मराठी चित्रपटांची गाडी ज़ोरात

आज़च्या सकाळात मराठी चित्रपटांची गाडी ज़ोरात ही बातमी वाच़ली. संक्षिप्त वृत्त -



  • शहरामध्ये सध्या दाखवल्या ज़ाणाऱ्या हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपटांची संख्या अधिक.
  • मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी.
  • केदार शिंदे दिग्दर्शित 'अगंबाई अरेच्चा' आणि सचिन दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाच़ा' ह्या चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साज़रा केला.
  • सातत्याने नवे मराठी चित्रपट पडद्यावर.
  • वेगळ्या वाटेने ज़ाणाऱ्या मराठी चित्रपटांचेही प्रेक्षकांकडून स्वागत.

बातमी वाच़ून बरे वाटले. काही प्रश्न -



  • मराठी चित्रपटांची गुणवत्ता आणि प्रेक्षकसंख्या खरेच वाढत आहे काय?
  • गेल्या वर्षभरात आपण स्वतः चित्रपटगृहात ज़ाऊन किमान एक मराठी चित्रपट पाहिलात काय?
  • परदेशस्थ मराठ्यांना (म्हणजे मराठी भाषकांना) व बृहन्महाराष्ट्रीयांना मराठी चित्रपट पाहण्याच्या संधी उपलब्ध आहेत का? असल्यास कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?

आपला
(चित्रपटप्रेमी) प्रवासी