अमेरिकेतल्या निवडणुका

कालच इथल्या निवडणुका पार पडल्या.  लोकसभा (काँग्रेस), राज्यसभा (सिनेट) आणि अध्यक्षपद असा तिहेरी सत्तेचा सहा वर्षाचा काळ संपुष्टात येऊन इथल्या डेमॉक्रॅटिक पक्षाने रिपब्लिक पक्षाची सत्त २/३ हस्तगत केली आहे. (अजून सिनेटचे भवितव्य पुरे स्पष्ट नाही, पण त्यात डेमोक्रॅट सध्या आघाडीवर आहेत).  २००८ साली त्यांना अध्यक्षपद सुद्धा मिळवता येईल अशी शक्यता वाटते आहे.


पुढची दोन वर्षे कारभार चालवायला बुशला पडते धोरण घावे लागणार आहे.  बघू या त्याला किती वेळा नकाराधिकार वापरायला लागतो ते.  हल्ली एखाद्या बाबीवर नकाराधिकार (लाईन आयटेम व्हीटो) वापरायचा थोडा प्रयत्न झाला आहे, पण तो मार्ग जवळ जवळ उपलब्ध नाहीच.  (याबाबतीत माहिती हवी असल्यास ती वेगळी देईन.)


बुश आणि रिपब्लिकनांची ही पीछेहाट इस्लामी अतिरेक्यांच्या पथ्यावर पडेल असे वाटते.  बघू या कसे राजकारण चालते ते.


अर्थव्यवहाराला जरा खीळ बसेल असे वाटते.  डेमॉक्रॅट हे नेहमी मोठ्या धंद्यांच्या विरोधी असतात.  बिल गेट्सच्या विरुद्ध पहिली कारवाई त्यांनीच केली.  तसेच समाजवादी न्यायाधिशांची नेमणूक त्यांच्या अधिकारात होऊ शकेल.  अर्थात त्यासाठी त्यांना अध्यक्षपदाची जरूरी आहे.


अमेरिकेत होणाऱ्या बदलाचे जगभर परिणाम होतात हे महत्त्वाचे आहे.


मुख्य म्हणजे निकोप आणि मुद्द्यावर तसेच अतिशय सुबद्ध रितीने इथल्या निवडणुका होतात याचे फार कौतुक आणि अभिमान वाटतो.


मनोगतींची यावर काही प्रतिक्रिया आहे का?


कलोअ,
सुभाष