तेहतीस कोटी देव ?

आपण असे ऐकतो-वाचतो वा बोलतोही की देव तेहतीस कोटी आहेत. मला या "तेहतीस कोटी देवता" संकल्पनेची माहिती कोठे मिळू शकेल, हे जाणून घ्यायचे आहे. कोटी ही संख्या आहे असे मानल्यास इतक्या देवांची नावे, अवतारकथा, हे सारे शोधावे लागेल. कोटी या शब्दाचा अर्थ 'प्रकार' असाही आहे, त्या अर्थाने कोटी हा शब्द वापरला जात असल्यास हे तेहतीस प्रकार कोणते, त्यांच्यातील भेद नेमके कसे केले गेले हे सर्व माहिती करून घ्यायचे आहे. कोणी मार्गदर्शन करू शकेल काय?