सध्या विश्वचषक फुटबॉल सामने रंगात आले आहेत. (जयन्ता५२, फुटबॉल चे पायचेंडु / पदकन्दुक असे भाषांतर करणे जीवावर येते (मराठी भाषा प्रेमी असलो तरी )
पेनल्टी क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने खेळाडूस अडवल्यास पंचाकडून शिक्षा म्हणून पेनल्टी किक बहाल करण्यात येते. त्याचबरोबर बाद फेरीतील सामन्यांचा निकाल लागावा म्हणून अतिरिक्त वेळेतही निकाल न लागल्यास प्रत्येकी ५ पेनल्टी शूटआऊट वर सामन्याचा विजेता ठरवला जातो. त्यातही निकाल न लागल्यास सडन डेथ ( अचानक मृत्यु हा शब्द वापरावा का?) चा अवलंब करतात. मला हे विचारायचे आहे की नेहमीच्या वेळेत पेनल्टी म्हणणे योग्य आहे,पण सामन्याचा निकाल ठरवण्याच्या वेळेस त्याला पेनल्टी का म्हणतात?