध्ये न शिरण्याचं  ठरवलं . कुठेतरी
थांबून विचार  करायला हवा, असा त्याच्या मनात विचार आला. एका अतिशय घाणेरड्या गल्ली
वजा बोळात तो शिरला. तिथेही पोरी उभ्या होत्याच. त्याचा आणि पोरीचा श्वास आता
चांगलाच वर खाली होत होता. बोळातल्या अंधाऱ्या जागेत
एका पडक्या घराच्या भिंतीला ते दोघे टेकून , दम
खाण्यासाठी उभे राहिले. आता पोरगी त्याच्या अगदी  जवळ त्याला खेटून उभी होती.
पण 
जिवाच्या भीतीपुढे वासना हरल्या होत्या.
........ पेरियरची माणसं मौसीच्या चाळीतून वरच्या मजल्यावर शोध घेत होती. ती आता
खाली आली. 
गटागटाने उभ्या असलेल्या, भेदरलेल्या पोरी आणि
त्यांना  समजावून कामाला लागण्यासाठी सांगणारी मौसी  वरून आलेल्या गुंडांना अजिबात
आवडली नाही. हिनेच आपल्या  पोरीला पळून जाण्यास मदत केली असे समजून त्यांनी  मौसीला
दोन चार कानफटात मारल्या. पण तिच्याकडून  काहीच माहिती मिळाली नाही. मावशी पण
गुड्डी तिच्या बरोबर आहे हे सांगायचं विसरली . त्यामुळे रस्त्यावर शोध
घेताना 
त्यांना काही कळेना. ते सगळीकडे फिरून पाहू
लागले. पण असे प्रत्येक चाळीत जाऊन पाहण्यात चांगलाच वेळ जात होता. शेवटी ते चौघे
जण 
एका गल्लीच्या तोंडाशी थांबले. आतमध्येच गुड्डी
आणि ती पोरगी होती. त्यांनाही माहीत नव्हतं की बाहेर  पेरियरची माणसं उभी आहेत. मग
त्या चौघांनी प्रत्येक गल्ली तपासण्याचं  ठरवलं. पण आधी ते उभे असलेली गल्ली
त्यांनी तपासली नाही. गुड्डी परत मुख्य रस्त्यावर आला. तिथून त्याला मौसीची चाळ
दिसत होती, अजूनही पहिल्या माळ्यावर पोरींची गर्दी दिसली. अचानक त्याला समोर कॅफे
गोलमाल दिसला. तिथे 
ते दोघे पळत पळत शिरले. कॅफे मध्ये चांगलीच
गर्दी होती,  पण सगळी खालच्या थरातल्या लोकांची. कौंटरवरचा मुसलमान पाहून गुड्डीला
जरा बरं वाटलं. त्याने त्याला  भलतीच स्टोरी सांगून आपल्याला उभ्या असलेल्या मुलीला
विकायचंय असं सांगितलं. ते  ऐकून काउंटरवरचा मिया म्हणाला, " वो सब  ठीक है, लेकीन
मै ये धंदा नही करता‍. ज्यादासे ज्यादा तेरेकू दोन तीन दिन रयनेको जगा दूंगा ,
सिर्फ इसलिये की 
तुम मुसलमान हो. भटारखानेसे बाहर जाओ. बाये
 बाजूमे उपर एक रूम है. " भाई लेकीन खानेका पैसा तो तेरेकू देना पडेगा. " असं
म्हटल्यावर 
गुड्डीने त्याला आपल्या हातातली अंगठी काढून
दिली. " फिलहाल तो मै ये दे सकता हूं, अब तो  दोन तीन दिन खानेका इंतजाम हो जायेगा
ना ? " ते पाहून मियाने मान डोलवली. मग गुड्डी  पोरीला घेऊन रुममध्ये  गेला. मग ती
पोरगी म्हणाली, " कमसे कम हम स्टेशनपे तो जायेंगे, ताकी हम गाडी पकडके कही दूर जा
सकेंगे. "   आता जरा गुड्डीचं मन ताळ्यावर आलं. त्याने  खऱ्या अर्थाने तिच्याकडे
पाहिलं. मग खालीच उभ्या असलेल्या माणसाला त्याने जेवणाची ऑर्डर दिली. जवळ जवळ साडे
 दहा वाजत आले होते. 

  *************         ****************      
      **********************         ************************        
********************       *********************
                                         
 कौंटरकडे जाणाऱ्या सॅमसनकडे बारकाईने लक्ष ठेवीत मिस्चिफने आपले पिस्तूल रोखलेलेच
ठेवले. त्याला 
कौंटरवर तिरक्या लावलेल्या आरशाने उघडलेल्या
खणातले पिस्तूल दिसले. तशी धावतच मिस्चिफने कौंटर गाठले. सॅमसनच्या
मानेला 
पिस्तुलाची नळी लावीत तो म्हणाला, " गेम नही
खेलना, अब भी मै शार्प शूटर हूं. " दिसणाऱ्या पिस्तुलाकडे अधाशी पणे बघत सॅमसनने
दुसरा 
खण उघडला. त्यातली बंडलं काढण्या आधी त्याने
मिस्चिफला समोरच्या एका लांबोळक्या दिसणाऱ्या रूममध्ये एका टेबलाकडे
बसायला 
सांगितले. पण मिस्चिफ हुशार होता. तो म्हणाला, "
ऐसा नही होगा ब्रो. तेरा ये पैसेका खाना  पूरा उठाके ले जायेंगे और तू मेरेको ये
पैसा 
ब्रिफकेसमे भर के देगा , चल पाव उठा तेरा. "  
ते ऐकल्यावर सॅमसन कौंटरच्या मागे गेला. चुपचाप त्याने खण  काढून हातात घेतला. खण
चांगलाच खोल होता. जड खण सांभाळीत तो मिस्चिफने कव्हर केलेल्या अवस्थेत खोलीत
शिरला. चार वेटर होते , पण एकालाही त्यांच्यामध्ये पडण्याचे धैर्य झाले नाही.
रागाने सॅमसनच्या कपाळावरची हिरवी शीर फुगली होती . मग त्याच्या लक्षात आलं , ते
फक्त तीन लाख होते. पण 
हा घाईमध्ये फसला तर फसला. आणि झालंही तसंच.
सगळी बंडलं काढून सॅमसनने एका ब्रीफकेसमध्ये ठेवली. मग मिस्चिफने आणखी एक

गोष्ट केली. त्याला त्याचं पिस्तूलही केसमधे
ठेवायला सांगितलं.  केस बंद झाली. वर असलेल्या आणखी एका खणात सॅमसनने
त्याच्याकडे 
असलेल्या गोळ्या दिल्या. सॅमसनचे पिस्तूल आत
ठेवताना मिस्चिफने ते भरलेले असल्याची खात्री करून घेतली होती. मग सॅमसनने
त्याला 
आपल्या मेव्हण्याचा पत्ता दिला मेव्हण्याचं नाव
डेविड  आवासकर होतं. तो जुहूला राहत होता. समाधानाने मिस्चिफ  खूश झाला. मग तो
लबाड हसून म्हणाला, " 
देख सॅमसन आपून
तेरेको तकलीफ देना
नही चाहता. अब
अपने दोस्तको थोडा
ड्रिंक तो पिला सकता है ना ? " निः
शस्त्र 
सॅमसनने वेटरला खूण केली दोन लहान ड्रिंक्स
टेबलावर आली. आलेला वेटर जरा जास्त वेळ मिस्चिफकडे पाहत बसला. त्यावर
मिस्चिफने
त्याच्या कानशिलावर पिस्तुलाचा प्रहार करून
त्याला  खाली पाडले. " स्साला , हमको घूरता है , मारना चाहता है क्या ? .....मग
सॅमसनकडे 
वळून म्हणाला.... तेरा ये कुत्ता बहोत वफादारी
दिखाने जा राहा था. " ..... ड्रिंक संपल्यावर ब्रीफकेस घेऊन हातातलं पिस्तूल तसंच
धरून निघाला . हरलेल्या अवस्थेत बसलेला सॅमसन काहीच करू शकला नाही. मात्र पाचाच्या
ठिकाणी तीन लाख दिल्याचं समाधान त्याला मिळालं.
मग त्याच्या मनात एक विचार आला, त्याने ताबडतोब
फोन लावला. " डेविड , आजकल तेरा  धंदा बहोत ठंडा चल राहा है ना, एक
कस्टमर 
भेज राहा हूं. सिर्फ उसको पाच बोलना , और जितना
लाया है उतना निकाल लेना. ये काम जल्दी होना चाहिये. वो आदमी पुलिसको
 वाँटेड
है. " त्याचं वर्णन आणि नावही त्याने सांगितलं.
तो कदाचित नाव वेगळं सांगेल हेही सांगायला विसरला नाही. त्याच्याबद्दल त्याने इतरही
माहिती दिली. तरीही सॅमसनचं टेन्शन जाईना. मग मात्र त्याने स्वतःसाठी लार्ज  ड्रिंक
बनवून घेतलं आणि सावकाश पीत बसला. त्याचा अचानक कामामधला इंटरेस्ट  गेला. त्याने
वेटरला कौंटर सांभाळायला सांगितलं. मग त्याने एका वेगळयाच सिम कार्डचा वापर
करून 
पोलिसांना माहिती दिली. यावेळी त्याने स्वतःचे
नाव फिरोझ सांगितलं. आता तो स्वस्थ बसला. फोन डावलेंनी घेतला होता. ते लगेचच माय
डिअर बारमध्ये जायला निघाले. तरी त्यांना अकरा वाजून गेले. सखारामचा फोन येणार
होता, पण हा  कुणा फिरोझचा आला होता. त्यांना आता कोणताच चान्स घ्यायचा नव्हता.
रिमांडचे  कमी दिवस त्यांना अस्वस्थ करीत होते. नाहीतर त्यांनी अशा माहितीचा उगम
शोधला असता. सॅमसनची काय कथा होती ती  डावलेंनी ऐकली आणि त्यांनी सॅमसनला आत्ता परेशान करण्यापेक्षा आपण लगेचच डेविडच्या घर जाणं बरं 
राहील असा विचार करून ते त्याला म्हणाले, " आत्ता मी चाललोय, पण परत येईन तेव्हा तुलाही घेऊन जाईन, मला आता तू पाहिजे आहेस. 
माझ्या परवानगीशिवाय कुठेही बाहेर जाऊ नकोस, समजलयं ? " असं म्हणून ते निघाले. सॅमसनही ही बला सध्यातरी थोडक्यात टळली हे
लक्षात ठेवून त्यांची अट त्याने मान्य केली व मिस्चिफसारखा हलकट माणूस पकडला जाणं जरूरीचं आहे याची जाणीव  त्याला झाली. 

************               *******************
                  ******************                   ************************
                  *************************
                                      रात्रीचे
दहा वाजून गेले होते. बाहेर पडल्या पडल्या त्याला आता नक्की कुठे जावे हे कळेना.
आत्ताच जुहूला जावे तर 
हे ओझं घेऊन जावं लागेल . अण्णाकडे गेलो तर पैसे
द्यावे लागतील , पण आणलेले पैसे थोडे बाजूलाही काढून ठेवता येतील. उरलेले डेविडला
देता येतील. आणि तसेच डेविडकडे गेलो तर  सगळे पैसे द्यावे लागतील. एक दोन
प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आपल्याला लागणारे 
पैसे काढून घेऊ. म्हणून तो एका समोरच्याच फालतू
हॉटेलमध्ये गेला. कोपऱ्यातलं  टेबल पकडून कौंटरवरून दिसणार  नाही अशा रितीने
त्याने  ब्रीफकेसच कव्हर उघडलं.  
 तो बसताच वेटर
आला. पुन्हा त्याने
कव्हर लावून घेतले.
त्याला  ऑर्डर देणं
भाग होतं. तशी
भूकही लागली होती.
त्याने जी  ऑर्डर
उशिरा येईल ती दिली. मग पुन्हा कव्हर
उघडून खिशातून काढलेल्या
प्लास्टिक पिशवी मध्ये
दोन बंडलं आणि गोळ्या पण
भरल्या.
 दोन बंडलं
खोचलेल्या शर्टाच्या आत
सरकवली. ब्रीफकेस लॉक
केली.
आणि पिस्तूल खिशात
ठेवून ऑर्डरची वाट
तो पाहू
लागला. एकदम समोरच्या
कोपऱ्यात बसलेल्या सखारामच्या
 
संशयात भर पडली. हा माणूस इकडे तिकडे
पाहून ब्रीफकेस का
उघडतोय याचा त्याला
संशय  आला. खरंतर सखारामला या केसवर काम करण्याचा उत्साह जास्त
होता, म्हणूनच त्याच्या आग्रहामुळे डावलेंनी त्याची तब्येत ठीक नसतानाही त्याला
परवानगी दिली. आता सखारामला खात्यात फार भाव आला होता. जो आजपर्यंत कधी  मिळाला
नाही. त्याने आणलेल्या  
माहिती मुळे केस पक्की
 होण्यास मदत झाली होती. पण श्रीकांत सरांकडून केस काढून घेतलेली त्याला आवडली
नाही. मागवलेलं टोमॅटो  
ऑम्लेट मिस्चिफने 
बकाबक खात संपवलं नंतर दुसरं काहीतरी मागवलं. मग साडेदहाच्या सुमारास बिल देऊन तो
बाहेर पडला. त्याच्या 
मागोमाग सखारामही बाहेर
 पडला. हा माणूस वेगळा दिसतोय या आधारावर सखाराम त्याचा पाठलाग करू लागला. मिस्चिफ
चालत समोरच्या फुटपाथवर गेला आणि त्याने टॅक्सी पकडली. डेविड जुहू चौपाटीजवळच्या
रियल स्टार बिल्डिंगच्या  पाचव्या माळ्यावर राहत होता.  
तासाभराने टॅक्सी बिल्डिंगच्या समोर थांबली. लांबून
सखारामनेही  टॅक्सी थांबवली. आणि तो पायीच निघाला. मिस्चिफने टॅक्सी सोडली.
 
तो बिल्डिंगमध्ये शिरला. सिक्युरिटी गार्डने
हटकताच त्याने फ्लॅट नंबर आणि नाव सांगितलं. रजिस्टरमध्ये त्याने खोट्या नावाने सही
केली.  
जी त्याला परत करायला सांगितली  असती
तर कधीच जमली नसती. लिफ्टजवळ तो पोहोचला. थोड्याच वेळात फ्लॅट नं. ५०४ बेल त्याने
 
वाजवली. आतल्या लोखंडी दरवाज्याच्या फटीमधून
पाहून  डेविडने दरवाजा उघडला. मिस्चिफला दरवाजा उघडताना दिसला पण उघडणारा दिसलाच
नाही. त्याला दरवाज्या  ऑटोमॅटिक आहे की काय अशी शंका आली. पण त्याने खाली बघितल्यावर
समजलं की उघडणारा डेविड जेमतेम चार फूट असल्याने त्याला दिसला नाही. लहानशा
तुळतुळीत टक्कल असलेल्या डोक्यावर शेंडिच्या ठिकाणी
ज्यू घालतात
ती  गोल पण काळी स्क्ल कॅप घातली होती.  रंग लालसर गोरा होता. चेहरा सुंदर होता. लबाड लांबट तपकिरी
रंगाचे डोळे मान वर करून त्याच्याकडे पाहत होते. जेमतेम तोंडावर हसू आणून डेविडच
म्हणाला, " भीतर ये मित्रा. तुका सॅमसननी  पाठवलान  ?" मिस्चिफने मान डोलवली आणि तो
आत शिरला. समोरच एका म्हाताऱ्या टिपीकल ज्यू माणसाचा  सोनेरी फ्रेम असलेला फोटो
होता. ते त्याचे वडील असावेत. त्याच्यासमोर दोन खास ज्यू लोक वापरतात त्या 
मेणबत्त्या जळत होत्या.  
खोलीत थोडा सोनेरी
पिवळ्या रंगाचा प्रकाश होता. एक उत्तम प्रतीचं टेबल असून त्याच्यामागे एक लाल
रंगाची मऊ , दोन पायऱ्या असलेली  खुर्ची होती.  
ती बहुतेक डेविडने स्वतःला बसण्यासाठी खास बनवून घेतली
असावी. त्यावर तो बसला. आणि आपल्या समोरच्या खुर्चीत त्याने मिस्चिफला 
बसायला सांगितले. जसं मिस्चिफ त्याचं निरीक्षण करीत होता
तसं तोही त्याचं निरीक्षण करीत होता. आता मिस्चिफने आपलं खरं नाव सांगण्याचं ठरवलं.
मिस्चिफची भिरभिरती नजर पाहून तो म्हणाला, " स्वस्थ बोस की रे. गेट सेटल्ड मॅन. "
मिस्चिफला काही कळलं नाही .  
मग डेविडने
त्याला त्याच्या  भावजीचा फोन आल्याचं सांगितलं. मग आपलं काम कसं कठीण आहे आणि
आजकाल सरकार किती  
काळजीपूर्वक पासपोर्ट
देतं, त्याला किती पैसे खर्च करावे लागतात , तसंच त्याने व्हिसा पुराणही लावलं. तो
म्हणाला एकवेळ पासपोर्ट खोटा चालतो पण व्हिसा कसा खोटा बनवणार . मग त्याने ड्रॉवर
उघडला आणि काही  कोरे आणि  डमी पासपोर्ट काढून दाखवले. मग तो म्हणाला,
हे समद मी हातान बनवतो हां. एकदम परफेक्ट
जॉब. कळणार पण नाही कोणाला पासपोर्ट नंबर रद्द केलेला नाहीतर दोनदा वापरलेला आहे
ते. विद्यार्थी म्हणून तुजा पासपोर्ट बनेल हां .  तुजं नशीब  
खोटं असेल
तर तू
मरणार नक्की . " कोणतीही भीडभाड न बाळगता त्याने सगळी माहिती दिली. 
प्रतिक्रियेकरता त्याने मिस्चिफकडे
...... काहीच बोलला
नाही. त्याला मरायचं नव्हतं. म्हणून तर तो
दरोड्यानंतरही जिवंत होता. 
तसा डेविड कमर्शियल
र्टिस्ट  होता. पण  डोकं पहिल्यापासून उलट्या धंद्यात चांगलं
चालायचं. तशा त्याने सुरुवातीला दोन तीन जाहिरात कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या पण
जास्त मेहनत आणि बेताचे पैसे हे काही त्याचं स्वप्न नव्हतं, म्ह्णून त्याने
त्याच्या भावजीना धंद्यात मदत केली आणि अल्पावधीतच चांगलीच माया
जमवली. 
                                    मग पैशाचा
प्रश्न आला.  डेविड तसा स्पष्टवक्ता होता.  त्याला भावजींनी सांगितलेलं आठवलं. पण
त्याने स्वतःचा विचार केला. आजकाल सरकार दरबारीही पैशाची फार मागणी वाढली असल्याने
धंदा मंद होता. आणि लोकांचा कल त्यातल्या त्यात नवीन 
गुन्हेगारांचा कल पण जास्त  धोका न पत्करण्याचा
असल्याने त्याने तीन लाख तर  तीन लाख हा विचार करून मिस्चिफचे काम त्यात करण्याचे
ठरवले. मिस्चिफला हे मान्य  झालं. त्याने त्याच्या पुढ्यात बॅग सरकवली. डेविडने ती
उघडून पाहिली. लक्ष्मीच्या दर्शनाने तो समाधान पावला. 
मग तो म्हणाला, " हे बघ तुला एक मित्र म्हणून
सल्ला देतो, तू एअरनी कित्याक जातंस ? बोटीनसून जा की . जास्त त्रास नाही होणार.
बिगारी 
कामगार म्हणून एखाद्या ओळखीच्या कंत्राटदारास
सांगतो , तो काम करेल. बघ विचार कर. " पण मिस्चिफ मानायला तयार नव्हता.
शेवटी 
एअरने जायचं नक्की ठरलं. मग डेविड उठून म्हणाला,
" बोस की रे जरा, ड्रिंक घेऊन जा . "   त्याने मिस्चिफ हो नाही  म्हणायच्या आत
दोन 
ग्लास काढले. त्यात व्हिस्की भरली आणि बर्फ
टाकला. मग ग्लास त्याच्याकडे सरकवीत तो म्हणाला, " कच्चीच आहे , सोडा नाही मित्रा "
 
दोघेही चिअर्स म्हणून ग्लास तोंडाला लावणार तोच
खाली  कार थांबल्याचा आवाज झाला. डेविडने उठून मागच्याच बाजूला असलेल्या खिडकीचा
पडदा सरकवून बाहेर पाहिले. तसें तो कधी पाहत नाही. पण आज पाहिलं आणि त्याला
पोलिसांची जीप थांबल्याचं दिसलं. 
तो व्हिस्की पटकन गिळत  सावध होत म्हणाला, "
पोलिस ! आत्ताच कसे आले ?" असं म्हटल्याबरोबर मिस्चिफने ब्रीफकेसमधला पिस्तूल
डेविड मागे वळण्याच्या आत काढून घेतलं.  तेच त्याच्यावर रोखीत मिस्चिफ म्हणाला, "
तुम अपने जीजा जैसेही हो. तुमनेही पुलिसको बुलाया है "  
डेविड त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, "
तुका काय वाटला मी माजा लुकसान करून घेईन ? तुज्या बरोबर माजा पण जीव जाईल की
रे 
दादा. ते तेवडं पिस्तूल खाली कर हां. "
मिस्चिफने पिस्तूल खाली केले. मग मात्र डेविड कामाला लागला. ड्रावरमधल्या सगळेच
कोरे खोटे 
पासपोर्टाचे नमुने, काहीचे घेतलेले फोटो आणि इतर
कागदपत्र  त्याने लाइटर पेटवून जाळायला सुरुवात केली. खोलीत चांगलाच जळकट वास
पसरला. पण डेविडला त्याची पर्वा नव्हती. त्याचा हा प्लान पहिल्यापासून त्याने तयार
ठेवला होता. कारण असली इमर्जन्सी केव्हाही आली असती याची त्याला कल्पना होती.
........ ते पाहून मिस्चिफ म्हणाला, " और मेरा पासपोर्ट ? "   त्यावर डेविड हसून
म्हणाला,  "अब हम दोनो भूल जायेंगे , ये तेरे पैसेकी केस उठा , अब मै  जिंदा नही
रहूंगा. " कपाळावरचा  घाम टिपीत तो म्हणाला.............
मिस्चिफने
पटकन ब्रीफकेस उचलली आणि तो आतल्या खोलीत गेला.
पण डेविड शांतपणे खुर्चीत बसून राहिला. त्याने मग एकवार  मोझेसचं स्मरण केलं. आपलं
टेबल सरकवीत  त्याने मुख्य दरवाज्यापाशी आणलं . ते दरवाज्याला आतल्या बाजूने
चिकटवून  ठेवलं. आणि खणात  ठेवलेले
खिळे घेऊन दरवाज्याच्या चौकटीला दोन दोन खिळे
टेबलाच्या पायामधून मारून ते खिळवले. जरी दरवाज्या फोडला तरी काही वेळ पोलिसांना आत
यायला नक्कीच लागेल. तोपर्यंत आपण जिवंत राहत नाही हे नक्की. मग त्याने उजव्या
बाजूचा खण उघडून तो हातात पिस्तूल धरून बसला. ती मागे उडणारी गन होती. आता फक्त
पोलीस आत शिरले की स्वतःवर गोळी झाडून घायची की काम झालं. आपण आणि आपले क्लायंटस
पोलिसांच्या हाती लागणार नाहीत.
                                             
      सखारामला बिल्डिंगमध्ये शिरायला काहीच अडचण आली नाही. त्याने वॉचमनला व्हिजिट
रजिस्टर दाखवायला सांगितलं. त्यात नुकतीच झालेली नोंद त्याने पाहिली. ती करणाऱ्याचे
नाव धड कळत नव्हते. पण फ्लॅट नं. ५०४ एवढे कळल्यामुळे 
त्याने लिफ्ट बोलावली. वॉचमन मदत करायला तयार
होता. पण त्याने वॉचमनची मदत नाकारली. तो लिफ्टमधे घुसला. त्याने पाचव्या मजल्याचे
बटण दाबले लिफ्ट वर जाऊ लागली. पण मध्येच काही कारणाने तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या
मध्ये अडकली. तिचा सायरन चालू झाला. अधून मधून कोणीतरी हातोडीने काहीतरी ठोकत
असल्याचा आवाज आला , पण त्याचं त्याला फक्त आश्चर्य वातलं.. वॉचमनने कशीतरी ती लिफ्ट  सुरू केली . सखाराम पाचव्या मजल्यावर
पोहोचला. आणि त्याने ५०४
ची बेल वाजवली.
पण कोणीच
उघडलं नाही. आतून
कसलाच आवाज त्याला
ऐकू आला
नाही. तेव्हा नेमका
मिस्चिफ आत दडला होता, आणि डेविड
हातात पिस्तूल  घेऊन
खुर्चीत बसला  होता. पुन्हा
पुन्हा बेल वाजवूनही कोणीच दरवाज्या उघडेना , तेव्हा त्याने डावलेंना फोन केला. त्यावेळी ते रियल स्टार  
बिल्डींगच्या आवारात शिरत होते. त्यामुळे त्यांनी फोन बंद केला. वॉचमनला कळेना , सारखे  पोलीस का येतायत. अर्थातच त्याने तसे विचारले नाही.  पण सखाराम आल्याचं मात्र सांगितलं. त्यांना दुसरी लिफ्ट दाखवून त्याने पाचव्या मजल्यावर जाण्यास मदत केली. 


                                                                                                                          (अंतिम भाग ८ .... पुढे चालू.)